एक्स्प्लोर

Shivsena Candidate List : राज्यसभा खासदार, माजी खासदार, विधानपरिषदेचे आमदार शिदेंकडून विधानसभेच्या मैदानात

Shivsena Candidate List : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची दुसरी यादी जाहीर झाली आहे. या यादीत दिग्गजांना स्थान देण्यात आलं आहे.

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून विधानसभा निवडणुकीसाठी 20 उमेदवारांच्या दुसऱ्या यादीची घोषणा केली आहे. शिवसेनेनं पहिल्या यादीत 45 उमेदवारांना स्थान दिलं होतं. आतापर्यंत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं 65 उमेदवार जाहीर केले आहेत. महायुतीच्या जागावाटपा संदर्भातील बैठकांचं सत्र सुरु असताना  शिवसेनेची दुसरी यादी आलेली आहे. शिवसेनेच्या दुसऱ्या यादीत मिलिंद देवरा, संजय निरुपम, आमदार भावना गवळी, निलेश राणे, आमदार आमश्या पाडवी विधानसभेच्या रिंगणात उतरले आहेत. 

राज्यसभेचे खासदार आदित्य ठाकरेंविरुद्ध मैदानात

एकनाथ शिंदेंकडून राज्यसभा खासदार मिलिंद देवरा यांना आदित्य ठाकरेंविरुद्ध मैदानात उतरवलं आहे. आदित्य ठाकरे वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. मिलिंद देवरा हे वरळीतून विधानसभा निवडणूक लढवणार आहेत.

माजी खासदार रिंगणात

एकनाथ शिंदे यांच्या दुसऱ्या यादीत संजय निरुपम आणि निलेश राणे या दोन माजी खासदारांना स्थान देण्यात आलं आहे. संजय निरुपम दिंडोशी विधानसभा लढवणार आहेत. ते सुनील प्रभू यांच्या विरोधात निवडणूक लढवतील. निलेश राणे हे देखील माजी खासदार असून ते कुडाळ विधानसभा मतदारसंघातून लढणार असून त्यांच्या विरुद्ध वैभव नाईक हे रिंगणात आहेत. 

विधानपरिषदेचे दोन आमदार रिंगणात 

विधानपरिषद आमदार आमश्या पाडवी आणि  आमदार भावना गवळी या विधानसभा निवडणूक लढवत आहेत. भावना गवळी देखील माजी खासदार आहेत. आमश्या पाडवी हे अक्कलकुवा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. काँग्रेसच्या के.सी. पाडवी यांच्या विरुद्ध आमश्या पाडवी निवडणूक लढवणार आहेत. भावना गवळी या वाशिमच्या रिसोडमधून निवडणूक लढवणार आहेत. महाविकास आघाडीत रिसोडची जागा काँग्रेसकडे असून त्यांनी अमित झनक यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळं रिसोडमध्ये अमित झनक विरुद्ध भावना गवळी अशी लढत होईल. 

बाबुराव कदम कोहळीकर यांना उमेदवारी

हिंगोली लोकसभा मतदारसंघातून बाबुराव कदम कोहळीकर यांना पराभव स्वीकारावा लागला होता.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून बाबुराव कदम कोहळीकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. नांदेडच्या हदगाव विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. 

अंधेरीत मुरजी पटेल तर कोल्हापूर उत्तरमध्ये राजेश क्षीरसागर 

एकनाथ शिंदे यांनी अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातून भाजपमधून प्रवेश केलेल्या मुरजी पटेल यांना उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघातून स्वीकृती शर्मा इच्छुक होत्या. तर, कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून राजेश क्षीरसागर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. 

इतर बातम्या :

