एक्स्प्लोर

Parli Vidhansabha Election : परळी मतदारसंघात शरद पवार गटाचे कार्यकर्ते आक्रमक; राजेभाऊ फड यांना उमेदवारी न मिळाल्याने पक्षाचे बॅनर फाडले

Parli Vidhansabha Election : परळी विधानसभा मतदारसंघातून राजेसाहेब देशमुख यांना उमेदवारी जाहीर करताच इच्छुक आणि संभाव्य उमेदवार असलेल्या राजेभाऊ फड यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 परळी : बीडच्या परळी विधानसभा मतदारसंघातून (Parli Vidhansabha Election) राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या विरोधात शरद पवार नेमकी कोणती खेळी खेळून उमेदवार देतात? त्याची उत्सुकता लागली होती. अशातच आता शरद पवारांनी या मतदारसंघात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांना उमेदवारी जाहीर केलीय. त्यामुळे परळी विधानसभा मतदारसंघात ओबीसी विरुद्ध मराठा हा संघर्ष पाहायला मिळणार आहे.

राजेसाहेब देशमुख हे काँग्रेसचे विद्यमान जिल्हाध्यक्ष होते. मात्र काँग्रेसला खिंडार पाडत शरद पवारांनी त्यांचा प्रवेश राष्ट्रवादीमध्ये करून घेतला आणि हा प्रवेश झाल्यानंतर त्यांना परळी मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे. धनंजय मुंडे यांनी गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर मुंडेंच्या विरोधात शरद पवार कोणता उमेदवार देणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आता अशातच पवारांची खेळी या मतदारसंघात महत्त्वाची मानली जाते आहे. 

दरम्यान, परळी विधानसभा मतदारसंघातून राजेसाहेब देशमुख यांना उमेदवारी जाहीर करताच इच्छुक आणि संभाव्य उमेदवार असलेल्या राजेभाऊ फड यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. राजेभाऊ फड यांच्या कार्यालयाबाहेर लावण्यात आलेले शरद पवारांचे आणि पक्षाचे बॅनर संतप्त कार्यकर्त्यांनी फाडून टाकले आहेत.त्यामुळे परळी विधानसभा मतदारसंघातील अंतर्गत वाद उफाळून आला असल्याचे बोलले जात आहे.

परळी मतदारसंघात मराठा विरुद्ध ओबीसी हा संघर्ष अटळ   

परळी विधानसभा मतदारसंघातून राजेभाऊ फड हे इच्छुक आणि संभाव्य उमेदवार होते. त्यामुळे त्यांनी तशी तयारी देखील केली होती. मागील पंधरा दिवसांपासून ते शरद पवारांच्या भेटी घेत आहेत. बैठकी देखील होत आहेत. मात्र आज शरद पवारांनी धनंजय मुंडे यांच्या विरोधात राजेसाहेब देशमुख हे मराठा कार्ड देऊन अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. दरम्यान, राजेभाऊ फड यांनी उमेदवारी न मिळाल्यास दुसऱ्या उमेदवाराचा प्रचार करेल, असे सांगितले होते. मात्र फड यांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांचे कार्यकर्ते मात्र आता चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यामुळे या मतदारसंघात मराठा विरुद्ध ओबीसी हा संघर्ष अटळ झाला आहे.

कोण आहेत राजेसाहेब देशमुख? 

- मागील अनेक वर्षांपासून ते राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये सक्रिय काम करत आहेत 
- स्वर्गीय विमल मुंदडा त्यांचे समर्थक म्हणून ओळखले जायचे 
- जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्यांनी शिक्षण सभापती पद भूषविले आहे 
- मागील अनेक वर्षांपासून ते काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहेत

- लोकसभा निवडणुकीत प्रामुख्याने ओबीसी विरुद्ध मराठा संघर्ष पाहायला मिळाला त्यात जरांगे फॅक्टर आघाडीवर होता 
- लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग सोनवणे संघर्ष पाहायला मिळाला
- परळी मतदारसंघ मराठा बहुल आहे त्यामुळे राजेसाहेब देशमुख यांचे वैयक्तिक संबंध आहेत 

हे ही वाचा 

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

एकनाथ शिंदेंच्या भेटीसाठी जातानाआमदार संजना जाधव यांना गेटवरच अडवलं, सुरक्षा रक्षकांवर संताप, व्हिडिओ व्हायरल
एकनाथ शिंदेंच्या भेटीसाठी जातानाआमदार संजना जाधव यांना गेटवरच अडवलं, सुरक्षा रक्षकांवर संताप, व्हिडिओ व्हायरल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2026 | मंगळवार
Dharashiv : भाजपने पैशांच्या बळावर उमेदवार फोडले आता मतदार फोडतेय, काँग्रेसच्या उमेदवाराचा आरोप
Dharashiv : भाजपने पैशांच्या बळावर उमेदवार फोडले आता मतदार फोडतेय, काँग्रेसच्या उमेदवाराचा आरोप
Nashik Vidhan Parishad Election 2026: ठाकरे गटाच्या नेत्याच्या वक्तव्याने महायुतीची धाकधूक वाढली, नाशिक विधान परिषदेत मोठा गेम होणार?
ठाकरे गटाच्या नेत्याच्या वक्तव्याने महायुतीची धाकधूक वाढली, नाशिक विधान परिषदेत मोठा गेम होणार?

