गोव्यात काँग्रेस हाच सर्वात मोठा पक्ष असेल, प्रमोद सावंत निवडून येणं अवघड, संजय राऊत यांचं भाकीत
गोव्यात भाजपला बहुमत मिळणार नसल्याचे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले. कारण, भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी जमीनीवरचं वातावरण चांगलं नसल्याचे राऊत म्हणाले.
Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस हे गोवा राज्याचे मुख्यमंत्री होऊ शकत नाहीत. राज्य छोटे आहे, जबाबदारी मोठी आहे. म्हणून माझ्या त्यांना शुभेच्छा असल्याचे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले. जमीनीवरचं वातावरण देवेंद्र फडणवीस आणि भाजपसाठी चांगलं नाही. स्वत: मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचं निवडून येणं अवघड असल्याचे भाकीत संजय राऊत यांनी केले आहे. भाजपला गोव्यात बहुमत मिळणार नाही. काँग्रेस हाच गोव्यात सर्वात मोठा पक्ष असेल. बघूयात या घोडेबाजारात सत्ता कोण मिळवते असे राऊत म्हणाले.
मतांचे विभाजन झालं तर भाजपला फायदा
गोव्यात आम्ही कमी पडलो हे मान्य आहे, पण येणाऱ्या काही वर्षात शिवसेनेचा पणजीत आमदार असेल हे तुम्हाला मी आता सांगतो असा विश्वास यावेळी राऊत यांनी व्यक्त केला. यावेळी बोलताना राऊत यांनी गोवा काँग्रेसलाही टोला ललगावला. काँग्रेस आपल्या उमेदवारांना मंदिरात शपथ देत आहे. हे पक्ष स्व:ताला सेक्युलर पक्ष म्हणतात. हे कसले सेक्युलर पक्ष असेही राऊत यावेळी म्हणाले. आम आदमी पार्टी आणि तृणमूल काँग्रेस या दोन्ही पक्षांवर भाजपची B टीमचा असल्याचा आरोप होत आहे. असू शकत, कारण दोन्ही पक्षांची इथ ताकत नाही. पण मतांचे विभाजन झालं तर निश्चित भाजपला फायदा होईल, म्हणून सगळ्यांनी मिळून त्याचा विचार केला पाहिजे असे राऊत यांनी यावेळी सांगितले.
आमचीही वेळ येईल तेव्हा काय कराल
भाजप गोव्यात दिवंगत मनोहर पर्रिकर यांच्या नावाने मत मागते आणि दुसरीकडे त्यांच्या मुलांसोबत अशी वागणूक हे योग्य नाही. याचा परिणाम निश्चित या निवडणुकीत भाजपला होणार असल्याचं त्यांनी सांगितले. भाजप मला तुरुंगात टाकण्यासाठी निरअपराध लोकांना त्रास देत आहे. प्रविण राऊत यांची अटक फक्त मला अडकविण्यासाठी आहे. पण किती दिवस, दिल्लीत कोणी अमर पट्टा घेऊन येत नाही. आमचीही वेळ येईल तेव्हा काय कराल, असा सवालही राऊत यांनी यावेळी उपस्थित केला. आमच्याकडेही सगळी माहिती आहे. दिल्लीतून, महाराष्ट्रातून कुठे कुठे पैसे जातो, पैसा कोण पुरवते. दिल्लीमध्ये एक व्यक्ती कोणाचे पैसे कुठे पुरवतो हे आम्हाला माहित आहे. योग्य वेळी मी सविस्तर बोलेन असे राऊत यांनी यावेळी सांगितले.
ठाकरे सरकारला बदनाम करण्यासाठी भाजपकडून तपास यंत्रणांचा वापर
पोलिसांची बदली करण्याचा अधिकार हा राज्या सरकारचा आहे. कोणती यादी अधिकृत आणि कोणती अनधिकृत हे ठरवणारी सीबीआय, ईडी कोण असेही राऊत यावेळी म्हणाले. भाजप फक्त ठाकरे सरकारला बदनाम करण्यासाठी या तपास यंत्रणांचा वापर करत असल्याचा आरोप राऊत यांनी केला. परमबीरला संरक्षण कोणी दिलं. भाजपनेच ना. मग कोणच्या स्टेटमेंटवरुन काय आरोप करताय असेही ते म्हणाले. दरम्यान, अमृता फडणवीस यांच्या वक्तव्यावर देखील राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला, यावेळी राऊत यांनी बोलण्यास नकार दिला. मी त्यांच्यावर भाष्य करणार नाही, बोलू दे त्यांना, जर देवेंद्र फडणवीस बोलले तर मी उत्तर देईन असे राऊत यांनी यावेळी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या: