Sharad Pawar : मी लहान असताना इथं कुस्ती खेळलो, जिंकलो की हातात रेवड्या द्यायचे; शरद पवार इंदापुरात काय काय म्हणाले?
Sharad Pawar, Indapur : मी लहान असताना या ठिकाणी कुस्ती खेळलो आहे.कुस्ती जिंकली की हातात रेवढ्या द्यायचे, असं शरद पवारांनी इंदापुरातील सभेत सांगितलं.
Sharad Pawar, Indapur : "मी फार वर्षांनी या ठिकाणी आलो आहे. मी लहान असताना या ठिकाणी कुस्ती खेळलो आहे. कुस्ती जिंकली की हातात रेवढ्या द्यायचे", असं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सांगितलं. इंदापूर विधानसभा मतदारसंघातील सांसर येथे राष्ट्रवादीचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांच्या प्रचारार्थ शरद पवारांची सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते.
शरद पवार म्हणाले, मोठ्या प्रयत्नातून ही कारखानदारी उभी राहिली. महाराष्ट्रात सर्वात काटकेसरीने चालणारा कारखाना कोणता तर भवानी नगरची ओळख होती. शेतक-यांचे हित डोळ्यासमोर ठेऊन कारखाना चालवला. अलिकडच्या काळात फार भयंकर ऐकत आहोत. सर्वात खाली गेलेला कारखाना म्हणून छत्रपतीचं नाव निघते. जो कारखाना सर्व कारखाना सर्वात जास्त भाव देत होता त्या कारखान्यांची अवस्था पाहा.
लोकांचे संसार उध्वस्त करण्याचे काम करणाऱ्यांना जागा दाखवा
लोकांचे संसार उध्वस्त करण्याचे काम कोण करत असेल तर त्यांना जागा दाखवा. राज्यात लोक सांगतात काहीही करा पण परिवर्तन करा. महाराष्ट्र एकेकाळी देशात एक नंबरला होता. आज महाराष्ट्राचा नंबर 11 वर गेला आहे. कारण चुकीचं धोरणं आहे. ही राज्याची घडी नीटनेटकी करायची असेल तर उद्याच्या निवडणुकीमध्ये चांगली लोक आले पहिजेत. हर्षवर्धन पाटलांकडे अनुभव आहे,राज्य चालवलं आहे. काही काळ ते राजकारणात दूर राहिले. साखर कारखानदारीत संबंध हिंदुस्थानची जी संस्था आहे त्याचं नेतृत्व ते करतात.
तुतारी वाजवणाऱ्या माणसासमोरच बटन दाबा, हर्षवर्धन पाटलांना विजयी करा
एनसीडीसी ही एक संस्था आहे ही संघटना व्यवसायाला आर्थिक शक्ती देते. त्या संस्थेत ही हर्षवर्धन पाटील आहेत. हर्षवर्धन पाटील हे महाराष्ट्राचा बहुमान आहेत. ज्या माणसाने महाराष्ट्राचा बहुमान वाढवला त्याच्या पाठीमागे उभा राहणं आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. तुतारी वाजवणाऱ्या माणसासमोरच बटन दाबा आणि मोठ्या मताधिक्याने त्यांना विजय करा. मी राज्यात फिरत आहे ठिकठिकाणी हीच भावना लोकांच्या मध्ये आहे, असंही शरद पवारांनी सांगितलं.
हर्षवर्धन पाटील म्हणाले, वेळ काढून साहेब इंदापुरात आले आता आपले दिवस बदलणारच आहेत. आपल्या नेतृत्वाखाली जोपर्यंत हा छत्रपती सहकारी कारखाना चालत होता. तोपर्यंत काहीही अडचण आली नाही. मात्र ज्यांच्यावर जबाबदारी सोपवली त्यानंतर कारखान्याची परिस्थिती झाली आहे ती पाहावत नाही. शेतकऱ्यांसाठी या कारखान्याची परिस्थिती बदला हर्षवर्धन पाटलांनी शरद पवारांकडे मागणी केली.
इतर महत्त्वाच्या बातम्या