UP Election 2022 : लखीमपूर खेरीत EVM मध्येच टाकले फेविक्विक; मतदानात अडथळा, आत्तापर्यंत यूपीमध्ये 22.62 टक्के मतदान
यूपीत चौथ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया सुरू आहे. सकाळी सात वाजल्यापासूनच मतदानाला सुरूवात झाली आहे. आत्तापर्यंत 22.62 टक्के मतदानाची नोंद झाली आहे.
UP Election 2022 : उत्तर प्रदेशमध्ये आज चौथ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया सुरू आहे. सकाळी सात वाजल्यापासूनच मतदानाला सुरूवात झाली आहे. यूपीतील 9 जिल्ह्यातील 59 जागांवर आज मतदान होत आहे. आत्तापर्यंत यूपीमध्ये या 9 जिल्ह्यात 22.62 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. आत्तापर्यंत सर्वात कमी मतदान हे हरदोईमध्ये तर सर्वात जास्त पिलिभीतमध्ये सर्वात जास्त मतदान झाले आहे. काही ठिकाणी लोकांचा मतदनाला चांगला प्रतिसाद मिळत आहे तर काही ठिकाणी संमिश्र प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसत आहे. दरम्यान, आत्तापर्यंत कोणत्या जिल्ह्यात किती मतदान झाले ते पाहुयात...
कोणत्या जिल्ह्यात किती मतदान?
बांदा - 23.85 टक्के
फतेहपूर - 22.49 टक्के
हरदोई - 20.27 टक्के
काकडी - 26.29 टक्के
लखनौ - 21.42 टक्के
पिलिभीत - 27.43 टक्के
रायबरेली - 21.41 टक्के
सीतापूर - 21.99 टक्के
उन्नाव - 21.27 टक्के
अशा प्रकारे आत्तापर्यंत मतदानाची नोंद झाली आहे. आत्तापरयंत सर्वात जास्त मतदान हे पिलिभीतमध्ये 27043 टक्के झाले आहे. त्याठिकाणी मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. तर आत्तापर्यंत सर्वात कमी प्रतिसाद हा हरदोईमध्ये मिलत आहे. तिते आत्तापरर्यंत 20.27 टक्के
मतदान झाले आहे.
लखीमपूर खेरीत ईव्हीएममध्ये टाकले फेविक्विक
लखीमपूर खेरी येथील सदर विधानसभेतील कादीपूर सानी या गावात अज्ञात तरुणाने ईव्हीएममध्ये फेविक्विक टाकल्याने खळबळ उडाली आहे. फेविक्विक टाकल्याने बटण जाम झाले. त्यामुळे बराच वेळ मतदानात व्यत्यय आला आहे. मतदान विस्कळीत झाल्याने मोठ्या संख्येने मतदार रांगेत उभे होते आणि बराच वेळ ईव्हीएम सुरू होण्याची वाट पाहत होते.
उन्नावमध्ये बऱ्याच ठिकाणी मतदानावर बहिष्कार
उन्नावमध्ये अनेक ठिकाणी लोकांनी मतदानावर बहिष्कार टाकला आहे. लखनौमधील बीकेटीच्या मल्हानखेडा येथील बूथवर मोजकेच मतदार पोहोचल्याचे पाहायला मिळाले. येथील ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकला होता. येथे सर्वजण मतदान करतील, असा दावा अधिकाऱ्यांनी केला होता, मात्र सकाळी मतदान केंद्रावर बरीच शांतता होती.
या चौथ्या टप्प्यात एकूण 2.12 कोटी मतदार मतादानाचा हक्क बजावणार आहेत. या टप्प्यात 624 उमेदवारांचे भवितव्य आज मतपेटीत बंद होणार आहे. 2017 मध्ये झालेल्या गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने या 59 पैकी 51 जागा जिंकल्या होत्या. याशिवाय समाजवादी पार्टीला चार, बसपाला तीन आणि भाजपचा मित्रपक्ष अपना दलला एक जागा मिळाली होती.