एक्स्प्लोर

महायुतीत रामदास आठवले वेगळ्या 'मूड' मध्ये? अपेक्षित जागा न मिळाल्यास स्वबळावर रिपाईचे 12 उमेदवार रिंगणात

Maharashtra Assembly Election 2024: महायुतीच्या जागा वाटपाच्या चर्चेत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athwale) यांची मोठी नाराजी असल्याचे बोलले जात आहे.

Maharashtra Assembly Election 2024 मुंबई : महायुतीच्या जागा वाटपाच्या चर्चेत रिपाई आठवले गट (RPI) नाराज आहेत का? असा प्रश्न आता विचारला जाऊ लागला आहे. त्यामागील कारण म्हणजे रिपाइं आठवले गटाला सहभागी न करणे, मुख्यमंत्र्यांच्या भेटीला लागलेला विलंब, याबाबत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athwale) यांची मोठी नाराजी असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, आठवलेंना मुख्यमंत्र्यांच्या भेटीला वेळ लागल्यमुळे रिपाईत अस्वस्था असल्याची माहिती पुढे आली आहे.

महायुतीत रामदास आठवले वेगळ्या 'मूड'मध्ये?

महायुतीत'रिपाइं'ने सर्वात आधी 12 जागांचा प्रस्ताव दिला होता. त्यातील धारावी, चेंबूर, केज, पुणे जिल्ह्यातील एक जागा आणि यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेडच्या अशा 5 जागांवर रिपाइं आठवले गटाचा आग्रह होता. मात्र, शेवटी यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड मतदार संघावरचा दावा सोडायला आठवलेंनी नकार दिला. दरम्यान, या एका जागेवर कोणतीही तडजोड होणार नसल्याचा आता रामदास आठवले यांनी पवित्रा घेतला आहे.

... अन्यथा स्वबळावर रिपाईचे 12 उमेदवार रिंगणात  

यवतमाळ जिल्ह्यातल्या उमरखेड जागेसाठी  'रिपाइं' आग्रही आहेत. उमरखेडमधून पक्षाचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष महेंद्र मानकर यांना उमेदवारी देण्यासाठी आठवलेंचा आग्रह आहे. मानकर यांना भाजपच्या 'कमळ' चिन्हावर लढवण्यासाठी आठवले तयार असल्याची माहिती आहे. मात्र, उमरखेडमधून महेंद्र मानकर यांची उमेदवारी जाहीर होत नसल्यामुळे आठवले नाराज असल्याचे बोलले जातंय. परिणामी आठवले 12 जागांवर स्वतंत्र उमेदवार उभे करण्याच्या तयारीत ही केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) आहेत. मात्र याबाबत लवकरच ते चित्र स्पष्ट करणार आहे. 

उमरखेडमधून सध्या भाजपचे नामदेव ससाणे आमदार आहेत. भाजपकडून माजी आमदार उत्तमराव इंगळे आणि राजेंद्र नजरधणे इच्छुक आहेत. तर रिपाइंचे महेंद्र मानकर यांना कमळावर लढविण्याचा प्रस्ताव दिला आहे. मात्र उमरखेडवर समेट न झाल्यास आठवले स्वबळावर राज्यभरात 12 उमेदवार उतरवणार असल्याच्या तयारीत आहे. 

भाजपमध्ये राजीनामा सत्र सुरूच! 

अकोला जिल्ह्यातील मुर्तीजापुरमध्ये भाजपातील (BJP) राजीनामा सत्र सुरूच असल्याचे पुढे आलंय. काल मुर्तीजापुर (Murtijapur) तालुक्यातील तीनशेहून अधिक  भाजप कार्यकर्त्यांनी राजीनामे दिलेय. त्यानंतर आज या मतदारसंघातील बार्शीटाकळी तालुक्यातल्या जवळपास 200 च्या वर कार्यकर्त्यांनी पक्षाकडे राजीनामे दिलेयेत. दुसऱ्या यादीतही नाव नसल्याने अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूरचे भाजप आमदार हरीश पिंपळेंचं तिकीट कापलं जाणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येतीय. पिंपळेंऐवजी ऐनवेळी शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून आलेल्या रवी राठींना उमेदवारी देण्याची शक्यता वर्तविली जात असल्याने मुर्तीजापूरमध्ये भाजपमध्ये धुसफुस वाढली आहे. याविरोधात आज बार्शीटाकळी तालूक्यातील शेकडो भाजप पदाधिकाऱ्यांनी राजीनाम्याचा निर्णय घेतलाय.

