एक्स्प्लोर
Advertisement
शिवरायांबाबत अक्षेपार्ह विधान करणाऱ्या श्रीपाद छिंदमला बसपाची उमेदवारी
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरलेल्या श्रीपाद छिंदमला राज्यभरातून रोषाचा सामना करावा लागला होता. तरी देखील अहमदनगरच्या जनतेने मात्र त्याला स्वीकारले आहे.
अहमदनगर : शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलेल्या श्रीपाद छिंदम यांनी अहमदनगर शहर मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे. श्रीपाद छिंदम यांनी बहुजन समाज पार्टी पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. छिंदम यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने वादाच्या भोवऱ्यात सापडला होता.
एकीकडे शिवसेनेकडून अनिल राठोड तर राष्ट्रवादीकडून संग्राम जगताप निवडणूक लढवत आहेत. त्यातच आता श्रीपाद छिंदम याने निवडणुकीत उडी घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरलेल्या श्रीपाद छिंदमला राज्यभरातून रोषाचा सामना करावा लागला होता. तरी देखील अहमदनगरच्या जनतेने मात्र त्याला स्वीकारले आहे. अहमदनगर महापालिका निवडणुकीत श्रीपाद छिंदम वॉर्ड क्रमांक 9 मधून 2000 पेक्षा जास्त मते घेऊन विजयी झाले होते.
अहमदनगर महानगर पालिकेच्या निवडणुकीत अपक्ष नगरसेवक म्हणून निवडून आले. आणि आता विधानसभा निवडणुकीत श्रीपाद छिंदम याने उडी घेतलीये.
शिवरायांचा अवमान करणारा छिंदम शिवरायांसमोरच नतमस्तक | अहमदनगर | एबीपी माझा
श्रीपाद छिंदम यांचं शिवरायांबाबतचं अक्षेपार्ह विधान काय होतं?
श्रीपाद छिंदमने एका कामासंदर्भात बांधकाम विभागाचे कर्मचारी अशोक बिडवे यांना फोन केला. यावेळी बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरले. छिंदमने महाराजांबद्दल वापरलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. त्यानंतर सर्वच स्तरातून छिंदमवर टीका सुरु झाली. 16 फेब्रुवारीला श्रीपाद छिंदम याला पोलिसांनी अटक केली होती.
छिंदमविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याला तुरुंगवासही भोगावा लागला होता. छिंदमला सशर्त जामीन मंजूर झाल्यानंतर तो अज्ञातस्थळी गेला होता. राजकीय अकसापोटी मला गुंतवण्यात आल्याचं आपल्या जामीन अर्जात त्याने म्हटलं होतं.
अहमदनगर : भाजपच्या उपमहापौरांचं शिवरायांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य
संबंधित बातम्या
शिवरायांचा अवमान करणारा छिंदम शिवरायांसमोरच नतमस्तक
शिवरायांचा अवमान करणारा छिंदम विजयी
श्रीपाद छिंदम 15 दिवसांसाठी अहमदनगरमधून तडीपार
छिंदम हजेरीसाठी पोलीस ठाण्यात आलाच नाही!
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
व्यापार-उद्योग
निवडणूक
Advertisement