एक्स्प्लोर

Andheri Bypoll Result: भाजपला टोला लगावत ऋतुजा लटके यांची पहिली प्रतिक्रिया, हा विजय म्हणजे...

Andheri Bypoll Result: अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीतील विजयानंतर शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांनी हा विजय दिवगंत आमदार रमेश लटके यांच्या विकासकामांचा विजय असल्याचे म्हटले.

Andheri Bypoll Result: अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत (Andheri Bypoll Result) विजय झाल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके (Rutuja Latke ) यांनी आपली पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली. हा विजय माझे दिवगंत पती रमेश लटके (Ramesh Latke) यांचा विजय असल्याचे त्यांनी सांगितले. नोटाच्या मतदानाबाबत मतदारांकडून माध्यमांनी उत्तर शोधली पाहिजे असे त्यांनी म्हटले. भाजपला या निवडणूक निकालाचा अंदाज होता. त्यामुळे त्यांनी माघार घेतली असेही लटके यांनी म्हटले. 

अंधेरी पूर्व येथील आमदार रमेश लटके यांच्या निधनाने ही पोटनिवडणूक झाली. शिवसेना ठाकरे गट आणि महाविकास आघाडीकडून रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. या पोटनिवडणुकीत अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. भाजपने या निवडणुकीसाठी मुरजी पटेल यांची उमेदवारी जाहीर केली होती. मात्र, ऐनवेळी भाजपने उमेदवार माघारी घेतला. निवडणुकीत अभेद्य विजयी आघाडी घेतल्यानंतर ऋतुजा लटके यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी म्हटले की, हा विजय माझे दिवगंत पती रमेश लटके यांचा आहे. त्यांनी केलेल्या कामांच्या पुण्याईवर मतदारानी मतदान केले. मतदारांनी त्यांनी केलेल्या कामाच्या आधारे मते दिली असल्याचे लटके यांनी सांगितले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मातोश्रीवर जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. मी महाविकास आघाडीची उमेदवार आहे. महाविकास आघाडीतील प्रत्येक कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले. त्यासाठी त्यांचे आभार मानत असल्याचे ऋतुजा लटके यांनी सांगितले. 

...म्हणून भाजपने माघार घेतली

पोटनिवडणुकीत कमी झालेल्या मतदानाबाबत ऋतुजा लटके यांनी सांगितले की, पोटनिवडणुकीत मतदान हे कमी प्रमाणात होत असते. यात आम्हाला चांगलं मतदान झालं आहे. मतदान गुरुवारी झाले होते. हा कामकाजाचा दिवस असल्याने अनेकांना मतदान करणे शक्य झाले नसल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. लटके यांनी भाजपवरही निशाणा साधला. भाजपला सहानुभूती असती तर त्यांनी फॉर्म भरलाच नसता असेही लटके यांनी म्हटले. नोटाला जे मतदान झालं आहे ते भाजपचेच असून त्यांनी निवडणुकीचा कौल लक्षात आल्यानेच त्यांनी माघार घेतली असे लटके यांनी सांगितले.

नोटाला अधिक मते का?

या पोटनिवडणुकीत नोटाला दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. याबाबत विचारले असता, लटके यांनी सांगितले की, नोटाचा वापर करण्याचे आवाहन करणाऱ्या व्हिडिओ क्लिप समोर आल्या होत्या. नोटा हा निवडणुकीत महत्त्वाचा आहे. नोटाचा वापर हा जबाबदारीने करायचा असतो. माध्यमांनी लोकांना याबाबत विचारणा करायला हवी असे लटके यांनी म्हटले. 

 

