एकनाथ शिंदे-फडणवीसांचा मोठा डाव, आदित्य ठाकरेंविरुद्ध उतरवला खासदार; वरळीत तिरंगी लढत फिक्स
वरळी आणि वरळीकरांना मी न्याय देऊ शकतो असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझ्यावर दाखवला.
मुंबई : राजधानी मुंबईतील आणि शिवसेना पक्षाच्या अस्तित्वाची लढाई असलेल्या वरळी विधानसभेत एकनाथ शिंदे यांनी अखेर मोठा डाव टाकला असून आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्याविरोधात वरळी विधानसभेत शिवसेनेकडून राज्यसभा खासदार मिलिंद देवरा यांना मैदानात उतरविण्यात आलय. मिलिंद देवरा (Milind Deora) सध्या राज्यसभेचे खासदार आहेत. मात्र, त्यांना आमदारकीसाठी वरळीतून मैदानात उतरवण्यात आलंय. सध्या वरळी विधानसभेत विद्यमान आमदार शिवसेना ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे यांच्याविरुद्ध मनसेने संदीप देशपांडे यांना उमदेवारी दिली आहे. त्यातच आता शिवसेना शिंदे गटाकडूनही उमदेवार उतरविण्यात आल्याने वरळी विधानसभेत तिहेरी लढत फायनल झाली आहे. वरळीकरांना अनेक वर्ष न्यायची प्रतीक्षा होती. मात्र, आता आम्ही आमचे व्हिजन मांडणार, अशी पोस्ट देवरा यांनी केली आहे.
वरळी आणि वरळीकरांना मी न्याय देऊ शकतो असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझ्यावर दाखवला. लवकरच आम्ही वरळी मतदारसंघाबाबत आमचं पुढील धोरण जाहीर करू, असे म्हणत मिलिंद देवरा यांनी उमेदवारी जाहीर झाल्याचं जाहीर केलं, तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले. मिलिंद देवरा यांनी ट्विटरवरुन आपल्या उमेदवारीबाबत स्वत: माहिती दिली आहे. त्यामुळे, वरळी विधानसभा मतदारसंघातील सस्पेन्स संपला असून आता येथील मतदारसंघात तिरंगी लढत निश्चित झाली आहे. वरळी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आदित्य ठाकरे यांना पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलं आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत मनसेनं आदित्य ठाकरे यांच्याविरोधात उमेदवार रिंगणात उतरवला नव्हता. मात्र, आता राज ठाकरे यांची महायुतीशी जवळीक वाढल्यानं त्यांच्याकडून आदित्य ठाकरे यांच्या पराभवासाठी महायुतीला मदत केली जाऊ शकते. वरळीत मनसेकडून संदीप देशपांडे यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. याशिवाय, भाजपकडून शायना एनसी यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात बैठकीत पार पडली. या बैठकीत वरळीचा गड आपल्याकडे घेण्यासाठी आणि आदित्य ठाकरेंना शह देण्यासाठी मास्टर प्लान तयार करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.
Chief Minister @mieknathshinde ji believes that justice for #Worli & Worlikars is long overdue.
— Milind Deora | मिलिंद देवरा ☮️ (@milinddeora) October 25, 2024
Together, we're paving the way forward & will share our vision soon.
It’s Worli NOW!
हेही वाचा
एकनाथ शिंदे-फडणवीसांचा मोठा डाव, आदित्य ठाकरेंविरुद्ध उतरवला खासदार; वरळीत तिरंगी लढत फिक्स