एक्स्प्लोर

'सनी'पाजी निवडणुकांच्या रिंगणात, भाजपच्या तिकीटावर लढणार?

अभिनेता सनी देओलला पंजाबमधील गुरुदासपूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यास भाजप उत्सुक असल्याची माहिती आहे.

मुंबई : बॉलिवूड कलाकारांनी निवडणुकांच्या रिंगणात नशिब आजमावणं नवीन नाही. 'रंगीला गर्ल' उर्मिला मातोंडकर काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा ताज्या असतानाच आता गेल्या पिढीचा आणखी एक कलाकार लोकसभेच्या मैदानात उतरणार असल्याचं म्हटलं जात आहे. डॅशिंग अभिनेता सनी देओलला उमेदवारी देण्यास भाजप उत्सुक असल्याची माहिती आहे. पंजाबच्या गुरुदासपूर मतदारसंघातून सनी देओलला तिकीट देण्याची भाजपची तयारी आहे. निवडणूक लढवण्यासाठी सनी देओल स्वत: फारसा उत्सुक नाही. त्यामुळे सनीला उमेदवारीसाठी तयार करण्यासाठी महाराष्ट्रातील भाजप नेत्यांवर केंद्रीय नेतृत्वाने जबाबदारी सोपवली आहे. सनी देओलचे पिता आणि ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना भाजप नेते गळ घालणार आहेत. सनी देओल यांची सावत्र आई म्हणजेच ज्येष्ठ अभिनेत्री आणि विद्यमान खासदार हेमा मालिनीही मथुरेतून भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे विजेतेपदाची माळ दोघांच्याही गळ्यात पडली, तर चित्रपट विश्वातील मायलेक संसदेतही एकत्र झळकण्याची कदाचित ही पहिलीच वेळ ठरेल. गुरुदासपूर हा दिवंगत अभिनेते विनोद खन्ना यांचा पारंपरिक मतदारसंघ होता. 1997,1999, 2004 आणि 2014 मध्ये ते या मतदारसंघातून भाजपच्या तिकीटावर निवडून आले होते. 2017 मध्ये विनोद खन्नांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेस उमेदवार सुनील जाखड हे तब्बल 1,93,219 मतांच्या फरकाने विजयी झाले होते. त्यामुळे काँग्रेसकडून ही सीट खेचून आणण्याचा भाजपचा मानस असेल. 62 वर्षांचा सनी देओल 'पल पल दिल के पास' या चित्रपटातून मुलगा करण देओलला लाँच करत आहे. या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुराही त्याच्याच खांद्यावर आहे. त्याची भूमिका असलेला 'मोहल्ला अस्सी' काही महिन्यांपूर्वी वादाच्या भोवऱ्यात अडकला होता, त्यामुळे त्याचं प्रदर्शनही वारंवार लांबणीवर पडत होतं. भाईजी सुपरहिट, यमला पगला दिवाना, पोस्टर बॉईज, घायल वन्स अगेन हे त्याचे नजीकच्या काळातले चित्रपट. सनीने 1983 साली बेताब चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर वर्दी, त्रिदेव, चालबाज, निगाहे यासारख्या चित्रपटातील त्याच्या अॅक्शन भूमिका अधिक गाजल्या. 1990 साली राजकुमार संतोषींच्या 'घायल' चित्रपटाने त्याला चांगलीच ओळख मिळाली. त्यानंतर दामिनी, डर, घातक, बॉर्डर, गदर एक प्रेमकथा यासारख्या चित्रपटातील त्याच्या भूमिकाही चांगल्याच गाजल्या.
संबंधित बातम्या :
उत्तर मुंबईमधून 'रंगीला' गर्ल उर्मिला मातोंडकरला काँग्रेसमधून उमेदवारी देण्याची शक्यता
काँग्रेस प्रवेशाच्या बातम्या खोट्या, डान्सर सपना चौधरीकडून स्पष्टीकरण
'ड्रीमगर्ल'ला डान्सिंग स्टारची टक्कर, हेमामालिनींविरोधात सपना चौधरी लोकसभेच्या रिंगणात?
सुमित्रा महाजनांविरोधात निवडणूक लढण्याच्या चर्चांवर सलमान म्हणतो...
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