Rutuja Latke Full PC : ऋतुजा लटके यांची पहिली पत्रकार परिषद, भाजपवर केला थेट हल्लाबोल ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'सैराट'मधील लंगड्याची फुल्ल हवा, तानाजीचा लूक नवा; गळ्यात सोनं, हाती घड्याळ, सोबतीला मोनालिसा
'सैराट'मधील लंगड्याची फुल्ल हवा, तानाजीचा लूक नवा; गळ्यात सोनं, हाती घड्याळ, सोबतीला मोनालिसा
सुरेश धसांनी ज्यूस पाजला, मनोज जरांगेंचं अंतरावालीतील उपोषण स्थगित; आता मोर्चा मुंबईकडे
सुरेश धसांनी ज्यूस पाजला, मनोज जरांगेंचं अंतरावालीतील उपोषण स्थगित; आता मोर्चा मुंबईकडे
Arvind Kejriwal : यमुनेत विष असल्याचा पुरावा द्या, नोटीसवर नोटीस सुरुच; केजरीवाल म्हणाले, निवडणूक आयुक्त राजकारण करत आहेत, दिल्लीतून निवडणूक का लढवत नाही?
यमुनेत विष असल्याचा पुरावा द्या, नोटीसवर नोटीस सुरुच; केजरीवाल म्हणाले, निवडणूक आयुक्त राजकारण करत आहेत, दिल्लीतून निवडणूक का लढवत नाही?
Raj Thackeray : राज ठाकरेंची परिस्थिती गजनी चित्रपटातील हिरोसारखी; अजित पवार गटाच्या नेत्यांचा मनसे प्रमुखांवर जोरदार पलटवार
राज ठाकरेंची परिस्थिती गजनी चित्रपटातील हिरोसारखी; अजित पवार गटाच्या नेत्यांचा मनसे प्रमुखांवर जोरदार पलटवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Beed Suresh Dhas PC : एकमेकांबद्दल बोलावंच लागतं, कोणाचं काय झालं हे अधिकाऱ्यांना विचारा : धसRaj Thackeray Mumbai Full Speech : विधानसभा निकालाची चिरफाड, पराभवानंतर राज ठाकरेंचं पहिलं भाषणBeed  DPDC Meeting : बीडमध्ये जिल्हा नियोजन समितीची बैठक, अजित पवार, धनंजय मुंडे,पंकजा मुंडे उपस्थितRaj Thackeray On Balasaheb Thorat : 7 वेळा आमदार झालेले थोरात 10 हजार मतांनी पराभूत कसे?- ठाकरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'सैराट'मधील लंगड्याची फुल्ल हवा, तानाजीचा लूक नवा; गळ्यात सोनं, हाती घड्याळ, सोबतीला मोनालिसा
'सैराट'मधील लंगड्याची फुल्ल हवा, तानाजीचा लूक नवा; गळ्यात सोनं, हाती घड्याळ, सोबतीला मोनालिसा
सुरेश धसांनी ज्यूस पाजला, मनोज जरांगेंचं अंतरावालीतील उपोषण स्थगित; आता मोर्चा मुंबईकडे
सुरेश धसांनी ज्यूस पाजला, मनोज जरांगेंचं अंतरावालीतील उपोषण स्थगित; आता मोर्चा मुंबईकडे
Arvind Kejriwal : यमुनेत विष असल्याचा पुरावा द्या, नोटीसवर नोटीस सुरुच; केजरीवाल म्हणाले, निवडणूक आयुक्त राजकारण करत आहेत, दिल्लीतून निवडणूक का लढवत नाही?
यमुनेत विष असल्याचा पुरावा द्या, नोटीसवर नोटीस सुरुच; केजरीवाल म्हणाले, निवडणूक आयुक्त राजकारण करत आहेत, दिल्लीतून निवडणूक का लढवत नाही?
Raj Thackeray : राज ठाकरेंची परिस्थिती गजनी चित्रपटातील हिरोसारखी; अजित पवार गटाच्या नेत्यांचा मनसे प्रमुखांवर जोरदार पलटवार
राज ठाकरेंची परिस्थिती गजनी चित्रपटातील हिरोसारखी; अजित पवार गटाच्या नेत्यांचा मनसे प्रमुखांवर जोरदार पलटवार
Nashik & Raigad Guardian Minister : नाशिक अन् रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा कधी सुटणार? राजकीय खलबतं, समोर आली मोठी अपडेट
नाशिक अन् रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा कधी सुटणार? राजकीय खलबतं, समोर आली मोठी अपडेट
लाडक्या बहिणींना अॅडव्हान्समध्ये पैसे देता पण कष्टकऱ्यांना देत नाहीत, बच्चू कडूंचा प्रहार,  म्हणाले ही योजना सत्तेपोसाठी आणली
लाडक्या बहिणींना अॅडव्हान्समध्ये पैसे देता पण कष्टकऱ्यांना देत नाहीत, बच्चू कडूंचा प्रहार,  म्हणाले ही योजना सत्तेपोसाठी आणली
पुण्यात भोंदूबाबाने वृद्ध महिलेला फसवलं; 29 लाख रुपयांचा गंडा, पोलिसात गुन्हा दाखल
पुण्यात भोंदूबाबाने वृद्ध महिलेला फसवलं; 29 लाख रुपयांचा गंडा, पोलिसात गुन्हा दाखल
Prayagraj Maha Kumbh Stampede : कुंभमेळ्यात तीन सरकारी 'बाबूं'नीच 35 ते 40 निष्पाप जीव चिरडून मारले? एक म्हणाला, पूल बंद केले, दुसऱ्याने गर्दी जमवली, तिसरा म्हणाला उठा नाही, तर चेंगराचेंगरी होईल
कुंभमेळ्यात तीन सरकारी 'बाबूं'नीच 35 ते 40 निष्पाप जीव चिरडून मारले? एक म्हणाला, पूल बंद केले, दुसऱ्याने गर्दी जमवली, तिसरा म्हणाला उठा नाही, तर चेंगराचेंगरी होईल
Embed widget