एक्स्प्लोर

अंधेरीत नोटांचा वापर करुन 'नोटा'ला मतदान करण्यासाठी दबाव; अनिल परबांचा खळबळजनक आरोप

Andheri East Bypoll Election : अंधेरीत नोटांचा वापर करुन 'नोटा'ला मतदान करण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचा खळबळजनक आरोप अनिल परबांनी केला आहे.

Andheri East Bypoll Election : अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी (Andheri East Bypoll 2022) उद्या (गुरुवारी) मतदान होणार आहे. यापूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shiv sena Uddhav Balasaheb Thackeray) गटाचे नेते अनिल परब (Anil Parab) यांनी केलेल्या आरोपांमुळे मात्र खळबळ माजली आहे. अंधेरीत (Andheri News) नोटांचा वापर करुन 'नोटा'ला मतदान करण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचा खळबळजनक आरोप ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी केला आहे. तसेच, यासंदर्भातील माहिती आणि पुरावे आमच्याकडे असल्याचंही अनिल परब यांनी म्हटलं आहे. 

आमदार रमेश लटके (Ramesh Latke) यांच्या निधनामुळं रिक्त झालेल्या अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात गुरुवारी पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीत शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांचे मुख्य प्रतिस्पर्धी उमेदवार मुरजी पटेल यांचा अर्ज भाजपकडून मागे घेण्यात आला आहे. त्यामुळं ऋतुजा लटके यांचा सामना केवळ अपक्ष उमेदवारांशी आहे. पण तरीही अंधेरीच्या पोटनिवडणुकीत वादाचे पडघम वाजत आहेत. या पोटनिवडणुकीत मोठ्या प्रमाणावर नोटांचा वापर हा नोटा पर्यायावर मतदान करण्यासाठी होणार असल्याची माहिती आणि पुरावे आमच्याकडे आहेत, असा आरोप ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी केला आहे. त्यासंदर्भात सोशल मीडियावरील विशेष करून आरपीआय पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या व्हिडीओ क्लिप आपण निवडणूक आयोग आणि पोलिसांकडे सादर केल्याची माहिती परब यांनी दिली आहे. 

अनिल परब आणि ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांनी काल (मंगळवारी) संयुक्त पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी अनिल परब यांनी खळबळजनक आरोप केले. अनिल परब म्हणाले की, "पोटनिवडणुकीसाठी काही लोकांना नोटा देऊन, नोटा बटण दाबण्यासाठी दबाव टाकला जात आहे. यासंदर्भात आम्ही पोलीसांना तक्रार केली आहे. निवडणूक आयोगाला आम्ही क्लिप्स पाठवल्या आहेत. जे कोणी हे कृत्य करतंय त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. आरपीएआयचे कार्यकर्ते असा उघड प्रकार करत आहेत. आरपीआय हा त्यांचा मित्र पक्ष आहे. नोटांचं बटण दाबून निषेध व्यक्त करा, असा प्रचारही त्यांच्याकडून केला जातोय."

मतमोजणी कधी? 

निवडणूक आयोगानं अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीची तारीख जाहीर केली आहे. 3 नोव्हेंबर म्हणजेच, उद्या मतदान होणार असून 6 नोव्हेंबरला मतमोजणी केली जाणार आहे. त्यामुळे 3 ऑक्टोबरपासून अंधेरी (पूर्व) या विधानसभा मतदार संघ क्षेत्रात आचारसंहिता लागू झाली आहे. 

