(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Punjab Election Result 2022: पंजाबमध्ये काँग्रेसला आणखी एक धक्का, नवज्योत सिंग सिद्धू पराभूत
Punjab Election Result 2022: पंजाब विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. पंजाबमध्ये सत्तेत असलेला काँग्रेस पक्ष आता फक्त 17 जागांवर सीमित झाला आहे.
Punjab Election Result 2022: पंजाब विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. पंजाबमध्ये सत्तेत असलेला काँग्रेस पक्ष आता फक्त 17 जागांवर सीमित झाला आहे. पंजाबमध्ये आम आदमी पक्षाने मोठी बाजी मारत 91 जागांवर आघाडी मिळवली आहे. याच दरम्यान आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. पंजाब काँग्रेचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. अमृतसर पूर्व मतदारसंघातून सिद्धू पराभूत झाले आहेत.
नवज्योत सिंग सिद्धू हे पंजाबचे प्रदेशाध्यक्ष आहेत. तसेच ते मुख्यमंत्रीपदाच्या दावेदारांमध्येही होते. पण त्यांना आपली जागा गमवावी लागली. अमृतसर पूर्व मतदारसंघातून आम आदमी पक्षाच्या उमेदवार जीवन ज्योती कौर यांनी त्यांचा पराभव केला आहे. या विजयाबद्दल सिद्धू यांनी आम आदमी पक्षाचे अभिनंदन केले आहे. नवज्योत सिंग सिद्दू यांच्यासोबतच अकाली दलाचे बिक्रम सिंह मजिठिया यांचाही निवडणुकीत पराभव झाला आहे. तर मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी हे दोन जागांवर निवडणूक लढले असून या दोन्ही जागांवरून ते पराभूत झाले आहेत.
पंजाब विधानसभेच्या निवडणुकीत आम आदमी पक्षाच्या लाटेसमोर नवज्योत सिंग सिद्धू यांनी काँग्रेसचा पराभव स्वीकारला आहे. पंजाबच्या जनतेने घेतलेला निर्णय मान्य असल्याचे नवज्योत सिंग सिद्धू यांनी म्हटले आहे. सिद्धू यांनी आम आदमी पक्षाचे विजयाबद्दल अभिनंदन देखील केले आहे. नवज्योत सिंग सिद्धू यांनी ट्वीट करत म्हटले की, ''लोकांचा आवाज हा देवाचा आवाज आहे. आम्ही आमचा पराभव मान्य करतो. पंजाबच्या जनतेचा निर्णय आम्ही स्वीकार करतो. विजयाबद्दल आम आदमी पक्षाचे अभिनंदन.''
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Punjab Election Result 2022 : पंजाबमध्ये आपची धडाकेबाज एन्ट्री! काँग्रेसचा सुपडा साफ, भाजप निष्प्रभ... आपच्या यशाचं कारण काय?
- Election Result 2022 : पंजाब वगळता अन्य चार राज्यात भाजपची आघाडी, काँग्रेसला मोठा धक्का
- UP Election Result 2022 : गांधी घराण्याच्या पारंपरिक मतदारसंघाला हादरा, रायबरेली आणि अमेठीत काँग्रेस तिसऱ्या स्थानावर