उत्तर प्रदेशात राजकीय भूकंप? सर्वपक्षीय ब्राह्मण आमदार एकवटले, शक्तिप्रदर्शनाच्या माध्यमातून योगी सरकार इशारा
उत्तर प्रदेशात राजकीय भूकंप? सर्वपक्षीय ब्राह्मण आमदार एकवटले, शक्तिप्रदर्शनाच्या माध्यमातून योगी सरकार इशारा
मुंबई महापालिकेसाठी आत्तापर्यंत 10 हजार 343 अर्जांची विक्री; 44 नामनिर्देश पत्र दाखल, उरले दोनच दिवस
मुंबई महापालिकेसाठी आत्तापर्यंत 10 हजार 343 अर्जांची विक्री; 44 नामनिर्देश पत्र दाखल, उरले दोनच दिवस
Nana Patole : अहिल्यानगरच्या शेतकऱ्यानं 198 किलो कांदा विकला, खर्च जाऊन हाती फक्त 22 रुपये आले, नाना पटोलेंनी शेतीचं भीषण वास्तव मांडलं
अहिल्यानगरच्या शेतकऱ्यानं 298 रुपयांमध्ये 198 किलो कांदा विकला, खर्च जाऊन 22 रुपये हाती, नाना पटोलेंची पोस्ट
मोठी बातमी! मुंबईसाठी भाजप महायुतीचं ठरलं, शिंदेंच्या शिवसेनेला 79 जागा; 20 जागांसाठी वेगळाच फॉर्म्युला
मोठी बातमी! मुंबईसाठी भाजप महायुतीचं ठरलं, शिंदेंच्या शिवसेनेला 79 जागा; 20 जागांसाठी वेगळाच फॉर्म्युला

व्हिडीओ

Eknath Shinde Meet Mangesh Kalokhe Family : पोलिसांनी काही केलं नाही, अन् दुसऱ्या दिवशी...
Khopoli Mangesh Kalokhe यांच्या हत्येचा CCTV, नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखेंचे पती मंगेश काळोखे
Sunil tatkare On mahayuti : आज संध्याकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पहिली यादी जाहीर होणार
Sana Malik on BMC Election : भाऊ, बहीण आणि सूनेला तिकीट,नवाब मलिकांच्या घरात 3 उमेदवार
Sunil Tatkare On Alliance : मुंबईत राष्ट्रवादी युतीसोबत लढणार? तटकरे म्हणाले...

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उत्तर प्रदेशात राजकीय भूकंप? सर्वपक्षीय ब्राह्मण आमदार एकवटले, शक्तिप्रदर्शनाच्या माध्यमातून योगी सरकार इशारा
उत्तर प्रदेशात राजकीय भूकंप? सर्वपक्षीय ब्राह्मण आमदार एकवटले, शक्तिप्रदर्शनाच्या माध्यमातून योगी सरकार इशारा
मुंबई महापालिकेसाठी आत्तापर्यंत 10 हजार 343 अर्जांची विक्री; 44 नामनिर्देश पत्र दाखल, उरले दोनच दिवस
मुंबई महापालिकेसाठी आत्तापर्यंत 10 हजार 343 अर्जांची विक्री; 44 नामनिर्देश पत्र दाखल, उरले दोनच दिवस
Nana Patole : अहिल्यानगरच्या शेतकऱ्यानं 198 किलो कांदा विकला, खर्च जाऊन हाती फक्त 22 रुपये आले, नाना पटोलेंनी शेतीचं भीषण वास्तव मांडलं
अहिल्यानगरच्या शेतकऱ्यानं 298 रुपयांमध्ये 198 किलो कांदा विकला, खर्च जाऊन 22 रुपये हाती, नाना पटोलेंची पोस्ट
मोठी बातमी! मुंबईसाठी भाजप महायुतीचं ठरलं, शिंदेंच्या शिवसेनेला 79 जागा; 20 जागांसाठी वेगळाच फॉर्म्युला
मोठी बातमी! मुंबईसाठी भाजप महायुतीचं ठरलं, शिंदेंच्या शिवसेनेला 79 जागा; 20 जागांसाठी वेगळाच फॉर्म्युला
Baramati : मटणासाठी लाईनमध्ये थांब म्हटल्यावर राग; 'मी मोठा अधिकारी, नाव गुगलवर शोध' म्हणत मटण दुकानदाराचे अपहरण अन् मारहाण
मटणासाठी लाईनमध्ये थांब म्हटल्यावर राग; 'मी मोठा अधिकारी, नाव गुगलवर शोध' म्हणत मटण दुकानदाराचे अपहरण अन् मारहाण
Malegaon : मयत शिक्षकाची मतदान अधिकारी पदावर नियुक्ती; मालेगाव महापालिका प्रशासनाचा भोंगळ कारभार उघड
मयत शिक्षकाची मतदान अधिकारी पदावर नियुक्ती; मालेगाव महापालिका प्रशासनाचा भोंगळ कारभार उघड
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 डिसेंबर 2025 | शनिवार
शॉकिंग! सिगारेट न दिल्याने दारुड्यांनी बारमालकास जीवे मारलं, चाकूरमधील थरारक घटना; आरोपी फरार
शॉकिंग! सिगारेट न दिल्याने दारुड्यांनी बारमालकास जीवे मारलं, चाकूरमधील थरारक घटना; आरोपी फरार
Embed widget