प्रकाश आंबेडकरांना पुण्यातील रुग्णालयातून डिस्चार्ज; 4 - 5 दिवसांत विधानसभेच्या प्रचारात येणार
गुरुवारी 31 ऑक्टोबरच्या पहाटे त्यांना छातीत दुखू लागल्याने पुण्यातील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
पुणे : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्यावर अँजीओग्राफी आणि अँजीओप्लास्टी अशा सर्जरी पुण्यातील एका रुग्णालयात करण्यात आल्या. त्यानंतर आज त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती वंचित बहुजन आघाडीकडून (VBA) देण्यात आली आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार अँजीओप्लास्टी नंतरची काळजी घेण्यासाठी आणि लवकरात लवकर बरे होण्यासाठी बाळासाहेबांना एका वेलनेस सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. पुढील 4 - 5 दिवसांत बाळासाहेब आंबेडकर (Prakash ambedkar) हे विधानसभा निवडणूक प्रचाराला येणार असल्याचेही वंचित बहुजन आघाडीने म्हटले आहे.
गुरुवारी 31 ऑक्टोबरच्या पहाटे त्यांना छातीत दुखू लागल्याने पुण्यातील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्यावर अँजीओग्राफी आणि अँजीओप्लास्टी करण्यात आली. ती यशस्वी होऊन आज बाळासाहेब आंबेडकर यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. बाळासाहेबांना छातीत दुखत होते आणि अस्वस्थ वाटत होते. म्हणून त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यानुसार अँजीओग्राफी करण्यात आली आहे.
दरम्यान, वंचित बहुजन आघाडीच्या सोशल मिडिया एक्स (पुर्वीचे ट्विटर) अकाऊंटवरून प्रकाश आंबेडकरांच्या तब्ब्येतीबाबत माहिती देण्यात येत होती. त्यानुसार, आता त्यांची प्रकृती उत्तम असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. मात्र, ते वेलनेस सेंटरमध्ये राहणार आहेत. 'बाळासाहेब आंबेडकर यांची अँजिओप्लास्टी यशस्वी झाली. बाळासाहेब पुढील 24 तास आयसीयूमध्ये वैद्यकीय तज्ज्ञांच्या निरीक्षणाखाली असतील. तमाम हितचिंतक आणि जनतेने दिलेल्या पाठिंब्याबद्दल आणि संदेशांसाठी सर्वांचे आंबेडकर कुटुंब आभार मानते", असेही वंचितच्या ट्विटर अकाऊंटवरुन म्हटले आहे.
आप-आपले मतदारसंघ सांभाळा
प्रकाश आंबेडकर यांना रुग्णालयात भरती केल्यानंतर सुजात आंबेडकर यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केलं होतं. मीडियाच्या माध्यमातून मी मीडिया आणि कार्यकर्त्यांना विनंती करतो की, इकडे खूप मोठी डॉक्टरांची टीम आहे, सपोर्टीग स्टाफ आहे, जो बाळासाहेबांची काळजी घेत आहे. त्यामुळे हॉस्पिटल आणि स्टाफ यांना त्रास होईल अशी कोणतीही कृती करू नका. माझी सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की, आपापले मतदारसंघ सांभाळा, ते सोडू नका आम्ही सर्व बाळासाहेबांच्या सोबत असल्याचे वंचित बहुजन युवा आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांनी म्हटले आहे.
हेही वाचा