दरम्यान, शिवेसेनेतील दोन गट ठाकरे समर्थक असलेला शिवसेना : 'उद्धव बाळासाहेब ठाकरे गट' आणि 'बाळासाहेबांची शिवसेना' असलेला शिंदे गट. हे दोन्ही गट एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. शिवसेनेतील बंडाचा प्रभाव अंधेरीतील पोटनिवडणुकीत पाहायला मिळणार आहे. शिवसेनेतील बंडानंतरची ही पहिली निवडणूक असल्यामुळे संपूर्ण राज्याचं लक्ष या निवडणुकीकडे लागलं आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Asha Bhosle : माझं आता वय झालं आहे, फार थोडे दिवस राहिले आहेत, असंच प्रेम देत रहा; पुस्तक प्रकाशनात आशाताई भावूक
माझं आता वय झालं आहे, फार थोडे दिवस राहिले आहेत, असंच प्रेम देत रहा; पुस्तक प्रकाशनात आशाताई भावूक
अजित पवारांकडून गिफ्ट, पेट्रोल अन् डिझेलचे दर कमी होणार; मुंबईसह 3 शहरात 'टॅक्स' कमी करणार
अजित पवारांकडून गिफ्ट, पेट्रोल अन् डिझेलचे दर कमी होणार; मुंबईसह 3 शहरात 'टॅक्स' कमी करणार
सरकारच्या 'या' कंपनीचं गुंतवणूकदारांना मोठं गिफ्ट, शेअरधारक होणार मालामाल!
सरकारच्या 'या' कंपनीचं गुंतवणूकदारांना मोठं गिफ्ट, शेअरधारक होणार मालामाल!
Maharashtra Budget 2024: लाडकी बहीण, पिंक रिक्षा, अन्नपूर्णा... महायुती सरकारकडून महिलांसाठी धडाधड योजनांची घोषणा अन् पैशांचा पाऊस
मुख्यमंत्री लाडकी बहीण, पिंक रिक्षा, अन्नपूर्णा... महायुती सरकारकडून महिलांसाठी धडाधड योजनांची घोषणा अन् पैशांचा पाऊस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vijay Wadettiwar Assembly Session : शेतकऱ्यांवर GST लावला, मध्ये बोलू नका... वडेट्टीवार कुणावर भडकलेCM Eknath Shinde on Drugs : ड्रग्ज संपेपर्यंत कारवाई थांबणार नाही - एकनाथ शिंदेDhananjay Munde on Jayant Patil :शेतकऱ्यांना मदतीचा मुद्दा, धनंजय मुंडे धावले अनिल पाटलांच्या मदतीलाPorsche Car Accident : पोर्शे कार अपघात प्रकरणावर पावसाळी अधिवेशनात चर्चा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Asha Bhosle : माझं आता वय झालं आहे, फार थोडे दिवस राहिले आहेत, असंच प्रेम देत रहा; पुस्तक प्रकाशनात आशाताई भावूक
माझं आता वय झालं आहे, फार थोडे दिवस राहिले आहेत, असंच प्रेम देत रहा; पुस्तक प्रकाशनात आशाताई भावूक
अजित पवारांकडून गिफ्ट, पेट्रोल अन् डिझेलचे दर कमी होणार; मुंबईसह 3 शहरात 'टॅक्स' कमी करणार
अजित पवारांकडून गिफ्ट, पेट्रोल अन् डिझेलचे दर कमी होणार; मुंबईसह 3 शहरात 'टॅक्स' कमी करणार
सरकारच्या 'या' कंपनीचं गुंतवणूकदारांना मोठं गिफ्ट, शेअरधारक होणार मालामाल!
सरकारच्या 'या' कंपनीचं गुंतवणूकदारांना मोठं गिफ्ट, शेअरधारक होणार मालामाल!
Maharashtra Budget 2024: लाडकी बहीण, पिंक रिक्षा, अन्नपूर्णा... महायुती सरकारकडून महिलांसाठी धडाधड योजनांची घोषणा अन् पैशांचा पाऊस
मुख्यमंत्री लाडकी बहीण, पिंक रिक्षा, अन्नपूर्णा... महायुती सरकारकडून महिलांसाठी धडाधड योजनांची घोषणा अन् पैशांचा पाऊस
Pankaj Jawale : लाचखोर मनपा आयुक्त पंकज जावळे फरार, सोलापुरातील घरी एसीबीचे पथक दाखल, झाडाझडतीत काय सापडलं?
लाचखोर मनपा आयुक्त पंकज जावळे फरार, सोलापुरातील घरी एसीबीचे पथक दाखल, झाडाझडतीत काय सापडलं?
अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस; 3 सिलेंडर मोफत, महिन्याला 1500 रुपये, अजित पवारांच्या 'बजेट'मधील टॉप 10 घोषणा
अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस; 3 सिलेंडर मोफत, महिन्याला 1500 रुपये, अजित पवारांच्या 'बजेट'मधील टॉप 10 घोषणा
Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z 
राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z 
Ladki Bahin Yojana : महिलांना महिन्याला दीड हजार, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना नेमकी काय?
महिलांना महिन्याला दीड हजार, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना नेमकी काय?
Embed widget