Virat Kohli Anushka Sharma: अनुष्कासोबत नव्या वर्षाची सुरुवात! विराट कोहलीची Insta पोस्ट तुफान व्हायरल, म्हणाला...
विराटने आतापर्यंत फक्त 623 डावांत 27,975 धावा केल्या असून तो हा विक्रम सहज मोडू शकतो.

Virat Kohli: नवीन वर्ष नवी स्वप्नं आणि नवी आशा घेऊन येतं. यातच 2026ची सुरुवात क्रिकेट चाहत्यांसाठी अतिशय खास ठरताना दिसतेय. टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने पत्नी अनुष्का शर्मासोबत नव्या वर्षाचं स्वागत केलं. विराटने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर एक खास फोटो शेअर करत लिहिलं, “ नव्या वर्षांत माझ्या आयुष्यातील प्रकाशासोबत प्रवेश करतोय.. @anushkasharma”. अवघ्या एका तासात या पोस्टला सुमारे 40 लाखांहून अधिक लाइक्स मिळाले असून सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.
View this post on Instagram
ऐतिहासिक विक्रमापासून 25 धावा दूर
सध्या विराट कोहली कुटुंबासोबत क्वालिटी टाइम घालवत आहे. मात्र हा ब्रेक फार काळ टिकणारा नाही. लवकरच तो पुन्हा मैदानात झळकणार असून विजय हजारे ट्रॉफी आणि भारत-न्यूझीलंड वनडे मालिकेत चाहत्यांना विराटची झलक पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे विराट कोहली एका ऐतिहासिक जागतिक विक्रमापासून अवघ्या 25 धावा दूर आहे.
तेंडुलकरचा रेकॉर्ड मोडणार!
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 28 हजार धावा पूर्ण करण्यासाठी विराटला केवळ 25 धावांची गरज आहे. ही कामगिरी पूर्ण केल्यास तो जगातील सर्वात जलद 28 हजार आंतरराष्ट्रीय धावा करणारा फलंदाज ठरणार आहे. सध्या हा विक्रम मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. सचिनने 644 डावांत हा टप्पा गाठला होता, तर श्रीलंकेचा दिग्गज फलंदाज कुमार संगकाराने 666 डावांत 28 हजार धावा पूर्ण केल्या होत्या. विराटने आतापर्यंत फक्त 623 डावांत 27,975 धावा केल्या असून तो हा विक्रम सहज मोडू शकतो.
विजय हजारे ट्रॉफीत विराट जबरदस्त फॉर्ममध्ये
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांची वनडे मालिका 11 जानेवारीपासून सुरू होणार आहे. क्रिकेट जाणकारांच्या मते, याच मालिकेत विराट हा ऐतिहासिक विक्रम आपल्या नावावर करू शकतो. त्याआधी विजय हजारे ट्रॉफीत दिल्लीकडून खेळताना विराट जबरदस्त फॉर्ममध्ये दिसून आला आहे. पहिल्या दोन सामन्यांत त्याने अनुक्रमे 131 आणि 77 धावांची दमदार खेळी करत आपली तयारी दाखवून दिली.
लिस्ट ए क्रिकेटमध्येही नवा विक्रम
इतकंच नव्हे, तर विराट कोहलीने लिस्ट ए क्रिकेटमध्येही नवा विक्रम रचला आहे. तो सर्वात वेगवान 16 हजार लिस्ट ए धावा करणारा फलंदाज ठरला आहे. विराटने ही कामगिरी केवळ 330 डावांत साध्य केली, तर सचिन तेंडुलकरला यासाठी 391 डाव खेळावे लागले होते.
बीसीसीआयच्या सूत्रांनुसार, भारतीय वनडे संघ 8 जानेवारीपर्यंत वडोदऱ्यात दाखल होणार आहे. मात्र विराट कोहली एक दिवस आधीच तिथे पोहोचून सराव सुरू करण्याची शक्यता आहे. त्यामुळे 11 जानेवारीपासून सुरू होणारी ही वनडे मालिका क्रिकेट इतिहासात लक्षवेधी ठरणार, यात शंका नाही.