एक्स्प्लोर

महाराष्ट्रात 'या' दिग्गजांना पराभवाचा धक्का

लोकसभा निवडणुकीचे निकाल हाती येऊ लागले आहेत. आतापर्यंत हाती आलेल्या निकालांनुसार देशात भाजपप्रणित एनडीएला 346 जागांवर आघाडी मिळाली आहे तर काँग्रेस आघाडीला 91 जागांवर आघाडी मिळाली आहे. 105 जागांवर सपा, बसपासह देशातील इतर पक्ष आणि अपक्ष उमेदवारांना आघाडी मिळाली आहे.

मुंबई : लोकसभा निवडणुकीचे निकाल हाती येऊ लागले आहेत. आतापर्यंत हाती आलेल्या निकालांनुसार देशात भाजपप्रणित एनडीएला 346 जागांवर आघाडी मिळाली आहे तर काँग्रेस आघाडीला 91 जागांवर आघाडी मिळाली आहे. 105 जागांवर सपा, बसपासह देशातील इतर पक्ष आणि अपक्ष उमेदवारांना आघाडी मिळाली आहे. महाराष्ट्रातील 48 जागांचा विचार केला तर भाजप 23, शिवसेना 18, राष्ट्रवादी 5, काँग्रेस 1 आणि वंचित आघाडीने एका जागेवर आघाडी मिळवली आहे. आजच्या निकालात महाराष्ट्रातील अनेक दिग्गजांना मोठे धक्के बसले आहेत. महाराष्ट्रातील अनेक दिग्गज नेते सध्या पराभवाच्या छायेत आहेत. केंद्रीय मंत्री अनंत गीते यांचा राष्ट्रवादीच्या सुनील तटकरे यांनी पराभव केला आहे. महाराष्ट्राचे दोन मुख्यमंत्री सध्या मोठ्या फरकाने पिछाडीवर आहेत. माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे हे सध्या सोलापूर मतदार संघातून पिछाडीवर आहेत. या मतदारसंघात भाजपच्या जयसिद्धेश्वर स्वामींना मोठी लीड मिळाली आहे. वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकरांनी शिंदेंची मतं फोडल्यामुळे ते पिछाडीवर असल्याचे बोलले जात आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचादेखील पराभव झाला आहे. भाजपच्या प्रताप पाटील-चिखलीकर यांनी अशोक चव्हणांचा तब्बल 50 हजार मतांच्या फरकाने पराभव केला आहे.  या मतदारसरंघातही वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसचे नुकसान केले असल्याची चर्चा राजकीय वर्तूळात सुरु आहे. केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर हेदेखील सध्या पिछाडीवर आहेत. काँग्रेसचे बाळू धानोरकर आघाडीवर असले तरी त्या दोघांमध्ये जास्त मतांचा फरक नाही. त्यामुळेच येथील निकालाचा अंदाज वर्तवणे अवघड आहे. मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपमदेखील पिछाडीवर आहेत. शिवसेनेच्या गजानन कीर्तिकर यांना निरुपम यांच्याविरोधात मोठी आघाडी मिळाली आहे. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरादेखील सध्या पिछाडीवर आहेत. शिवसेनेच्या अरविंद सावंतांनी निरुपम यांना मोठा धक्का दिला आहे. औरंगाबादमध्ये शिवसेनेला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. औरंगाबाद हा शिवसेनेचा गड मानला जातो. शिवसेनेचे चंद्रकांत खैरे हे गेल्या 20 वर्षांपासून औरंगाबादचे खासदार आहेत. परंतु एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील हे सध्या औरंगाबादमध्ये आघाडीवर आहेत. संबधित बातम्या : राज ठाकरे यांनी सभा घेतलेल्या सर्व मतदारसंघांमध्ये आघाडीचे उमेदवार पिछाडीवर मुंबईतल्या सर्व जागा शिवसेना-भाजपने राखल्या?

महत्त्वाच्या बातम्या

Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा

व्हिडीओ

Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Embed widget