एक्स्प्लोर

Shivadi Vidhan Sabha: उद्धव ठाकरेंच्या सांगण्यावरुन लालबागचा राजाची... 'या' कारणामुळे सुधीर साळवींना उमेदवारी मिळाली नाही, आशिष शेलारांची थिअरी

Shivadi Vidhan Sabha Assembly: शिवडीत बाळा नांदगावकर यांना भाजपचे समर्थन, भाजप कार्यकर्त्यांना पूर्ण ताकदीने मनसेचे काम करण्याचे आवाहन.

मुंबई: शिवडी विधानसभा मतदारसंघात इच्छूक असूनही निवडणूक लढण्याची संधी न मिळालेले ठाकरे गटाचे नेते सुधीर साळवी यांच्यावर मंगळवारी भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी जोरदार हल्लाबोल केला. उद्धव ठाकरे यांच्या सांगण्यावरुन सुधीर साळवी यांनी लालबागचा राजाची (Lalbaug Cha Raja) 100 वर्षांची परंपरा खंडित केली. त्यामुळेच सुधीर साळवी (Sudhir Salvi) यांना विधानसभेची उमेदवारी मिळाली नाही, असे आशिष शेलार यांनी म्हटले. ते मंगळवारी शिवडी विधानसभा मतदारसंघात आयोजित करण्यात आलेल्या प्रचारसभेत बोलत होते. यावेळी आशिष शेलार यांनी सुधीर साळवी यांच्यावर घणाघाती टीका केली.

ठाकरे गटाचा उमेदवार कोण? हा त्यांच्या पक्षाचा विषय आहे. आम्ही टीव्हीवर पाहिले की, अजय चौधरींना उमेदवारी दिली, तेव्हा सुधीर साळवी यांचे समर्थक आक्रमक झाले. परंतु, हे भोग आहेत. कोरोनाकाळात गणेशभक्त सांगत होते की गर्दी नको, ऑनलाइन दर्शन घेऊ, आम्हाला उत्सव साजरा करू द्या. पण सुधीर साळवी यांनी तत्कालीन मुख्यमंत्र्यांची चाटूगिरी केली. गणेशभक्तांना काय वाटेल, याचा विचार न करता उद्धव ठाकरेंच्या हुकुमाखातर लालबागच्या राजाची 100 वर्षांची परंपरा खंडित केली. त्यामुळे सुधीर साळवी त्याचे परिणाम भोगत आहेत. अजय चौधरी 23 नोव्हेंबरला निकालादिवशी भोगतील. त्यामुळे भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी कुठल्याही निमंत्रणाची वाट न बघता पूर्ण ताकदीने कामाला लागून मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांना प्रचंड  मतांनी विजयी करा, असे आवाहन आमदार आशिष शेलार यांनी केले.

शिवडीत भाजपचा मनसेला पाठिंबा

आशिष शेलार यांनी मंगळवारी शिवडी विधानसभा मतदारसंघात भाजपकडून मनसे नेते बाळा नांदगावकर यांना समर्थन देण्याची घोषणा केली. हे समर्थन केवळ शिवडीपुरते असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी आशिष शेलार म्हणाले की, ज्या अपक्षाने भाजपाचा उल्लेख केला त्याला आमचे समर्थन नाही. कारण कुठलाही संवाद, चर्चा न करता, थेट अर्ज भरण्यात आला. मग दोघेच राहतात, महाविकास आघाडी आणि मनसे. मतदारांचा विचार करून उमेदवार कोण, हे पाहिले तर बाळा नांदगावकर आणि अजय चौधरी हे दोघे उभे आहेत. त्यामुळे काही प्रमेय ठरवून मूल्यमापन करावे लागेल. लोकांची कामे होण्यासाठी आपल्याला मतदान करायचे आहे. भाजपा विचारावर चालणारी आहे. त्यामुळे विचारधारा डोळ्या समोर ठेवून निर्णय घ्यायचा आहे, असे आशिष शेलार यांनी सांगितले.

ठाकरे गटावर तोफ डागताना आशिष शेलार म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी दगाबाजी केली. महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात मोठा दगाबाज म्हणून उद्धव ठाकरे यांचे नाव घेतले जाईल. शिवडी हा वारकऱ्यांचा विभाग आहे. उद्धवजी आषाढीला पंढरपूरला गेले, पण पांडुरंगाच्या पायाला स्पर्श करणार नाही ही भूमिका घेतली. कोरोनाकाळात जेव्हा लोक देवाचा धावा करीत होते, तेव्हा उद्धव ठाकरे यांनी मंदिरे बंद केली. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना तिलांजली दिली. त्यावेळी वारी रोखली आणि एकनाथ शिंदे यांनी वारकऱ्यांना मदत केली असता, त्याची चेष्टा केली, असे शेलार यांनी म्हटले.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा समलैंगिक म्हणून अपमान करणाऱ्या काँग्रेसला कधी खडे बोल सुनावले नाही. सावरकरांच्या बदनामीला मूक पाठिंबा दिला.  'पीएफआय'वर बंदी आणली, त्यावर समर्थ करणारी भूमिका मांडली नाही. पालघर साधू हत्याकांड झाले, पण ना खेद ना दु:ख, ना चौकशीला तयार. सीएए ला विरोध केला, काश्मीर मध्ये ३७० हटवले त्याला विरोध. हिंदू समाज सडलेला आहे, असे शरजील उस्‍मानी म्‍हणतो यांना महाराष्‍ट्रात ठाकरे सरकार निर्दोश सोडते. मग आम्ही त्यांचे कसे समर्थन करणार, असा सवाल आशिष शेलार यांनी उपस्थित केला.