व्हिडीओ

Operation Tiger : ऑपरेशन टायगर - दिल्लीत हालचालींना वेग, एकनाथ शिंदे आणि UBT खासदार दिल्लीत
Maharashtra Operation Tiger : ठाकरेंचे सहा खासदार शिंदेंच्या गळाला? कोण कुठे आहे? आत्ताची मोठी अपडेट
Raju Waghmare On Operation Tiger Zero Hour : २०२९ पर्यंत उद्धव ठाकरे यांचा पक्ष संपलेला असेल? | Zero Hour
Goras Bhandar FDA Action Wardha: तुकाराम मुंढेंच्या कारवाईला गोरस भंडारचे हायकोर्टात आव्हान
Sudhir Mungantiwar on Opration Tiger : ठाकरेंचे खासदार देशहितासाठी सोबत येत असतील तर स्वागतच - सुधीर मुनगंटीवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Operation Tiger Live updates: दिल्लीत ऑपरेशन टायगर अंतिम टप्प्यात, ठाकरेंचे खासदार आणि एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल, ठाकरेंची शिवसेना पुन्हा फुटणार
Operation Tiger Live updates: दिल्लीत ऑपरेशन टायगर अंतिम टप्प्यात, ठाकरेंचे खासदार आणि एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल, ठाकरेंची शिवसेना पुन्हा फुटणार
Shivsena : ठाकरेंच्या सहा खासदारांपाठोपाठ एकनाथ शिंदेही दिल्लीच्या दिशेने, लोकसभा अध्यक्षांची भेट घेऊन पाठिंब्याचं पत्र देणार, सूत्रांची माहिती
ठाकरेंच्या सहा खासदारांपाठोपाठ एकनाथ शिंदेही दिल्लीच्या दिशेने, लोकसभा अध्यक्षांची भेट घेऊन पाठिंब्याचं पत्र देणार, सूत्रांची माहिती
अभिनेत्री संचिताचे उज्ज्वल शर्मासोबतचे चॅट समोर, 3000 रुपये घेतलेले; नातेवाईकांचे आरोप, तोच मुलीला त्रास द्यायचा
अभिनेत्री संचिताचे उज्ज्वल शर्मासोबतचे चॅट समोर, 3000 रुपये घेतलेले; नातेवाईकांचे आरोप, तोच मुलीला त्रास द्यायचा
Operation Tiger UBT Shivsena: ठाकरेंच्या सहा खासदारांचा पक्षप्रवेशाचा मुहूर्त ठरला? शिवसेनेच्या वर्धापनदिनीच एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंना सर्वात मोठा धक्का देणार
ठाकरेंच्या सहा खासदारांचा पक्षप्रवेशाचा मुहूर्त ठरला? एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंना सर्वात मोठा धक्का देणार
मंडोळ्या बांधून नटली नवरीबाई; सुप्रिया सुळेंच्या घरी लगीनघाई, वडिलांची लाडाची लेक लवकरच मांडवात
मंडोळ्या बांधून नटली नवरीबाई; सुप्रिया सुळेंच्या घरी लगीनघाई, वडिलांची लाडाची लेक लवकरच मांडवात
केंद्र सरकारचा मोठा निर्णय, महाराष्ट्र पोलिस दलाच्या आधुनिकीकरणासाठी  733.28 रुपयांचा निधी मंजूर, मुख्यमंत्र्यांनी मानले आभार
केंद्र सरकारचा मोठा निर्णय, महाराष्ट्र पोलिस दलाच्या आधुनिकीकरणासाठी  733.28 रुपयांचा निधी मंजूर, मुख्यमंत्र्यांनी मानले आभार
Operation Tiger UBT Shivsena: आईबाबा अन् साईबाबा सगळ्यांच्या शपथा फेल, ठाकरेंचे खासदार फोडले, एकनाथ शिंदेंनी रात्री सगळ्यांना चकवून काय केलं?
आईबाबा अन् साईबाबा सगळ्यांच्या शपथा फेल, ठाकरेंचे खासदार फोडले, एकनाथ शिंदेंनी रात्री सगळ्यांना चकवून काय केलं?
Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंचं रक्त काढून राज्यातील इतर विभागप्रमुखांना द्या, म्हणजे...; माजी मंत्र्यांचं मुख्य सचिवांना पत्र
तुकाराम मुंढेंचं रक्त काढून राज्यातील इतर विभागप्रमुखांना द्या, म्हणजे...; माजी मंत्र्यांचं मुख्य सचिवांना पत्र
Embed widget