एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
स्टँड अप इंडिया, मेक इन इंडिया, स्मार्ट सिटीचं काय झालं? राज ठाकरेंचा भाजपला सवाल
भाजप सरकारने सत्तेत आल्यानंतर देशातल्या जनतेला दाखवलेली स्वप्न पुर्ण केली नसल्याचा आरोप राज ठाकरेंनी केला आहे. सरकारच्या स्टँड अप इंडिया, स्टार्ट अप इंडिया, मेक इन इंडिया, स्मार्ट सिटी या योजनांचं पुढे काय झालं ? असा सवाल राज ठाकरेंनी सोलापुरच्या सभेत विचारला आहे.
सोलापूर : भाजप सरकारने सत्तेत आल्यानंतर देशातल्या जनतेला दाखवलेली स्वप्न पूर्ण केली नसल्याचा आरोप राज ठाकरेंनी केला आहे. सरकारच्या स्टँड अप इंडिया, स्टार्ट अप इंडिया, मेक इन इंडिया, स्मार्ट सिटी या योजनांचं पुढे काय झालं ? असा सवाल राज ठाकरेंनी सोलापुरच्या सभेत विचारला आहे. तसेच सध्या पंतप्रधान मोदी त्यांच्या भाषणात या योजनांबद्दल एक शब्दही बोलत नाहीत, असं देखील राज म्हणाले.
मेक इन इंडिया योजनेचा लाभ मिळवण्यासाठी एका तरुणाची फसवणूक झाल्याचं उदाहरण देखील राज ठाकरेंनी दिलं. अहमदनगरच्या एका तरुणानं त्याची फसवणुक झाल्यानंतर मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांच्याशी संपर्क साधला होता व त्याला झालेला त्रास सांगितला होता. सरकारच्या या योजनांबाबत बोलताना राज ठाकरेंनी रोजगार निर्मितीवरही सवाल केला आहे. स्वच्छ भारत, मेक इन इंडिया, स्टँड अप इंडिया मधून किती लोकांना नोकऱ्या मिळाल्या? असा प्रश्न राज ठाकरेंनी विचारला आहे.
केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेवरही राज यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. "सरकारच्या स्मार्ट सिटी प्रकल्पाचं पुढं काय झालं? नाशिकमध्ये मनसेने केलेल्या कामाचं श्रेय स्मार्ट सिटीच्या नावाने हे सरकार घेत आहे", असा आरोप राज ठाकरेंनी केला आहे.
भाजपने पैसे वाटले तर घ्या, मात्र त्यांच्याकडे परत ढुंकूनही पाहू नका : राज ठाकरे
VIDEO | राज ठाकरेंचे संपुर्ण भाषण :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
निवडणूक
राजकारण
निवडणूक
Advertisement