आणखी वाचा

शिवडी मतदारसंघ पुन्हा एकदा चर्चेत; भाजपचा 'मोहरा' शिंदे गटातून लढणार?, तिरंगी लढत होणार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2025 | शुक्रवार
Satish Bhosale : सतीश भोसले उर्फ खोक्या भाईचे आणखी नवंनवीन कारनामे समोर; अंजली दमानियांकडून नवा व्हिडीओ शेयर
सतीश भोसले उर्फ खोक्या भाईचे आणखी नवंनवीन कारनामे समोर; अंजली दमानियांकडून नवा व्हिडीओ शेयर
औरंगजेबाच्या थडग्यासाठी गेल्या 10 वर्षातील सर्वाधिक निधी 2022 मध्ये; जाणून घ्या वर्षाला किती?
औरंगजेबाच्या थडग्यासाठी गेल्या 10 वर्षातील सर्वाधिक निधी 2022 मध्ये; जाणून घ्या वर्षाला किती?
Donald Trump : कॅनडा, मेक्सिकोनं अमेरिकन टोमॅटो खाणं सोडलं, सफरचंद सुद्धा दुसऱ्या देशाची घेतली; डोनाल्ड ट्रम्प यांनी 'टॅरिफ' नाद 30 दिवसांनी पुन्हा पुढे ढकलला!
कॅनडा, मेक्सिकोनं अमेरिकन टोमॅटो खाणं सोडलं, सफरचंद सुद्धा दुसऱ्या देशाची घेतली; डोनाल्ड ट्रम्प यांनी 'टॅरिफ' नाद 30 दिवसांनी पुन्हा पुढे ढकलला!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Prakash Mahajan On Gunaratna Sadavarte : सदावर्तेंच्या मेंदूतील पाण्याची पातळी कमी झालीयEkanth Shinde Vidhan Parishad | तो हिंमत आपकी बोलने की ना होती..एकनाथ शिंदेंचं संपूर्ण भाषणABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05PMAditi Tatkare on Ladki Bahin Yojna | उद्या लाडक्या बहि‍णींचा हप्ता जमा होणार- आदिती तटकरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2025 | शुक्रवार
Satish Bhosale : सतीश भोसले उर्फ खोक्या भाईचे आणखी नवंनवीन कारनामे समोर; अंजली दमानियांकडून नवा व्हिडीओ शेयर
सतीश भोसले उर्फ खोक्या भाईचे आणखी नवंनवीन कारनामे समोर; अंजली दमानियांकडून नवा व्हिडीओ शेयर
औरंगजेबाच्या थडग्यासाठी गेल्या 10 वर्षातील सर्वाधिक निधी 2022 मध्ये; जाणून घ्या वर्षाला किती?
औरंगजेबाच्या थडग्यासाठी गेल्या 10 वर्षातील सर्वाधिक निधी 2022 मध्ये; जाणून घ्या वर्षाला किती?
Donald Trump : कॅनडा, मेक्सिकोनं अमेरिकन टोमॅटो खाणं सोडलं, सफरचंद सुद्धा दुसऱ्या देशाची घेतली; डोनाल्ड ट्रम्प यांनी 'टॅरिफ' नाद 30 दिवसांनी पुन्हा पुढे ढकलला!
कॅनडा, मेक्सिकोनं अमेरिकन टोमॅटो खाणं सोडलं, सफरचंद सुद्धा दुसऱ्या देशाची घेतली; डोनाल्ड ट्रम्प यांनी 'टॅरिफ' नाद 30 दिवसांनी पुन्हा पुढे ढकलला!
महिला दिनाच्या निमित्ताने राज्यभरातील ग्रामपंचायतींनी बोलवली 'विशेष ग्रामसभा'; महिला सुरक्षेचा ठराव मांडणार
महिला दिनाच्या निमित्ताने राज्यभरातील ग्रामपंचायतींनी बोलवली 'विशेष ग्रामसभा'; महिला सुरक्षेचा ठराव मांडणार
मंदिरातील पुजारी अन् कुंभमेळ्यातील साधू पूर्ण कपड्यात असतात का? जरांगेंनी दाखवलेल्या व्हिडिओवर लक्ष्मण हाकेंचा सवाल
मंदिरातील पुजारी अन् कुंभमेळ्यातील साधू पूर्ण कपड्यात असतात का? जरांगेंनी दाखवलेल्या व्हिडिओवर लक्ष्मण हाकेंचा सवाल
निरोगी आरोग्यासाठी 'हा' ड्रायफ्रूट 'लय भारी'!
निरोगी आरोग्यासाठी 'हा' ड्रायफ्रूट 'लय भारी'!
Suresh Dhas & Satish Bhosale : सुरेश धसांचा सतीश भोसलेला 100 टक्के आशीर्वाद, म्हणाले, ऐ खोक्या, माझा...; ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने खळबळ
सुरेश धसांचा सतीश भोसलेला 100 टक्के आशीर्वाद, म्हणाले, ऐ खोक्या, माझा...; ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने खळबळ
Embed widget