Vikhe Patil vs Amol Kolhe : "हमारे पास सब कुछ है, तुम्हारे पास तो सिर्फ गुंडाराज है"; कोल्हेंच्या डायलॉगबाजीला विखेंचं डायलॉगबाजीनंच प्रत्युत्तर
Vikhe Patil vs Nilesh Lanke : अमोल कोल्हेंनी केलेली डायलॉगबाजी सध्या चर्चेचा विषय ठरतेय. शिरुरचे मविआचे उमेदवार अमोल कोल्हेंनी एका सभेदरम्यान तुफान फटकेबाजी केली.
Radhakrishna Vikhe Patil on Amol Kolhe : Ahmednagar Lok Sabha Election 2024 : अहमदनगर : सध्या राजकीय वर्तुळात (Maharashtra Politicle Updates) चर्चा रंगलीये ती, अहमदनगरच्या (Ahmednagar) सभेत अमोल कोल्हेंनी (Amol Kolhe) केलेल्या डायलॉगबाजीमुळे. निलेश लंकेंच्या (Nilesh Lanke) प्रचारासाठी असलेल्या एका सभेत अमोल कोल्हेंनी तुफान डायलॉगबाजी केली. बॉलिवूडच्या दिवार चित्रपटातील संवाद म्हणत, अमोल कोल्हेंनी विरोधकांवर थेट निशाणा साधला. आता अमोल कोल्हेंच्या याच डायलॉगबाजीला महायुतीचे नेते राधाकृष्ण विखे पाटलांनी डायलॉगबाजीनंच जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. हमारे पास सब कुछ है, तुम्हारे पास तो सिर्फ गुंडाराज है, असा टोला विखेंनी कोल्हेंना लगावला आहे. तसेच, लोक गुंडाराजच्या विरोधात मतदान करणार असल्याचंही यावेळी बोलताना राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले आहेत.
अमोल कोल्हेंनी केलेली डायलॉगबाजी सध्या चर्चेचा विषय ठरतेय. शिरुरचे मविआचे उमेदवार अमोल कोल्हेंनी एका सभेदरम्यान तुफान फटकेबाजी केली. यावेळी त्यांचा दिवार चित्रपटातील डायलॉग मारत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. त्यावर आता राधाकृष्ण विखेंनी जोरदार पलटवार केला आहे.
उमेदवार एवढा सक्षम होता, तर अमोल कोल्हे तरी लंकेच्या प्रचारासाठी का आले? : राधाकृष्ण विखे पाटील
महायुतीचे उमेदवार सुजय विखेंच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते योगी आदित्यनाथ यांच्या सभा होणार आहेत. त्यावरून अमोल कोल्हे यांनी विखेंवर निशाणा साधला होता. चार-चार पिढ्या राजकारणात आहेत, त्यांची एका शिक्षकाचा मुलगा असलेल्या निलेश लंके यांनी त्रेढा तिरपीट उडवून दिली, असं अमोल कोल्हे यांनी म्हंटलं होतं. त्याला राधाकृष्ण विखे यांनी जोरावर प्रत्युत्तर दिलं आहे. "जर त्यांचा उमेदवार एवढा सक्षम होता, तर अमोल कोल्हे तरी लंकेच्या प्रचारासाठी का आले?" असं विखे म्हणाले आहेत. स्वतः अमोल कोल्हे यांचाच पराभव निश्चित असल्याचं विखे म्हणाले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे देशाच्या भविष्यासाठी योजना आहेत, पण अमोल कोल्हे यांच्याकडे आणि त्यांचे नेते शरद पवार यांच्याकडे काय आहे देशासाठी? असा सवाल विखेंनी केला आहे.
शांतिगिरी महाराजांचं प्रस्थ मोठं, मी त्यांना थांबण्याची विनंती केलीय, पण... : राधाकृष्ण विखे पाटील
शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडून उमेदवारीची प्रतीक्षा करणारे शांतिगिरी महाराज यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवारी करणार आहेत. यावर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली असून शांतिगिरी महाराजांचं प्रस्थ मोठं आहे. मी त्यांना थांबण्याची विनंती केली आहे, मात्र लोकशाहीमध्ये निवडणूक लढवण्याचा सर्वांना अधिकार असल्याचं विखे यांनी म्हटलं आहे. याबाबत महायुतीचे अनेक नेते त्यांची मनधरणी करत असून त्यांना यश येतं का? हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :