एक्स्प्लोर
अंतराळात भारताचा सर्जिकल स्ट्राईक, 3 मिनिटात सॅटेलाईटचा वेध : पंतप्रधान मोदी
अंतरिक्ष तंत्रज्ञानाने सक्षम देशांच्या यादीत भारताचा प्रवेश झाला आहे.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज (27 मार्च) देशाला संबोधित केलं. देशाला उद्देशून केलेल्या या भाषणात पंतप्रधान मोदींनी डीआरडीओने अंतराळात केलेल्या कामगिरीची माहिती दिली.
"भारताने आज आपलं नाव अंतराळ महाशक्ती म्हणून नोंदवलं आहे. भारताने A-SAT क्षेपणास्त्राच्या मदतीने लो अर्थ ऑर्बिटमध्ये (LEO) एका लाईव्ह सॅटेलाईटचा अवघ्या तीन मिनिटात वेध घेतला. अंतराळातही युद्ध सज्जता असलेल्या देशांमध्ये भारताचा समावेश झाला आहे. ही कामगिरी करणारा भारत हा अमेरिका, रशिया आणि चीननंतर हा चौथा देश ठरला आहे, असं नरेंद्र मोदी यांनी सांगितलं.
'मिशन शक्ती'चे DRDO ने जारी केलेले फोटो
अवघ्या तीन मिनिटांत ऑपरेशन पूर्ण : नरेंद्र मोदी
नरेंद्र मोदी म्हणाले की, "काही वेळापूर्वीच आपल्या वैज्ञानिकांनी 300 किलोमीटर अंतरावर 'लो अर्थ ऑर्बिट'मध्ये एका सॅटेलाईटचा वेध घेतला. हे ऑपरेशन अवघ्या तीन मिनिटांतच पूर्ण झालं. 'मिशन शक्ती' नावाचं हे ऑपरेशन अतिशय कठीण होतं, ज्यात उच्च दर्जाची तांत्रिक क्षमतेची आवश्यकता होती."
"कोणत्याही देशाचं नुकसान करण्याचा भारताचा इरादा नाही, हे संरक्षणात्मक पाऊल आहे. आमच्या मोहीमेमुळे कोणत्याही आंतरराष्ट्रीय कायद्याचं, तहाचं किंवा करारांचं उल्लंघन झालेलं नाही. आमचा प्रयत्न शांतता ठेवण्याचा आहे, युद्धजन्य परिस्थिती निर्माण करण्याचा नाही," असंही त्यांनी स्पष्ट केलं.
'मिशन शक्ती'चे DRDO ने जारी केलेले फोटो
देशाची मान उंचावणाऱ्या वैज्ञानिकांचा अभिमान : मोदी
आपल्या भाषणात पंतप्रधान मोदींनी वैज्ञानिकांचं कौतुक केलं. सर्व भारतीयांसाठी ही अभिमानाची बाब आहे. ही कामगिरी भारतीय बनवटीच्याच A-SAT या क्षेपणास्त्राद्वारे केली. या अभियानाशी संबंधित सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आज त्यांनी पुन्हा एकदा देशाची मान अभिमानाने उंचावली आहे. आम्हाला देशाच्या वैज्ञानिकांचा अभिमान आहे. आपल्या उपग्रहांचा फायदा सगळ्यांनाच मिळतो. येत्या काळात त्यांचा वापर आणि महत्त्व वाढणार आहे. अशा परिस्थितीत सुरक्षाही अतिशय महत्त्वपूर्ण आहे.
मोदींच्या ट्वीटमुळे अंदाज, शक्यतांना उधाण
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज महत्त्वाचा संदेश देणार असल्याचं ट्विटरद्वारे सांगितलं. मी आज सकाळी 11.45 - 12.00 दरम्यान एक महत्त्वाचा संदेश घेऊन येणार आहे. तसंच रेडिओ, टीव्ही आणि सोशल मीडियाद्वारे लोकांशी संवाद साधणार असल्याचं सांगितलं.
"मेरे प्यारे देशवासियों, आज सवेरे लगभग 11.45 - 12.00 बजे मैं एक महत्वपूर्ण संदेश लेकर आप के बीच आऊँगा।," असं ट्वीट त्यांनी केलं आहे.
मोदींच्या या ट्वीटमुळे अनेक अंदाज वर्तवले जात होते. पुन्हा नोटाबंदी की, काश्मीरचा मुद्दा, निवडणूक की आणखी काही, अशा एक ना अनेक शक्यता वर्तवल्या जात होता. मोदी देशाला संबोधणार यामुळे आधीच उत्सुकता शिगेले पोहोचली. त्यात आधी पावणे बारा, मग बारा वाजून गेल्यानंतरही मोदी लाईव्ह न आल्याने धीर सुटत होता. अखेर 12.25 च्या सुमारास मोदी लाईव्ह आले आणि पुढील दहा मिनिटात त्यांनी भारताने अंतराळात केलेल्या कामगिरीची माहिती दिली VIDEO | भारताकडून अँटी सॅटेलाईट मिसाईल चाचणी यशस्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा देशाला संदेशमेरे प्यारे देशवासियों,
आज सवेरे लगभग 11.45 - 12.00 बजे मैं एक महत्वपूर्ण संदेश लेकर आप के बीच आऊँगा। I would be addressing the nation at around 11:45 AM - 12.00 noon with an important message. Do watch the address on television, radio or social media. — Chowkidar Narendra Modi (@narendramodi) March 27, 2019
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
भारत
भारत
क्राईम
Advertisement