हे ही वाचा 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ulhas Patil Shirol : कोल्हापुरात उद्धव ठाकरे गटाला तगडा झटका बसण्याची शक्यता; माजी आमदार उल्हास पाटील घरवापसीच्या तयारीत!
कोल्हापुरात उद्धव ठाकरे गटाला तगडा झटका बसण्याची शक्यता; माजी आमदार उल्हास पाटील घरवापसीच्या तयारीत!
सिद्धी कदम, 26 वर्षीय यंग, स्कॉलर तरुणी शरद पवारांची उमेदवार; महिलांचे प्रश्न मांडणार, दिग्गजांशी भिडणार
सिद्धी कदम, 26 वर्षीय यंग, स्कॉलर तरुणी शरद पवारांची उमेदवार; महिलांचे प्रश्न मांडणार, दिग्गजांशी भिडणार
Madhurimaraje Chhatrapati : कोल्हापूर उत्तरमध्ये मधुरिमाराजेंच्या नावावर शिक्कामोर्तब; राजेश लाटकरांची उमेदवारी रद्द करण्याची 'नामुष्की'
कोल्हापूर उत्तरमध्ये मधुरिमाराजेंच्या नावावर शिक्कामोर्तब; राजेश लाटकरांची उमेदवारी रद्द करण्याची 'नामुष्की'
Shrinivas Vanga :  श्रीनिवास वनगांचे रडतानाचे व्हिडीओ पाहिले, उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना तातडीनं वनगांच्या घरी पाठवलं अन् ...
श्रीनिवास वनगांचे रडतानाचे व्हिडीओ पाहिले, उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना तातडीनं वनगांच्या घरी पाठवलं...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Shrinivas Vanaga Family : ठाकरे देव होते, तुम्ही आम्हाला फसवलं, श्रीनिवास वनगा आत्महत्येच्या विचारातVidhan Sabha Superfast : महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 28 ऑक्टोबर 2024 : ABP MajhaMilind Deshmukh Nanded |... त्यामुळे आम्ही बंड करत आहोत, मिलिंद देशमुखांची प्रतिक्रियाSpecial Report Vidhan Sabhaजोरदार शक्तिप्रदर्शन, मुख्यमंत्र्यांसह 2 उपमुख्यमंत्र्यांचा उमेदवारी अर्ज

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ulhas Patil Shirol : कोल्हापुरात उद्धव ठाकरे गटाला तगडा झटका बसण्याची शक्यता; माजी आमदार उल्हास पाटील घरवापसीच्या तयारीत!
कोल्हापुरात उद्धव ठाकरे गटाला तगडा झटका बसण्याची शक्यता; माजी आमदार उल्हास पाटील घरवापसीच्या तयारीत!
सिद्धी कदम, 26 वर्षीय यंग, स्कॉलर तरुणी शरद पवारांची उमेदवार; महिलांचे प्रश्न मांडणार, दिग्गजांशी भिडणार
सिद्धी कदम, 26 वर्षीय यंग, स्कॉलर तरुणी शरद पवारांची उमेदवार; महिलांचे प्रश्न मांडणार, दिग्गजांशी भिडणार
Madhurimaraje Chhatrapati : कोल्हापूर उत्तरमध्ये मधुरिमाराजेंच्या नावावर शिक्कामोर्तब; राजेश लाटकरांची उमेदवारी रद्द करण्याची 'नामुष्की'
कोल्हापूर उत्तरमध्ये मधुरिमाराजेंच्या नावावर शिक्कामोर्तब; राजेश लाटकरांची उमेदवारी रद्द करण्याची 'नामुष्की'
Shrinivas Vanga :  श्रीनिवास वनगांचे रडतानाचे व्हिडीओ पाहिले, उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना तातडीनं वनगांच्या घरी पाठवलं अन् ...
श्रीनिवास वनगांचे रडतानाचे व्हिडीओ पाहिले, उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना तातडीनं वनगांच्या घरी पाठवलं...
महादेव जानकर महायुतीतून बाहेर, तरीही भाजपनं रासपसह मित्रपक्षांना चार जागा सोडल्या, आठवले, राणा अन् कोरेंसाठी गुड न्यूज
महायुतीच्या जागावाटपात भाजपची मित्रपक्षांसह दीडशे जागांवर घौडदौड, आठवले, राणा अन् कोरेंना जागा सोडल्या
माढ्यात शरद पवारांचं धक्कातंत्र, राष्ट्रवादीकडून अभिजीत पाटलांना एबी फॉर्म; मतदारसंघात चुरशीची लढत
माढ्यात शरद पवारांचं धक्कातंत्र, राष्ट्रवादीकडून अभिजीत पाटलांना एबी फॉर्म; मतदारसंघात चुरशीची
Shrinivas Vanga Crying : एकनाथ शिंदेंनी तिकीट कापलं, आमदार ढसाढसा रडला; म्हणाला, उद्धव ठाकरे देव, त्यांची माफी मागायचीय
एकनाथ शिंदेंनी तिकीट कापलं, आमदार ढसाढसा रडला; म्हणाला, उद्धव ठाकरे देव, त्यांची माफी मागायचीय
संभाजीनगरमध्ये नवा ट्विस्ट, जाहीर उमेदवाराकडून गद्दारी; ठाकरेंनी केली कारवाई, नवा उमेदवार
संभाजीनगरमध्ये नवा ट्विस्ट, जाहीर उमेदवाराकडून गद्दारी; ठाकरेंनी केली कारवाई, नवा उमेदवार
Embed widget