एक्स्प्लोर

Maharashtra CM : ज्यांचे आमदार जास्त त्यांचा मुख्यमंत्री ही माझ्या पक्षाची भूमिका; शरद पवारांनी मुख्यमंत्रिपदाचा पत्ता खोलला

Sharad Pawar On Maharashtra CM : महाविकास आघाडीने मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करावा अशी भमिका या आधी उद्धव ठाकरेंनी घेतली होती. त्यावर आता शरद पवारांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. 

मुंबई : निवडणुकीनंतर महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असेल अशी चर्चा सुरू असताना ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी एक महत्वपूर्ण वक्तव्य केलं आहे. विधानसभा निवडणुकीनंतर आम्ही सगळे एकत्र बसू, ज्यांचे आमदार जास्त त्या पक्षाला मुख्यमंत्रिपदासाठी आम्ही पाठिंबा देऊ. तशी माझ्या पक्षाची भूमिका आहे असं शरद पवारांनी स्पष्ट केलं. 'मुंबई तक' या माध्यमाला मुलाखत देताना शरद पवारांनी हे वक्तव्य केलं आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस हे काय भूमिका घेतात हे पाहावं लागेल. 

ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाईंनी घेतलेल्या मुलाखतीत महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री कोण असेल असा प्रश्न त्यांनी शरद पवार यांना विचारला. त्यावर शरद पवार म्हणाले की, "निवडणुकीनंतर आम्ही सगळे एकत्रित बसू. ज्यांच्या पक्षाचे आमदार जास्त असतील त्यांना त्यांचा प्रतिनिधी निवडायला सांगू आणि त्याला आम्ही पाठिंबा देऊ. ही माझ्या पक्षाची भूमिका आहे." 

ठाकरे गट काय करणार? 

राज्यात ज्यावेळी विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या तेव्हापासून महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करा अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी घेतली होती. महाविकास आघाडीचा जो कोणीही उमेदवार असो, त्याच्या पाठीशी आपण राहू असंही उद्धव ठाकरे म्हणाले होते. तर उद्धव ठाकरे यांना महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करा अशी भूमिका शिवसेनेच्या नेत्यांनी घेतली होती. त्यावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीने मात्र त्यावेळी कोणतीही भूमिका स्पष्ट केली नव्हती.

काँग्रेस- ठाकरेंची मुख्यमंत्रिपदावर वेगवेगळी भूमिका

लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसला मोठं यश मिळाल्यानंतर त्या पक्षाच्या नेत्यांचा आत्मविश्वास वाढल्याचं दिसून आलं. त्यामुळे ज्यांचे आमदार जास्त त्यांचा मुख्यमंत्री अशी भूमिका काँग्रेसमधील काही नेत्यांनी घेतल्याची चर्चा होती. पण असं केल्यास मित्रपक्षांमध्ये आपले आमदार जास्त निवडून आणण्यासाठी सहकारी पक्षाचे आमदार पाडण्याची स्पर्धा लागू शकते असं ठाकरे गटाकडून स्पष्ट करण्यात आलं होतं. त्यावर राष्ट्रवादीकडून मात्र कोणतीही भूमिका स्पष्ट होत नव्हती. त्यामुळे महाविकास आघाडीने मुख्यमंत्रिपदासाठी कोणताही फॉर्म्युला जाहीर केला नाही किंवा मुख्यमंत्रिपदाचा चेहराही समोर केला नाही.

ज्यांचे आमदार जास्त त्यांचा मुख्यमंत्री

महाविकास आघाडी म्हणून तीनही पक्षांनी निवडणुकीला एकत्रित सामोरं जायचं आणि मुख्यमंत्रिपदाबाबत निवडणुकीनंतर निर्णय घ्यायचा ही भूमिका नेत्यांनी घेतली होती. आता शरद पवारांनी मुख्यमंत्रिपदावर त्यांच्या पक्षाची भूमिका जाहीर केली आहे. 

ज्यांचे आमदार जास्त त्या पक्षाचा मुख्यमंत्री ही आपल्या पक्षाची भूमिका असल्याचं शरद पवार म्हणाले. त्यावर आता महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस काय भूमिका घेणार हे पाहावं लागेल. 

