Shivsena Eknath Shinde 2nd Candidate List : शिंदेंची शिवसेनेची 20 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, कुडाळमधून निलेश राणेंना तिकीट, भावना गवळींना रिसोडमधून उमेदवारी
Shivsena Eknath Shinde 2nd Candidate List : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची दुसरी उमेदवार यादी जाहीर झाली आहे.
Shivsena Eknath Shinde 2nd Candidate List : महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्या मैदानात उतरल्या आहेत. दोन्ही आघाड्यांमधील पक्षांनी आपल्या उमेदवार यादी जाहीर केल्या आहेत. भारतीय जनता पक्षाने आत्तापर्यंत 121 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. तर शिंदेंच्या शिवसेनेने 45 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. त्यानंतर आज शिंदेंच्या शिवसेनेने आणखी एक उमेदवार यादी जाहीर केली आहे. यामध्ये देखील दिग्गजांना संधी देण्यात आली आहे. आतापर्यंत शिवसेनेचे एकूण मिळून 65 उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत.
शिंदेंच्या शिवसेनेची दुसरी उमेदवारी यादी जाहीर
1.अक्कलकुवा - आमश्या पाडवी
2.बाळापूर- बळीराम शिरसकर
3.रिसोड - भावना गवळी
4.हदगाव- बाबुराव कदम कोहळीकर
5.नांदेड दक्षिण- आनंद तिडके पाटील (बोंडारकर)
6. परभणी - आनंद शेशराव भरोसे
7. पालघर - राजेंद्र घेड्या गावित
8. बोईसर (अज) - विलास सुकुर तरे
9.भिवंडी ग्रामिण (अज) - शांताराम तुकाराम मोरे
10. भिवंडी पूर्व - संतोष मंजय्या शेट्टी
11.कल्याण पश्चिम - विश्वनाथ आत्माराम भोईर
12.अंबरनाथ (अजा) - डॉ बालाजी प्रल्हाद किणीकर
13. विक्रोळी - सुवर्णा सहदेव करंजे
14. दिंडोशी - संजय ब्रिजकिशोरलाल निरुपम
15. अंधेरी पूर्व - मुरजी कांनजी पटेल
16. चेंबूर - तुकाराम रामकृष्ण काते
17. वरळी - मिलींद मुरली देवरा
18. पुरंदर - विजय सोपानराव शिवतारे
19. कुडाळ - निलेश नारायण राणे
20. कोल्हापुर उत्तर - राजेश विनायक क्षिरसागर
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून परभणीत आनंद भरोसे यांना उमेदवारी जाहीर
आनंद भरोसे यांनी कालच भाजपमधून शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता
भाजपाला जागा सुटणार नसल्याने भरोसे यांनी शिवसेनेचा पर्याय निवडला
हदगांव हिमायतनगर मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाकडून बाबुराव कदम कोहलीकर यांना उमेदवार देण्यात आली आहे. हिंगोली लोकसभेतून सुद्धा कोहलीकर यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यात त्यांचा पराभव झाला होता. मात्र विधानसभेत त्यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. माधवराव पाटील जवळगांवकर यांचा सोबत त्यांचा सामना होणार आहे.
शिंदेंच्या शिवेसेनेची पहिली उमेदवार यादी
1. एकनाथ शिंदे - कोपरी पाचपाखाडी
2. साक्री - मंजुळा गावीत
3. चोपडा - चंद्रकांत सोनवणे
4. जळगाव ग्रामीण - गुलाबराव पाटील
5. पाचोरा - किशोर पाटील
6. एरंडोल - अमोल पाटील
7. मुक्ताईनगर - चंद्रकांत पाटील
8. बुलढाणा - संजय गायकवाड
9. मेहकर - संजय रायमुलकर
10.दर्यापूर - अभिजीत अडसूळ
11. आशिष जयस्वाल - रामटेक
12. भंडारा - नरेंद्र भोंडेकर
13. दिग्रस - संजय राठोड
14. नांदेड उत्तर - बालाजी कल्याणकर
15.कळमनुरी - संतोष बांगर
16. जालना - अर्जुन खोतकर
17.सिल्लोड - अब्दुल सत्तार
18.छ संभाजीनगर मध्य - प्रदीप जयस्वाल
19. छ. संभाजीनगर पश्चिम - संजय सिरसाट
20. पैठण - रमेश भूमरे
21.वैजापूर - रमेश बोरनारे
22.नांदगाव - सुहास कांदे
23. मालेगाव बाह्य - दादाजी भूसे
24. ओवळा माजीवडा - प्रताप सरनाईक
25. मागाठाणे - प्रकाश सुर्वे
26. जोगेश्वरी पूर्व - मनीषा वायकर
27. चांदिवली - दिलीप लांडे
28. कुर्ला - मंगेश कुडाळकर
29. माहीम - सदा सरवणकर
30. भायखळा - यामिनी जाधव
31. कर्जत महेंद्र थोरवे
32. अलिबाग - महेंद्र दळवी
33. महाड - भरत गोगावले
34. उमरगा - ज्ञानराज चौगुले
35. सांगोला - शहाजीबापू पाटील
36. कोरेगाव - महेश शिंदे
37. परांडा - तानाजी सावंत
38. पाटण - शंभूराज देसाई
39. दापोली - योगेश कदम
40. रत्नागिरी - उदय सामंत
41. राजापूर - किरण सामंत
42. सावंतवाडी - दीपक केसरकर
43. राधानगरी - प्रकाश आबिटकर
44. करवीर - चंद्रदीप नरके
45. खानापूर - सुहास बाबर
इतर महत्त्वाच्या बातम्या