अखेर ठरलं, उद्या शिवसेना-भाजप युतीची घोषणा होणार, सूत्रांची माहिती
अखेर भाजप-शिवसेना युतीच्या घोषणेचा मुहूर्त ठरलाय, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. उद्या भाजप-शिवसेनेच्या संयुक्त पत्रकार परिषदेत युतीची घोषणा होण्याची शक्यता आहे.
मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेची युती होणार की नाही हा सवाल होता, पण अखेर भाजप-शिवसेना युतीच्या घोषणेचा मुहूर्त ठरलाय, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. उद्या भाजप-शिवसेनेच्या संयुक्त पत्रकार परिषदेत युतीची घोषणा होण्याची शक्यता आहे.
उद्या होणाऱ्या संयुक्त पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे युतीची घोषणा करतील आहे. भाजप-शिवसेनेचा जागावाटपाचा फार्म्युला अंतिम टप्प्यात असल्याची माहितीदेखील सूत्रांनी दिली आहे.
भाजप-शिवसेना युतीसाठी चर्चेत असणारे हेच ते 5 जागावाटप फॉर्म्युले!
युतीचा फॉर्म्युला लोकसभेवेळीच ठरला आहे , उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद
आज रात्री युतीच्या जागावाटपाच्या फार्म्युल्यावर शिक्कामोर्तब केलं जाणार आहे. उद्या संध्याकाळपर्यंत उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री युतीची घोषणा करतील. दरम्यान थोड्यावेळापूर्वी उद्धव ठाकरेंनी आमदारांची मातोश्रीवर तातडीची बैठक बोलवली.
शिवसेना-भाजपचा 126-162 जागांचा फॉर्म्युला ठरला : सूत्र
या बैठकीत युतीच्या फार्म्युल्यावर चर्चा होणार आहे. तसेच ज्या जागांवर वाटाघाटी होतील त्या आमदारांना बैठकीत विश्वासात घेण्याचं काम उद्धव ठाकरे करतील. मुख्यत: पुणे, सातारा, कोल्हापूर, नागपूर या ठिकाणच्या काही जागांचा पेच उद्धव ठाकरे कसे हाताळतील हे पाहण्याचं औत्सुक्याचं ठरणार आहे.
जे शिवसेनेच्या वाट्याला येईल ते घेऊन लढू : अनिल देसाई
संबंधित बातम्या