एक्स्प्लोर

छत्रपती-पेशव्यांच्या तुलनेचं 'ते' वक्तव्य पवारांना भोवतंय?

पेशवे आता छत्रपतींची नेमणूक करू लागले, अशा प्रकारचं विधान शरद पवारांनी काही काळापूर्वी केलं होतं. कोल्हापूरच्या संभाजीराजे छत्रपती यांना राज्यसभेवर खासदारकी दिली जाण्याचा त्याला संदर्भ होता. मात्र, याच विधानानं मराठा समाज दुखावला गेला आणि आता मराठा समाजासह कोल्हापूर व साताऱ्यातील छत्रपतीही विकासाच्या मुद्यावरून भाजपसोबत येत आहेत, असा दावा संघ विचारक सुधीर पाठक यांनी केलाय.

नागपूर: पूर्वी छत्रपती पेशव्यांची नेमणूक करायचे आणि पेशवे फडणवीसांची नेमणूक करायचे. आता फडणवीस छत्रपतींची नेमणूक करतात, अशा प्रकारचं विधान २०१६मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोल्हापूरात केलं होतं. कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपती यांना राष्ट्रपती नामनिर्देशित खासदारकी मिळण्याची या वक्तव्याला पार्श्वभूमी होती. यामुळे मोठा वादंगही झाला होता. मात्र, पवारांच्या अशा विधानामुळे मराठा समाज दुखावला गेला आणि आता तर मराठा समाजासह कोल्हापूर व साताऱ्याचे छत्रपती हेही विकासाच्या मुद्यावर भाजपसोबत येतायत. असा दावा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या समर्थकांकडून केला जातोय. संघाशी संबंधित विश्व संवाद केंद्राचे पदाधिकारी सुधीर पाठक यांनी नागपूरमध्ये 'एबीपी माझा'शी बोलताना हा दावा केलाय.  पाठक म्हणाले की, पवारांच्या त्या वक्तव्यानं दुखावलेलं मराठा मन आता एकत्र येत असल्याचं चित्र आहे. त्यामुळेच, पश्चिम महाराष्ट्रातील अनेक मराठा नेते एवढेच नाही तर कोल्हापूर आणि सातारा या दोन्ही ठिकाणचे छत्रपती  हे सुद्धा भाजपमध्ये आले आहेत. सध्या भाजपमध्ये सुरु असलेले मराठा नेत्यांचे पक्ष प्रवेश यामुळे मराठा मनावरील शरद पवारांचा दबदबा कमी होतोय की काय, असं वाटण्याजोगी स्थिती निर्माण झाली आहे.  पाठक पुढे म्हणाले की, आधी 'धर्मनिरपेक्षता' या शब्दाभोवती भाजपविरोधी राजकारण चालायचे. मात्र, आता 'विकास' या शब्दाभोवती भाजपमध्ये लोक येत आहेत. त्यामुळे सध्या भाजपमध्ये सुरु असलेल्या इनकमिंगला विकासाच्या नावाखाली सुरु असलेली जनदिंडी समजलं पाहिजे. एकदा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या की सर्वच पक्षात सुरु असलेली पक्षांतरं बंद होतील.
शरद पवारांच्या त्या वक्तव्यामुळे पवारांवर जातीयवादाचाही आरोप झाला. पवारांनी फक्त फडणवीस यांच्यावरच नव्हे तर छत्रपती संभाजीराजे यांच्यावरही टीका केली.  राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीच्या बैठकीत त्यांनी संभाजीराजे छत्रपतींवर निशाणा साधत म्हटलं की, छत्रपती शिवाजी राजे आणि शाहू महाराज हे केवळ एका जातीचे अथवा जातीयवादी विचारांचे नव्हते. अठरा पगड जातींना सोबत घेऊन त्यांनी बहुजनांचे नेतृत्व केले. पण, कोल्हापूरचे छत्रपती 'जातीयवादी‘ पक्षाच्या व्यासपीठावर गेले. या प्रकरणानंतर कोल्हापुरातीलच एका कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पवारांना प्रत्युत्तरही दिलं. "मी छत्रपतींचा सेवक आहे. मी केवळ लखोटा घेऊन जाण्याचे काम केले. छत्रपती संभाजी राजे यांची राज्यसभेवरील नियुक्ती पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती यांनीच केली", असंही फडणवीस म्हणाले होते. दरम्यान, 'एबीपी माझा'ला दिलेल्या मुलाखतीत पाठक यांनी भाजपमध्ये सध्या सुरू असलेल्या इनकमिंग-पक्षप्रवेशांवरून संघ नाराज नसल्याचाही दावा केला. भाजपची ताकद वाढत असल्यास संघाला आनंदच असेल, असं ते म्हणाले. ज्या ठिकाणी आपली ताकद नाही तिथे प्रस्थापित नेतृत्वाला सोबत घ्यावे लागते असं सांगतानाच पाठक यांनी नागपुरात बनवारीलाल पुरोहित यांच्या भाजपप्रवेशाची आठवणही जागवली. २०१४पूर्वी धर्मनिरपेक्षता हा मुख्य मुद्दा होता. आताही तो महत्वाचा असला तरी आता विकासाचा मुद्दा केंद्रस्थानी येत असल्याचं निरिक्षणही पाठक यांनी मांडलं.
  हे ही वाचा: पाकिस्तान आणि भारतात वेगळी फूट पाडण्याचा सरकारचा प्रयत्न : शरद पवार
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आज आपण जिवंत आहोत ते केवळ मोदींनी दिलेल्या लसीमुळे : भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण
आज आपण जिवंत आहोत ते केवळ मोदींनी दिलेल्या लसीमुळे : भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण
Gold Rate : सोन्याच्या दरात तेजी सुरु, सोनं 1360 रुपयांनी महागलं, 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर जाणून घ्या
सोन्याच्या दरात तेजी सुरु, सोनं 1360 रुपयांनी महागलं, 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर जाणून घ्या
Kolhapur News:  नामवंत शाळेतील मास्तर महिलेसोबत रंगेहाथ सापडला; गावकऱ्यांनी पहिल्यांदा बेदम चोपला मग नग्न करून तब्बल तीन तास दोरीने बांधून घातला!
कोल्हापूर : नामवंत शाळेतील मास्तर महिलेसोबत रंगेहाथ सापडला; गावकऱ्यांनी पहिल्यांदा बेदम चोपला मग नग्न करून तब्बल तीन तास दोरीने बांधून घातला!
भाजपचा एखादा नगरसेवक निवडून आला तर खूप झालं; जळगावात भाजप अन् शिवसेनेत जुंपली, नेते आमने-सामने
भाजपचा एखादा नगरसेवक निवडून आला तर खूप झालं; जळगावात भाजप अन् शिवसेनेत जुंपली, नेते आमने-सामने
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Nana patole and Chandrashekhar Bawankule : नाना पटोले आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात चांगलीच जुंपली
Nitesh Rane PC : Nilesh Rane यांचा बळीचा बकरा केला जातोय; नितेश राणेंनी केली भावाची पाठराखण
Raj Thackeray Nashik Tree cutting: दुसरीकडे झाडं लावायला पाचपट जागा असेल तर साधुग्राम तिकडेच करा
Top 100 : टॉप 100 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट 29 नोव्हेंबर 2025
Sayaji Shinde Nashik Tapovan Tree Cutting : एकही झाड तुटू देणार नाही, झाडं तोडल्यास माफी नाही

