एक्स्प्लोर
Advertisement
सोलापुरात राष्ट्रवादी पाठोपाठ काँग्रेसच्याही दोन विद्यमान आमदारांची उमेदवारीच्या मुलाखतींना दांडी
आमदार शरद रणपिसे यांच्या उपस्थितीत सोलापुरात विधानसभेसाठी इच्छुकांची मुलाखती सुरू आहेत. मागील काही दिवसांपासून आमदार भारत भालके आणि सिद्धाराम म्हेत्रे हे दोघेही भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्यातच त्यांनी मुलाखतीकडे पाठ फिरवल्याने या चर्चांना अधिक उदाहरण येण्याची शक्यता आहे.
सोलापूर : राष्ट्रवादी कॉंग्रेस पाठोपाठ कॉंग्रेसच्या दोन आमदारांनी इच्छुकांच्या मुलाखतीला दांडी मारली आहे. पंढरपूरचे आमदार भारत भालके आणि अक्कलकोटचे आमदार सिध्दाराम म्हेत्रे हे दोघेही या मुलाखतीला अनुपस्थितीत राहिले आहेत. आमदार शरद रणपिसे यांच्या उपस्थितीत सोलापुरात विधानसभेसाठी इच्छुकांची मुलाखती सुरू आहेत. मागील काही दिवसांपासून आमदार भारत भालके आणि सिद्धाराम म्हेत्रे हे दोघेही भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्यातच त्यांनी मुलाखतीकडे पाठ फिरवल्याने या चर्चांना अधिक उधाण येण्याची शक्यता आहे.
दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या इच्छुकांच्या मुलाखती अजित पवार यांच्या उपस्थितीत घेण्यात आल्या. त्यावेळीही बार्शीचे आमदार दिलीप सोपल आणि माढ्याचे आमदार बबन शिंदे हे दोघेही मुलाखतींना अनुपस्थित राहिले होते. आमदार दिलीप सोपल हे शिवसेनेच्या तर बबन शिंदे यांचे पुत्र रणजित शिंदे हे भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सुरू होत्या. सोलापुरातील हे चार आमदार मुलाखतींना अनुपस्थित राहिल्याने जिल्ह्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या भविष्याविषयी आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांनी परगावी असल्याचं कारण दिलं तर भारत भालके हे आऊट ऑफ कव्हरेज आहेत. तर इकडे आमदार प्रणिती शिंदे यांना काँग्रेसमधीलच अंतर्गत वादाला सामोरं जावं लागत आहे. शिंदे यांच्या सोलापूर मध्य मतदारसंघात काँग्रेसची व्होट बँक समजल्या जाणार्या मुस्लिम आणि मोची या दोन्ही समाजाने उमेदवारीवर आपला हक्क सांगितला आहे. आमदार प्रणिती शिंदे यांनी मोहोळमधून राखीव मतदारसंघातून निवडणूक लढवावी अशी या दोन्ही समाजाची मागणी आहे. मात्र मोहोळमध्ये निवडणूक न लढवता आपण मध्य सोलापूर मतदारसंघातूनच निवडणूक लढवणार असल्याचं आमदार प्रणिती शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे. एकूणच राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस या दोन्ही पक्ष्यांच्या इच्छुकांच्या मुलाखतीसाठी विद्यमान आमदारांपैकी फक्त आमदार प्रणिती शिंदे यांनी उपस्थिती लावली तर चार आमदारांनी दांडी मारल्याचं पाहायला मिळालं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
महाराष्ट्र
राजकारण
क्राईम
Advertisement