Parli vidhan sabha: धनंजय मुंडेविरोधात शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, परळी मतदारसंघात भगवान सेनेचे फुलचंद कराड रिंगणात?
maharashtra vidhan sabha election 2024: परळी विधानसभा मतदारसंघात काँटे की टक्कर होणार? शरद पवार गटाने धनंजय मुंडेंविरोधातील उमेदवार हेरला
बीड: लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांना धक्का दिल्यानंतर आता शरद पवार गटाने विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडे यांना घेरण्याची तयारी सुरु केली आहे. धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्याविरोधात बीडच्या परळी विधानसभा मतदारसंघात (Parli Vidhan Sabha) तगडा उमेदवार देण्यासाठी शरद पवार गटाकडून चाचपणी सुरू आहे. अशातच भगवान सेनेचे सरसेनापती फुलचंद कराड (Phulchand Karad) यांनी विधानसभा निवडणूक लढविण्याची तयारी दर्शवून शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळाल्यास धनंजय मुंडे यांच्या विरोधात निवडणूक लढविण्यासाठी दंड थोपटले आहेत.
गेल्या विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडे यांनी बहीण पंकजा मुंडे यांचा पराभव करत शरद पवार गटाकडून निवडून आले होते. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर शरद पवार यांच्याकडून धनंजय मुंडे यांच्या विरोधात तगडा उमेदवार देण्यासाठी चाचपणी सुरू आहे.
अशातच फुलचंद कराड यांनी निवडणूक लढविण्याची तयारी दर्शवली आहे. फुलचंद कराड दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या पहिल्या फळीतील नेते आहेत. निवडणुकीच्या तोंडावर परळीतून अनेक इच्छुक उमेदवारांनी शरद पवारांची भेट घेतली आहे. परंतु पवारांच्या खेळीतून धनंजय मुंडे यांच्याविरोधात नेमका कोणता उमेदवार असणार? याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.
जयंत पाटील 24 ऑक्टोबरला उमेदवार अर्ज भरणार
शरद पवार गटाच्या शिवस्वराज्य यात्रेदरम्यान इस्लामपूरमध्ये सभा पार पडली. यावेळी जयंत पाटील यांनी येत्या 24 तारखेला उमेदवारी अर्ज भरणार असल्याची घोषणा केली. ते वाळवा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
महायुतीच्या जागावाटपात अजितदादा गटाला 45 ते 50 जागा मिळणार?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 45 ते 50 जागा मिळणार आहेत, या चर्चेत तथ्य नाही, अशी माहिती अजितदादा गटाच्या नेत्याने दिली. महायुतीच्या जागावाटपात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाट्याला 60 पेक्षा जास्त जागा येतील. पक्षाचे 60 विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार निश्चित झाले असून उरलेल्या काही उमेदवारांवर आज शिक्कामोर्तब होणार आहे. बुधवारी अजित पवार आणि सुनील तटकरे यांची बैठक पार पडली, याच बैठकीत नावांवर शिक्कामोर्तब झाले. आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत बैठक पार पडल्यानंतर पक्षाकडून तत्काळ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात येतील.
आणखी वाचा
मोठी बातमी: भाजप मुंबईत भाकरी फिरवणार; राम कदमांसह 'या' 5 आमदारांचा पत्ता कट होणार?
मोठी बातमी : IRS समीर वानखेडे विधानसभा लढवणार, पक्षही ठरला!
राज्यातील 288 मतदारसंघातील सर्वपक्षीय उमेदवारांची यादी; विधानसभेला मनसे अन् वंचितने घेतली आघाडी