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mallikarjun Kharge on PM Modi : महात्मा गांधींना कोणी मारलं? मारणारे पण तुम्हीच, विभागणारे पण तुम्हीच, मोदी खोटे बोलणाऱ्यांचे सरदार; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल
महात्मा गांधींना कोणी मारलं? मारणारे पण तुम्हीच, विभागणारे पण तुम्हीच, मोदी खोटे बोलणाऱ्यांचे सरदार; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल
Vaibhav Naik : नारायण राणेंचं वय झालंय, उद्धव ठाकरेंआधी आम्हाला अडवून दाखवा; वैभव नाईकांचं थेट आव्हान
नारायण राणेंचं वय झालंय, उद्धव ठाकरेंआधी आम्हाला अडवून दाखवा; वैभव नाईकांचं थेट आव्हान
Pyre: उत्तराखंडच्या भुताटकी गावात दोन जख्ख म्हाताऱ्यांची गोष्ट, जगभरातील प्रेक्षकांचं लक्ष वेधतोय 'हा' सिनेमा
उत्तराखंडच्या भुताटकी गावात दोन जख्ख म्हाताऱ्यांची गोष्ट, जगभरातील प्रेक्षकांचं लक्ष वेधतोय 'हा' सिनेमा
Shiv Sena and NCP MLA Disqualification Case : शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणीसाठी आता पुन्हा नव्याने तारखा!
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणीसाठी आता पुन्हा नव्याने तारखा!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sunil Tingare on Sharad Pawar Notice  : शरद पवारांना कोणतीही नोटीस दिली नव्हती - टिंगरेPM Narendra Modi Akola : अकोल्यात नरेंद्र मोदींच्या निशाण्यावर काँग्रेसTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :  2 PM : 9 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaToofan Aalaya Paani Foundation तुफान आलंया Water Cup नंतर Farmer Cup, शेतीतील यशोगाथा, जरुर पाहा!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mallikarjun Kharge on PM Modi : महात्मा गांधींना कोणी मारलं? मारणारे पण तुम्हीच, विभागणारे पण तुम्हीच, मोदी खोटे बोलणाऱ्यांचे सरदार; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल
महात्मा गांधींना कोणी मारलं? मारणारे पण तुम्हीच, विभागणारे पण तुम्हीच, मोदी खोटे बोलणाऱ्यांचे सरदार; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल
Vaibhav Naik : नारायण राणेंचं वय झालंय, उद्धव ठाकरेंआधी आम्हाला अडवून दाखवा; वैभव नाईकांचं थेट आव्हान
नारायण राणेंचं वय झालंय, उद्धव ठाकरेंआधी आम्हाला अडवून दाखवा; वैभव नाईकांचं थेट आव्हान
Pyre: उत्तराखंडच्या भुताटकी गावात दोन जख्ख म्हाताऱ्यांची गोष्ट, जगभरातील प्रेक्षकांचं लक्ष वेधतोय 'हा' सिनेमा
उत्तराखंडच्या भुताटकी गावात दोन जख्ख म्हाताऱ्यांची गोष्ट, जगभरातील प्रेक्षकांचं लक्ष वेधतोय 'हा' सिनेमा
Shiv Sena and NCP MLA Disqualification Case : शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणीसाठी आता पुन्हा नव्याने तारखा!
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणीसाठी आता पुन्हा नव्याने तारखा!
Chhatrapati Sambhajiraje : छत्रपती संभाजीराजेंनी सर्व पक्षांना घेरलं! म्हणाले, 'कारल्याच्या भाजीसारखं राजकारण कडू...'
छत्रपती संभाजीराजेंनी सर्व पक्षांना घेरलं! म्हणाले, 'कारल्याच्या भाजीसारखं राजकारण कडू...'
PM Modi In AKola : महाराष्ट्राला महाविकास आघाडीच्या घोटाळेबाजांचे एटीएम बनू देऊ नका! पीएम मोदींकडून काँग्रेस सर्वाधिक 'टार्गेट'
महाराष्ट्राला महाविकास आघाडीच्या घोटाळेबाजांचे एटीएम बनू देऊ नका! पीएम मोदींकडून काँग्रेस सर्वाधिक 'टार्गेट'
Radhakrishna Vikhe Patil : आता बस्स झालं! माझा फोटो वापरू नका, शिंदे गटाच्या उमेदवाराला विखे पाटलांचा भर सभेत इशारा; नेमकं काय घडलं?
आता बस्स झालं! माझा फोटो वापरू नका, शिंदे गटाच्या उमेदवाराला विखे पाटलांचा भर सभेत इशारा; नेमकं काय घडलं?
Jayant Patil on Ajit Pawar : पृथ्वीवर असा पक्ष नसेल ज्या पक्षाच्या चिन्हाखाली लिहायला लागतंय आमचं चिन्ह 'न्याय प्रविष्ठ' आहे! जयंत पाटलांचा अजितदादांवर बोचरा वार
पृथ्वीवर असा पक्ष नसेल ज्या पक्षाच्या चिन्हाखाली लिहायला लागतंय आमचं चिन्ह 'न्याय प्रविष्ठ' आहे! जयंत पाटलांचा अजितदादांवर बोचरा वार
Embed widget