(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Punjab Election 2022: काँग्रेसचा पंजाब निवडणुकीसाठी मास्टर स्ट्रोक, 'या' नेत्यांवर महत्वाची जबाबदारी
वडणूक समन्वय समितीच्या अध्यक्षपदी जेष्ठ नेत्या खासदार अंबिका सोनिया (ambika son)यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
Punjab Election 2022: आगामी पंजाब विधासभा निवणुकीसाठी कॉंग्रेसने एका समितीची घोषणा केली आहे. यात निवडणूक समन्वय समितीच्या अध्यक्षपदी जेष्ठ नेत्या खासदार अंबिका सोनिया (ambika son)यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर पंजाब काँग्रेसच्या समन्वय समितीचे माजी अध्यक्ष सुनील जाखड (sunil jakhar)यांना प्रचार समितीचे अध्यक्ष आणि खासदार प्रताप सिंग बाजवा (pratap singh bajwa) यांना जाहीरनामा समितीचे अध्यक्ष करण्यात आले आहे. काँग्रेसच्या स्क्रीनिंग कमिटीची जबाबदारी अजय माकन यांच्याकडे देण्यात आली आहे. तर चंदन यादव आणि कृष्णा अलवारू हे त्याचे सदस्य असतील.
पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांनी 3 डिसेंबर रोजी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. याआधी 1 डिसेंबर रोजी पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी, नवज्योत सिद्धू आणि सुनील जाखड यांनी राहुल गांधींयांची भेट घेतली होती. त्यानंतर सूत्रांनी सांगितले की, पंजाबसाठी निवडणूक संबंधित समित्या स्थापन ( chairperson of election campaign)करण्याबाबतही राज्यातील नेत्यांशी चर्चा करण्यात आली होती.
पंजाबमध्ये पुढील वर्षाच्या सुरुवातीला विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीत आम आदमी पार्टी (आप), अकाली दल, भाजप आणि अमरिंदर सिंग यांचा नवा पक्ष सत्ताधारी काँग्रेसला तगडे आव्हान देणार असल्याचे दिसत आहे. काँग्रेसवर नाराज होऊन अमरिंदर सिंग यांनी नुकतीच नव्या पक्षाची घोषणा केली आहे. पंजाब लोक काँग्रेस, भाजप आणि अकाली दलाचे माजी नेते सुखदेव सिंग धिंडसा यांच्या पक्षासोबत त्यांचा पक्ष राज्यात पुढील सरकार स्थापन करेल, असे त्यांनी आज सांगितले. अमरिंदर सिंग यांना सप्टेंबरमध्ये पंजाबच्या मुख्यमंत्रीपदावरून हटवण्यात आले, त्यानंतर त्यांनी काँग्रेस सोडली होती.
दरम्यान. कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत अंबिका सोनी आणि सुनील जाखड यांचीही नावे चर्चेत होती. परंतु, काँग्रेसने दलित आणि शीख मतदारांना आकर्षीत करण्याचा प्रयत्न करत सिद्धू यांना प्रदेशाध्यक्षपदी ठेवले आणि चरणजित सिंग चन्नी यांना मुख्यमंत्री केले. पंजाबमध्ये फक्त शीखच मुख्यमंत्री बनायला हवे, असे सांगून अंबिका सोनी यांनीच मुख्यमंत्री होण्यास नकार दिल्याचे बोलले जात आहे. शिखांच्या नेतृत्वासाठी पंजाब हे एकमेव राज्य आहे, त्यामुळे त्याच वर्गाच्या नेत्याला येथे नेतृत्वाची संधी मिळायला हवी, असे त्यांचे मत होते.
इतर महत्वाच्या बातम्या
India Corona Vaccination : कोरोना लढाईत भारताची आघाडी, 'एवढ्या' लोकांचा पहिला डोस पूर्ण
राज्य सरकारला सुप्रीम कोर्टाचा धक्का, ओबीसींच्या 27 टक्के आरक्षणाच्या अध्यादेशाला निवडणुकीच्या तोंडावर स्थगिती