एक्स्प्लोर

Sanjay Raut: सांगोल्याची जागा आम्हीच लढवणार, त्यावर चर्चा नाही; संजय राऊतांनी ठामपणे सांगितले, सोलापूर दक्षिणवरही ठाकरे गटाचा दावा

Sanjay Raut: देवेंद्र फडणवीस आमचे मित्र आहेत, त्यांच्या कुटुंबाला त्यांची जेवढी काळजी आहे, तेवढी आम्हाला सुद्धा आहे, असंही संजय राऊत म्हणाले. 

Sanjay Raut मुंबई: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच सरकार येईल. निकाल लागल्यानंतर या राज्यामध्ये 26 तारखेला महाविकास आघाडीच सरकार स्थापन झालेलं असेल, असा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला. निवडणुकीत काळात कोण काय म्हणतंय? आणि कोण काय आरोप करतंय? हे गांभीर्याने घ्यायचं नसतं. आधी जिंकून या...बारामती आता सोपी राहिलेली नाही, असा टोलाही संजय राऊतांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना लगावला. 

धमक्यांचं राजकारण बंद केलं पाहिजे. राज्याच्या गृहमंत्र्यांनी स्वतःचीच सुरक्षा वाढवून घेतली. जनतेची सुरक्षा वाऱ्यावर आहे, खून, बलात्कार, कोयता गँग, खंडण्या, मारामाऱ्या लुटमार आणि अचानक राज्याच्या गृहमंत्र्यांनी फोर्स वन आपल्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले आहे. जनतेला कळलं पाहिजे, या राज्याच्या गृहमंत्र्यांना कोणापासून धोका निर्माण झालाय?, इस्राईल, युक्रेन, लिबिया, दक्षिण कोरिया?, नेमकं कोणापासून धोका आहे?, असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला. आम्हाला चिंता वाटते देवेंद्र फडणवीस आमचे मित्र आहेत, त्यांच्या कुटुंबाला त्यांची जेवढी काळजी आहे, तेवढी आम्हाला सुद्धा आहे, असंही संजय राऊत म्हणाले. 

आम्ही मैत्रीपूर्ण लढतीमध्ये पडणार नाही- संजय राऊत

भिवंडीच्या ज्या जागेवर आमचे माजी आमदार रुपेश म्हात्रे सांगतायत. ती जागा आम्हाला मिळावी यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्टा करतोय पण समाजवादी पार्टीचा विद्यमान आमदार तिथे आहे. आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत त्या जागेसाठी प्रयत्न केले पण समाजवादी पार्टीने ती जागा सोडली नाही, अशा वेळेला आमच्याकडे दुसरा कोणताही प्रयत्न राहत नाही, असंही संजय राऊतांनी सांगितले. आम्ही मैत्रीपूर्ण लढतीमध्ये पडणार नाही, महाराष्ट्रामध्ये सात ते आठ ठिकाणी असं घडणार आहे.  आज आणि उद्या दुपारपर्यंत आमच्याकडे वेळ आहे. त्यातून आम्ही मार्ग काढू, काही ठिकाणी दोन एबी फॉर्म गेले आहेत. काही ठिकाणी गैरसमजातून घडलं आहे आणि काही ठिकाणी का घडलं? याचा आम्ही शोध घेतोय. पक्षाचे नेते सातत्याने एकमेकांच्या संपर्कात आहेत, सगळे उमेदवारी अर्ज मागे घेतले जातील, अशी माहिती संजय राऊतांनी दिली. 

सांगोल्यावर चर्चा होणार नाही- संजय राऊत

सोलापूर दक्षिणमध्ये काँग्रेस पक्षाने अधिकृत एबी फॉर्म कोणालाही दिलेला नाही. तिथे शिवसेनेचे अमर पाटील हेच उमेदवार आहेत आणि त्यांच्यासाठी उद्धव ठाकरे यांची सभा पुढल्या आठवड्यात होत आहे. सांगोल्याची जागा शिवसेनेची विद्यमान जागा आहे. सांगोल्यामध्ये शिवसेनेचा आमदार निवडून आला. असल्यामुळे त्या जागेवर शिवसेनेचाच दावा राहील. शेतकरी कामगार पक्षांबरोबर काल सुद्धा आमची चर्चा झाली. त्यामध्ये अलिबाग, पेण आणि पनवेल या तीन जागांवर चर्चा होऊ शकते. सांगोल्यावर चर्चा होणार नाही, असं स्पष्टीकरण संजय राऊतांनी दिले. 

