एक्स्प्लोर

Andheri Bypoll Result :मशाल भडकली, भगवा फडकला; लटकेंच्या विजयानंतर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

Andheri East bypoll 2022 : अंधेरी पोटनिवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांनी विजय मिळवला. या विजयानंतर मशाल भडकली, भगवा फडकला अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.

Andheri East bypoll 2022 : मशाल भडकली, भगवा फडकला अशी प्रतिक्रिया ऋतुजा लटके यांच्या विजयानंतर उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. अंधेरी पोटनिवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांनी विजय मिळवला. त्यानंतर उद्धव ठाकरे आणि ऋतुजा लटके यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते.    

"जनता आमच्यासोबत आहे हे आजच्या निकालाने स्पष्ट केलं. ही आता सुरूवात झाली आहे. लढाईची सुरूवातच विजयाने झाली आहे. या पुढेचे देखील सर्व विजय मिळवेन. आमचं नाव आणि चिन्ह गोठवलं. परंतु, ज्या निवडणुकीसाठी चिन्ह गोठवलं ती निवडणूकच विरोधकांनी लढवली नाही. चिन्ह कुठलं पण असो जनता आमच्यासोबत आहे. पराभवाचा अंदाज आल्याने त्यांनी माघार घेतली. शिवाय नोटाला जी मतं पडली तीच मतं विरोधकांना पडली असती, असा टोला उद्धव ठाकरे यांनी यावेळी भाजपसह शिंदे गटाला लगावला.  

उद्धव ठाकरे यांनी यावेळी भाजपसह पंतप्रधान नरेंद्र मोदींवर देखील टीका केली. "जमिनीवरचे प्रकल्प गुरजरातला गेले आणि हवेतले प्रक्लप महाराष्ट्रात आले. परंतु, आता गुजरातची निवडणूक जाहीर झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं महाराष्ट्र प्रेम उफाळून आलं आणि त्यांनी महाराष्ट्रासाठी काही हवेतील प्रक्लप देण्याची घोषणा केली, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.   

अंधेरी पूर्व येथील आमदार रमेश लटके यांच्या निधनाने ही पोटनिवडणूक झाली. शिवसेना ठाकरे गट आणि महाविकास आघाडीकडून रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. या पोटनिवडणुकीत अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. भाजपने या निवडणुकीसाठी मुरजी पटेल यांची उमेदवारी जाहीर केली होती. मात्र, ऐनवेळी भाजपने उमेदवार माघारी घेतला. परंतु, काही अपक्षांनी अर्ज कायम ठेवल्याने 3 नोव्हेंबर रोजी ही निवडणूक झाली. त्यानंतर आज मतमोजनी जाली. यात ऋतुजा लटके यांनी जवळपास 53471  मतांनी विजय मिळवला आहे. 

निवडणूक आयोगाकडून मिळालेल्या माहितीनुसार, अंधेरी पोट निवडणुकीसाठी 86570 मतदान झाले. यातील ऋतुजा लटके यांना 66530 मते मिळाली.  दोन नंबरचे अपक्ष उमेदवार राजेश त्रिपाठी यांना अवघी 1571 मते मिळाली. विशेष म्हणजे या निवडणुकीती मोठ्या संख्येने लोकांनी NOTA बटण दाबले आहे. निवडणूक आयोगाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, NOTA ला 12,806 मते मिळाली आहेत.  

महत्वाच्या बातम्या

Andheri Bypoll Result: भाजपला टोला लगावत ऋतुजा लटके यांची पहिली प्रतिक्रिया, हा विजय म्हणजे... 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Yogi Adityanath Mira Bhayandar| चुकीच्या विचारांना बळी पडायचे नाही, योगींचे मिरा भायंदरकरांना आवाहनVinod Tawde EXCLUSIVE : पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? विनोद तावडेंची स्फोटक मुलाखतDilip Walse Patil : शरद पवार म्हणाले गद्दार, सुट्टी नाही! दिलीप वळसे-पाटलांची पहिली प्रतिक्रियाMahesh Sawant : नरेंद्र मोदींचा इफेक्ट संपला;त्यांची सभा आमच्यासाठी शुभ शकुन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
Embed widget