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आज आपण जिवंत आहोत ते केवळ मोदींनी दिलेल्या लसीमुळे : भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण
आज आपण जिवंत आहोत ते केवळ मोदींनी दिलेल्या लसीमुळे : भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण
Gold Rate : सोन्याच्या दरात तेजी सुरु, सोनं 1360 रुपयांनी महागलं, 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर जाणून घ्या
सोन्याच्या दरात तेजी सुरु, सोनं 1360 रुपयांनी महागलं, 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर जाणून घ्या
Kolhapur News:  नामवंत शाळेतील मास्तर महिलेसोबत रंगेहाथ सापडला; गावकऱ्यांनी पहिल्यांदा बेदम चोपला मग नग्न करून तब्बल तीन तास दोरीने बांधून घातला!
कोल्हापूर : नामवंत शाळेतील मास्तर महिलेसोबत रंगेहाथ सापडला; गावकऱ्यांनी पहिल्यांदा बेदम चोपला मग नग्न करून तब्बल तीन तास दोरीने बांधून घातला!
भाजपचा एखादा नगरसेवक निवडून आला तर खूप झालं; जळगावात भाजप अन् शिवसेनेत जुंपली, नेते आमने-सामने
भाजपचा एखादा नगरसेवक निवडून आला तर खूप झालं; जळगावात भाजप अन् शिवसेनेत जुंपली, नेते आमने-सामने
पैसे दिले तर काजू, किसमिस म्हणून खाऊन घ्यायचे,धनुष्यबाणाचे बटन दाबायचे; आमदार सत्तारांचे मतदारांना आवाहन
पैसे दिले तर काजू, किसमिस म्हणून खाऊन घ्यायचे,धनुष्यबाणाचे बटन दाबायचे; आमदार सत्तारांचे मतदारांना आवाहन
Devendra Fadnavis : मी कोणावरही टीका करत नाही, आमच्याकडे नीती, नियती आहे अन् निधी देखील आहे; देवेंद्र फडणवीसांचे सूचक वक्तव्य; राज्याच्या तिजोरीबाबत पुनर्उच्चार?
मी कोणावरही टीका करत नाही, आमच्याकडे नीती, नियती आहे अन् निधी देखील आहे; देवेंद्र फडणवीसांचे सूचक वक्तव्य; राज्याच्या तिजोरीबाबत पुनर्उच्चार?
Accident: भरधाव डंपर खडीसकट कारवर कोसळला; 4 वर्षाच्या चिमुरड्यासह एकाच कुटुंबातील 7 जणांचा अंत, काकाच्या अत्यसंस्काराला जाताना अवघं कुटुंब क्षणात उद्ध्वस्त
भरधाव डंपर खडीसकट कारवर कोसळला; 4 वर्षाच्या चिमुरड्यासह एकाच कुटुंबातील 7 जणांचा अंत, काकाच्या अत्यसंस्काराला जाताना अवघं कुटुंब क्षणात उद्ध्वस्त
Kolhapur News: मुरगुडला राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या दारात दोन पत्रावळीत लिंबू, नारळ, हळद टाकत भानामती!
मुरगुडला राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या दारात दोन पत्रावळीत लिंबू, नारळ, हळद टाकत भानामती!
Embed widget