एक्स्प्लोर

एक्झिट पोल 2024

(Source:  Poll of Polls)

Nashik News : मनमाडच्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या शहरप्रमुखाला मारहाण, सुहास कांदे समर्थकांकडून मारहाण झाल्याचा आरोप, तक्रार दाखल करणं सुरु

Nashik News :  नांदगाव मतदार संघ विविध घडामोडींमुळं राज्यभर चर्चेत राहिला. आमदार सुहास कांदे यांच्या समर्थकांकडून शिवसेना ठाकरे गटाच्या शहरप्रमुखाला मारहाणीचा आरोप करण्यात आला आहे.

नाशिक : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसाठी 288 मतदारसंघांमध्ये मतदान पार पडलं. महाराष्ट्रात एकूण 62.87 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. नाशिक जिल्ह्यातील नांदगाव मतदारसंघ राज्यभर चर्चेत राहिला आहे. शिवसेना आमदार आणि उमेदवार सुहास कांदे यांनी अपक्ष उमेदवार समीर भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपावरुन नांदगाव विधानसभा मतदारसंघ राज्यभर चर्चेत आला होता. त्यानंतर पुन्हा एकदा नांदगाव मतदासंघ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शहरप्रमुखांना मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. आमदार सुहास कांदे यांच्या समर्थकांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येत आहे. 

 मनमाड शहरात मारहाणीची घटना घडली आहे. मनमाड शिवसेना ( ठाकरे गट ) शहर प्रमुखाला मारहाण झाल्याचा प्रकार घडला आहे. आ. सुहास कांदे समर्थकांकडून मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आला असून मनमाड पोलीस स्थानकात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

नांदगाव मतदार संघातील मनमाड शहरात सायंकाळी उशिरा एक मारहाणीची घटना घडली. मतदानाची वेळ संपल्यानंतर सेंट झेवियर हायस्कूल येथे गेट बंद करण्याच्या प्रकरणावरून शिवसेना उबाठा गटाचे शहरप्रमुख यांना मारहाण झाल्याची घटना घडली आहे. ही मारहाण आमदार सुहास कांदे यांच्या कार्यकर्त्यानी केल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे.  रात्री उशिरा मनमाड पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्याचे काम सूरू होते..

दरम्यान, आज सकाळ पासून मनमाड शहरात शांततेत मतदान सुरू होते मात्र सायंकाळी किरकोळ वादातून झालेल्या प्रकारामुळे मतदानाला गालबोट लागले. 

मनमाडमध्ये कोण कोण रिंगणात?

नांदगाव मतदार संघ हा राज्यात चर्चेत राहिल्याने मतदान केंद्रावर पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता. नांदगाव विधानसभा मतदारसंघात चौरंगी लढत होत असून शिवसेना ( शिंदे गट ) आमदार सुहास कांदे, अपक्ष उमेदवार माजी खासदार समीर भुजबळ, शिवसेना ( ठाकरे गटाचे ) गणेश धात्रक, अपक्ष डॉ.रोहन बोरसे यांच्यात लढत होत आहे.

नांदगांव विधानसभा मतदारसंघात मतदानाच्या दिवशी महायुतीचे उमेदवार सुहास कांदे आणि अपक्ष उमेदवार समीर भुजबळ समोरासमोर आल्यानं सकाळी राडा झाला होता. सुहास कांदे हे मतदारांना डांबून ठेवत बोगस मतदान करण्यासाठी घेऊन जात असल्याचा  आरोप समीर भुजबळ यांनी केला. तसेच मतदारांना पुढे जाऊ देणार नाही, असा इशारा दिल्यानंतर सुहास कांदे आणि समीर भुजबळ समोरा समोर आल्याचं पाहायला मिळालं. 

इतर बातम्या : 

महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये निकराची झुंज; 'या' तीन EXIT पोलनुसार अपक्षांकडे सत्तेच्या 'चाव्या' जाणार!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Exit Poll: महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
Maharashtra Exit Polls Result 2024:  निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
मोठी बातमी: निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Politics Rada | नेत्यांचे 'राडे' राजकीय संस्कृतीचे 'धिंडवडे'Sharad Koli on Praniti Shinde : प्रणिती शिंदे तुला काय तुझ्याबापाला सुद्धा भीत नाही...Maharashtra Exit Poll | झीएआयच्या सर्वेनुसार मराठवाड्यात मविआला 24-29 जागा मिळण्याची शक्यताABP MajhaPune Vidhansabha Exit Poll : दादा, शिंदे, फडणवीस की ठाकरे? मतदानानंतर पुणेकरांचा कौल कुणाला?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Exit Poll: महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
Maharashtra Exit Polls Result 2024:  निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
मोठी बातमी: निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
Maharashtra Exit Polls Result 2024: कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
Maharashtra Exit Polls Result 2024 : कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारसह पश्चिम महाराष्ट्रात कोणाला किती जागा? एक्झिट पोलमधील आकडेवारी समोर!
कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारसह पश्चिम महाराष्ट्रात कोणाला किती जागा? एक्झिट पोलमधील आकडेवारी समोर!
Exit Poll: मराठवाड्यात भाजपला फटका, जरांगे पॅटर्नमुळे महाविकास आघाडीचं पारडं जड; कोणाला किती जागा?
Exit Poll: मराठवाड्यात भाजपला फटका, जरांगे पॅटर्नमुळे महाविकास आघाडीचं पारडं जड; कोणाला किती जागा?
Maharashtra Exit Polls Result : राज्यात काँग्रेसला किती जागा मिळणार? एक्झिट पोलची धक्कादायक आकडेवारी समोर
राज्यात काँग्रेसला किती जागा मिळणार? एक्झिट पोलची धक्कादायक आकडेवारी समोर
Embed widget