एक्स्प्लोर
राजस्थानात 'पायलट' यांच्या नेतृत्वात काँग्रेसची 'भरारी'
मुस्लिमबहुल टोंक मतदारसंघात मुस्लिम कार्ड खेळत भाजपने युनूस खान यांना सचिन पायलट यांच्याविरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं होतं, तर बसपतर्फे मोहम्मद अली उमेदवार होते.
![राजस्थानात 'पायलट' यांच्या नेतृत्वात काँग्रेसची 'भरारी' Rajasthan Assembly Election Results 2018 | Sachin Pilot Tonk constituency Results राजस्थानात 'पायलट' यांच्या नेतृत्वात काँग्रेसची 'भरारी'](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/12/11140402/Sachin-Pilot.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : काँग्रेसचा युवा चेहरा आणि राजस्थान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट यांच्या नेतृत्वात पक्षाने राजस्थानात चमकदार कामगिरी बजावली आहे. राजस्थानात सत्तास्थापन करतानाच सचिन पायलट यांनी टोंक मतदारसंघातही विजय मिळवला.
मुस्लिमबहुल टोंक मतदारसंघात मुस्लिम कार्ड खेळत भाजपने युनूस खान यांना सचिन पायलट यांच्याविरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं होतं, तर बसपतर्फे मोहम्मद अली उमेदवार होते. मात्र दोन्ही मुस्लिम उमेदवारांना पायलट यांना धोबीपछाड देता आलं नाही.
टोंक या विधानसभा क्षेत्रात जवळपास 50 हजार मुस्लिम मतदार आहेत. ही काँग्रेसची व्होट बँक मानली जाते. याशिवाय 30 हजार गुर्जर, 35 हजार एससी आणि 15 हजार माळी समाजाचे मतदार आहेत. 2014 मध्ये भाजपचे सुखबिर सिंग जौनपुरिया आमदारपदी निवडून आले होते.
वसुंधरा जिंकल्या, पण राजस्थान भाजपकडून निसटलं
टोंक मतदारसंघात आतापर्यंत काँग्रेसला केवळ दोन वेळाच विजय मिळवता आला आहे. 1998 आणि 2008 मध्ये. योगायोगाची गोष्ट म्हणजे दोन्ही वेळा काँग्रेसचे उमेदवार मुस्लिम होते. भाजपला सत्तेतून खाली खेचण्याची जबाबदारीही प्रदेशाध्यक्ष या नात्याने सचिन पायलट यांच्या खांद्यावर होती. वसुंधरा राजे यांचं संस्थान खालसा करण्यात सचिन पायलट यांचा मोलाचा वाटा आहे. विशेष म्हणजे, सचिन पायलट पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकांच्या रिंगणात उतरले होते. दिवंगत केंद्रीय मंत्री राजेश पायलट यांचे ते पुत्र. आतापर्यंत 2004 आणि 2009 मधील लोकसभा निवडणुकीत पायलट जिंकून आले होते. मनमोहन सिंग सरकारमध्ये 2012 ते 2014 दरम्यान त्यांनी केंद्रीय मंत्रिपदही भूषवलं होतं. वसुंधरा राजेंनी राजस्थान गमावलं गेल्या वीस वर्षांत कुठल्याच पक्षाला राजस्थानमध्ये सलग दोन टर्म सत्ता काय राखता आलेली नाही. काँग्रेस आणि भाजप यांची राजस्थानात आलटून पालटून सत्ता येत असते. ही परंपरा मोडून काढण्याची संधी वसुंधरा राजे यांनी गमावली. राजस्थानने वसुंधरा राजे यांना सपशेल नाकारलं. राजस्थानमध्ये विधानसभेच्या 200 जागा असून 199 जागांसाठी मतदान झाले. राजस्थानात बहुमताचा आकडा 101 आहे. भाजप, काँग्रेस, राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टी, बहुजन समाज पार्टी, समाजवादी पक्षासह विविध लहान-मोठे पक्ष आणि अपक्ष उमेदवार मिळून तब्बल 2274 उमेदवार रिंगणात उभे होते.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
राजकारण
भारत
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)