शरद पवार आणि बाळासाहेब विखे-पाटील यांच्यातील वाद विसरुन सुजय राष्ट्रवादीकडून लोकसभा लढणार?
काँग्रेस नेते दिवंगत बाळासाहेब विखे पाटील विरुद्ध शरद पवार हे वैर महाराष्ट्राने पाहिलं आहे. मात्र सुजय विखे पाटील राष्ट्रवादीकडून निवडणूक लढण्याच्या चर्चांमुळे विखे-पाटील विरुद्ध पवार हा संघर्ष थांबला आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
मुंबई : लोकसभा निवडणुकीत अहमदनगरच्या जागेसाठी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील मुलगा सुजयसाठी जोरदार प्रयत्न करत आहेत. आजोबा बाळासाहेब विखे-पाटील आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यातील वैर विसरुन अहमदनगरच्या जागेसाठी सुजय विखे पाटील राष्ट्रवादीचं घड्याळ हातावर बांधणार असल्याची जोरदार चर्चा आहे.
सुजय यांना अहमदनगरची जागा मिळावी म्हणून राधाकृष्ण पाटील यांनी मोठी खटाटोप केली. मात्र राष्ट्रवादीनं अहमदनगरच्या जागेवरचा दावा अद्याप सोडलेला नाही. अहमदनगरची जागा काँग्रेसच्या वाट्याला न आल्यास सुजय भाजपमध्ये जाऊ शकतो, अशी शक्यता देखील विखेंनी बोलून दाखवली. मात्र आता अमहदनगरच्या जागेसाठी सुजय राष्ट्रवादीमध्ये जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.
काँग्रेस नेते दिवंगत बाळासाहेब विखे पाटील विरुद्ध शरद पवार हे वैर महाराष्ट्राने पाहिलं आहे. मात्र सुजय विखे पाटील राष्ट्रवादीकडून निवडणूक लढण्याच्या चर्चांमुळे विखे-पाटील विरुद्ध पवार हा संघर्ष थांबला आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
काय आहे बाळासाहेब विखे-पाटील आणि शरद पवार वाद?
दक्षिण अमहमदनगर जागेवर 1991 मध्ये बाळासाहेब विखे पाटील यांना काँग्रेस पक्षाने लोकसभेसाठी उमेदवारी नाकारली होती. त्यावेळी काँग्रेस उमेदवार यशवंत राव गडाख यांच्याविरोधात बाळासाहेब यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत विखे-पाटील पराभूत झाले होते. मात्र पराभवानंतर बाळासाहेब कोर्टात गेले आणि या प्रकरणात गडाख यांच्यासह शरद पवार यांना सह आरोपी करण्यात आले होते. त्यानंतर पवार आणि विखे-पाटील यांच्या वैर निर्माण झालं होतं. शरद पवारांनी मागचा वाद विसरुन सुजयला आपलं नातू मानावे, अशी विनंती राधाकृष्ण विखे पाटील यांनी 'एबीपी माझा'च्या माध्यमातून केली होती.
दक्षिण अहमदनगर जागेबाबत राधाकृष्ण विखे पाटील आणि सुजय दोघेही शरद पवार यांना मुंबई, दिल्ली आणि बारामतीला भेटले आहेत. सुजय स्वतः अजित पवार यांना भेटले. मात्र ही जागा राष्ट्रवादी सोडण्याबाबत अजून अनुकूल नाही, अजित पवारांनी दोन दिवसांपूर्वीच तसं बोलूनही दाखवलं. सुजय राष्ट्रवादीत येण्याचे संकेत राष्ट्रवादीने दिल्याने चर्चा सुरु झाली आहे.
दक्षिण अहमदनगर येथील कर्जत जामखेड या विधानसभा जागेवर शरद पवारांचा नातू रोहित पवार निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. त्यामुळे दक्षिण अहमदनगर जागा राष्ट्रवादीकडे राहावी यासाठी राष्ट्रवाडीचे प्रयत्न असल्याची चर्चा आहे. दरम्यान ही जागा सुजय विखे पाटलांनी लढवल्यास अहमदनगरमधील काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात हे नाराज होऊ शकतात. त्यानंतर ते कोणतं पाऊल उचलतील हा प्रश्न काँग्रेससमोर असेल.
संबंधित बातम्या सुजय विखे-पाटील भाजपच्या मार्गावर? राधाकृष्ण विखे-पाटील म्हणतात... सुजय विखे पाटील-रोहित पवार एकत्र, राजकीय वैर संपवून तिसऱ्या पिढीकडून मैत्रीचा नवा अध्याय? अहमदनगरची जागा काँग्रेससाठी सोडण्यास राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांचा विरोध राधाकृष्ण विखे पाटलांचे चिरंजीव भाजपात प्रवेश करणार? राधाकृष्ण विखे पाटील नाराज, महाआघाडीच्या दोन्ही मेळाव्याकडेही पाठ