सोलापूर दक्षिण आणि सांगोल्याच्या जागेवर ठाकरे गटाचा दावा कायम: Video:

संबंधित बातमी:

Sada Sarvankar On Amit Thackeray: मी उमेदवारी अर्ज मागे घेण्यास तयार, पण...; सदा सरवणकरांनी ठेवली एक अट, माहीममध्ये काय होणार?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची धरपकड सुरूच; मिरा-भाईंदर पोलिसांकडून पुन्हा कारवाई
अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची धरपकड सुरूच; मिरा-भाईंदर पोलिसांकडून पुन्हा कारवाई
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जानेवारी 2025 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जानेवारी 2025 | रविवार
Video: काळ आला होता पण वेळ आली नव्हती; 3 ऱ्या मजल्यावरुन पडूनही चिमुकला वाचला, देवदूत धावला
Video: काळ आला होता पण वेळ आली नव्हती; 3 ऱ्या मजल्यावरुन पडूनही चिमुकला वाचला, देवदूत धावला
GBS रोगामुळे मृ्त्यू पावलेल्या रुग्णाचा पोस्टमॉर्टम अहवाल आला; डॉक्टरांच्या रिपोर्टमधून खुलासा झाला
GBS रोगामुळे मृ्त्यू पावलेल्या रुग्णाचा पोस्टमॉर्टम अहवाल आला; डॉक्टरांच्या रिपोर्टमधून खुलासा झाला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 26 January 2024Shaurya Purskar ABP Majha | इतरांचे प्राण वाचवणाऱ्या शूरवीरांचा एबीपी माझाकडून गौरव ABP MajhaGadchiroli Naxal : नक्षल्यांचा खात्मा करणारी C-60 आहे तरी कोण? Special ReportABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 26 January 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची धरपकड सुरूच; मिरा-भाईंदर पोलिसांकडून पुन्हा कारवाई
अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची धरपकड सुरूच; मिरा-भाईंदर पोलिसांकडून पुन्हा कारवाई
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जानेवारी 2025 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जानेवारी 2025 | रविवार
Video: काळ आला होता पण वेळ आली नव्हती; 3 ऱ्या मजल्यावरुन पडूनही चिमुकला वाचला, देवदूत धावला
Video: काळ आला होता पण वेळ आली नव्हती; 3 ऱ्या मजल्यावरुन पडूनही चिमुकला वाचला, देवदूत धावला
GBS रोगामुळे मृ्त्यू पावलेल्या रुग्णाचा पोस्टमॉर्टम अहवाल आला; डॉक्टरांच्या रिपोर्टमधून खुलासा झाला
GBS रोगामुळे मृ्त्यू पावलेल्या रुग्णाचा पोस्टमॉर्टम अहवाल आला; डॉक्टरांच्या रिपोर्टमधून खुलासा झाला
Nashik : प्रजासत्ताक दिनी वनमजुराने डिझेल ओतून स्वतःला पेटवलं; नाशिकमधील धक्कादायक घटना
प्रजासत्ताक दिनी वनमजुराने डिझेल ओतून स्वतःला पेटवलं; नाशिकमधील धक्कादायक घटना
रणजी सामन्यात महाराष्ट्राची बडोदा संघावर मात, 439 धावांनी मोठा विजय; सौरभचे धुव्वादार शतक
रणजी सामन्यात महाराष्ट्राची बडोदा संघावर मात, 439 धावांनी मोठा विजय; सौरभचे धुव्वादार शतक
Howrah Train Accident : रेल्वे अपघाताची मालिका सुरुच; आता तिरुपती एक्स्प्रेसला रेल्वेची धडक; 3 डबे रुळावरून घसरले
रेल्वे अपघाताची मालिका सुरुच; आता तिरुपती एक्स्प्रेसला रेल्वेची धडक; 3 डबे रुळावरून घसरले
मोबाईलच्या स्क्रीनगार्डवरुन वाद; चौघांकडून कामगाराचा खून, पोलिसांनी फिरवली तपासाची च्रके
मोबाईलच्या स्क्रीनगार्डवरुन वाद; चौघांकडून कामगाराचा खून, पोलिसांनी फिरवली तपासाची च्रके
Embed widget