Sharad Pawar NCP Candidate List : मोठी बातमी! शरद पवार गटाची पाचवी उमेदवारी यादी जाहीर, माढ्यात काट्याची टक्कर, पंढरपूरमध्येही उमेदवार उतरवला
Sharad Pawar NCP Candidate List : विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने आपली शेवटची यादी जाहीर केली आहेत. आता या पक्षाकडून जोमात प्रचार केला जाणार आहे.

मुंबई : विधानसभा निवडणुकीची (Vidhan Sabha Election 2024) रणधुमाळी चांगलीच रंगली आहे. या निवडणुकीसाठी राज्यातील प्रमुख पक्ष आपापले उमेदवार जाहीर करत आहेत. आता राज्यातील सर्वच पक्षांचे जागावाटप जवळ-जवळ संपत आले आहे. आता शेवटच्या टप्प्यातील जागा जाहीर केल्या जात आहेत. दरम्यान, महाविकास आघाडीमध्ये (Maha Vikas Aghadi) माढा, पंढरपूर, अशा महत्त्वाच्या जागांचा पेच होता. हा पेच आता सुटला आहे. येथे शरद पवार यांच्या पक्षाने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. शरद पवार (Sharad Pawar) यांच्या पक्षाने आपल्या उमेदवारांची पाचवी यादी नुकतीच जाहीर केली आहे. या यादीत पंढरपूर, माढा या मतदारसंघांसाठी उमेदवार देण्यात आले आहेत.
पाचव्या यादीत कोणत्या उमेदवाराला कुठून तिकीट?
माढा- अभिजीत पाटील
मुलुंड- संगिता वाजे
मोर्शी- गिरीश कराळे
पंढरपूर- अनिल सावंत
मोहोळ- राजू खरे
कृपया प्रसिद्धीसाठी...
— Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar (@NCPspeaks) October 29, 2024
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार पक्षाच्या संसदीय मंडळाने दिलेल्या मान्यतेनुसार महाराष्ट्र विधानसभा निवडणूक - २०२४ साठी पक्षाच्या अधिकृत उमेदवारांची विधानसभानिहाय पाचवी यादी जाहीर करण्यात आली आहे. pic.twitter.com/6idD0OGYmw
शरद पवार यांच्या पक्षाने आपल्या उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केली आहे. या यादीत शरद पवार यांनी एकूण पाच जागांसाठी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. या पाच जागांसह शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने आतापर्यंत 87 जागांसाठी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. शरद पवार यांची ही शेवटची यादी असू शकते.
पंढरपूरमध्ये महाविकास आघाडीत मैत्रिपूर्ण लढत?
महाविकास आघाडीमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून पंढरपूरच्या जागेसाठी वाद चालू होता. या जागेवर याआधीच काँग्रेस पक्षाने आपला उमेदवार जाहीर केलेला आहे. त्यानंतर आता येथे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीनेही आपला उमेदवार जाहीर केला आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाने तानाजी सावंत यांचे पुतणे अनिल सावंत यांना उमेदवारी जाहीर केली आहे. काँग्रेसने भगीरथ भालके यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे. त्यामुळे आता पंढरपूरमध्ये महाविकास आघाडीत मैत्रिपूर्ण लढत होणार का? असे विचारले जात आहे.
हेही वाचा :
मनसेचा मोठा डाव, नारायण राणेंचा पराभव करणाऱ्या रणरागिणीला वांद्रे पूर्वमधून रिंगणात उतरवलं





