Shivsena Eknath Shinde 2nd Candidate List : शिंदेंची शिवसेनेची 20 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, कुडाळमधून निलेश राणेंना तिकीट, भावना गवळींना रिसोडमधून उमेदवारी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Hasan Mushrif : हसन मुश्रीफांचे कागलमध्ये विराट शक्तीप्रदर्शन, म्हणाले रोहित पवार काय आणि कोणी आलं तरी..!
हसन मुश्रीफांचे कागलमध्ये विराट शक्तीप्रदर्शन, म्हणाले रोहित पवार काय आणि कोणी आलं तरी..!
जिथं वडिलांचा पराभव जागा ती जागा परत मिळवायचीय; अर्ज भरताना निलेश राणेंनी सांगितला वेदना
जिथं वडिलांचा पराभव जागा ती जागा परत मिळवायचीय; अर्ज भरताना निलेश राणेंनी सांगितला वेदना
Bomb Threat to Tirupati Temple: दहशतवाद्यांच्या निशाण्यावर तिरुपती मंदीर? धमकीच्या ईमेलनं देशभरात खळबळ
दहशतवाद्यांच्या निशाण्यावर तिरुपती मंदीर? धमकीच्या ईमेलनं देशभरात खळबळ
Maharashtra Assembly Elections 2024 : भोसरीत भाजपच्या महेश लांडगेंची कोंडी, विलास लांडे अजितदादांच्या राष्ट्रवादीत राहून थोरल्या पवारांच्या उमेदवाराचा करणार प्रचार
भोसरीत भाजपच्या महेश लांडगेंची कोंडी, विलास लांडे अजितदादांच्या राष्ट्रवादीत राहून थोरल्या पवारांच्या उमेदवाराचा करणार प्रचार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amit Thackeray File Nomination : पहिल्यांदा विधानसभा लढवणार. अर्ज भरण्यापूर्वी अमित ठाकरे काय बोलले?ABP Majha Marathi News Headlines maharshtra poltics Vidhansabha 2024Eknath Shinde Nomination Form | जोरदार शक्तीप्रदर्शन करत मुख्यमंत्री शिंदे भरणार उमेदवारी अर्जSharad Pawar On Maharashtra Vidhansabha :  महाराष्ट्रात सत्तापरिवर्तन करायचंय, शरद पवार काय बोलले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : हसन मुश्रीफांचे कागलमध्ये विराट शक्तीप्रदर्शन, म्हणाले रोहित पवार काय आणि कोणी आलं तरी..!
हसन मुश्रीफांचे कागलमध्ये विराट शक्तीप्रदर्शन, म्हणाले रोहित पवार काय आणि कोणी आलं तरी..!
जिथं वडिलांचा पराभव जागा ती जागा परत मिळवायचीय; अर्ज भरताना निलेश राणेंनी सांगितला वेदना
जिथं वडिलांचा पराभव जागा ती जागा परत मिळवायचीय; अर्ज भरताना निलेश राणेंनी सांगितला वेदना
Bomb Threat to Tirupati Temple: दहशतवाद्यांच्या निशाण्यावर तिरुपती मंदीर? धमकीच्या ईमेलनं देशभरात खळबळ
दहशतवाद्यांच्या निशाण्यावर तिरुपती मंदीर? धमकीच्या ईमेलनं देशभरात खळबळ
Maharashtra Assembly Elections 2024 : भोसरीत भाजपच्या महेश लांडगेंची कोंडी, विलास लांडे अजितदादांच्या राष्ट्रवादीत राहून थोरल्या पवारांच्या उमेदवाराचा करणार प्रचार
भोसरीत भाजपच्या महेश लांडगेंची कोंडी, विलास लांडे अजितदादांच्या राष्ट्रवादीत राहून थोरल्या पवारांच्या उमेदवाराचा करणार प्रचार
Devendra Bhuyar: मोठी बातमी : भाजपने एबी फॉर्म दिलेल्या मतदारसंघात अजित पवारांनीही उमेदवार उतरवला, ठिणगी पडणार की मैत्रीपूर्ण लढत?
भाजपने एबी फॉर्म दिलेल्या मतदारसंघात अजित पवारांनीही उमेदवार उतरवला, ठिणगी पडणार की मैत्रीपूर्ण लढत?
Khanapur Vidha Sabha : खानापुरात सुहास बाबर विरुद्ध वैभव पाटील यांच्यात थेट लढत; राजेंद्र अण्णा देशमुख काय करणार?
खानापुरात सुहास बाबर विरुद्ध वैभव पाटील यांच्यात थेट लढत; राजेंद्र अण्णा देशमुख काय करणार?
Kagal Vidhan Sabha : वीरेंद्र मंडलिक अर्ज भरणार की नाही? हसन मुश्रीफांच्या रॅलीत संजय मंडलिकांची मोठी घोषणा
वीरेंद्र मंडलिक अर्ज भरणार की नाही? हसन मुश्रीफांच्या रॅलीत संजय मंडलिकांची मोठी घोषणा
Kolhapur Uttar Vidhan Sabha : कोल्हापूर उत्तरमध्ये राजेश लाटकरांना कडाडून विरोध; उमेदवार बदलण्यासाठी 26 माजी नगरसेवकांचे सतेज पाटलांना पत्र
हा तर लादलेला उमेदवार! कोल्हापूर उत्तरमध्ये राजेश लाटकरांना कडाडून विरोध; 26 माजी नगरसेवकांचे सतेज पाटलांना पत्र
Embed widget