एक्स्प्लोर

ओवेसी सांगत नाहीत तोपर्यंत एमआयएमसोबत युती कायम : प्रकाश आंबेडकर

या वक्तव्यामुळे प्रकाश आंबेडकर आणि खासदार इम्तियाज जलील यांच्यातील संघर्ष परत एकदा समोर आला आहे.

नागपूर : 'आमची एमआयएमसोबत युती महाराष्ट्राच्या नेत्यांशी झाली नाही ओवेसी यांच्यासोबत झाली आहे, असे सांगत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी एमआयएमसोबत युती कायम असल्याचे म्हटले आहे. एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी याविषयी जोपर्यंत काही स्पष्ट करत नाही तोपर्यंत आमची युती कायम असल्याचं आंबेडकर यांनी म्हटलं आहे. विधानसभा निवडणुकीच्याआधी एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये फूट पडली आहे. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी दोन दिवसांपूर्वी त्याबाबत घोषणा केली आहे. मात्र प्रकाश आंबेडकर यांनी खासदार ओवैसी सांगत नाहीत तोपर्यंत आमची युती कायम असल्याचं म्हटलं आहे. "आमची युती महाराष्ट्राच्या नेत्यांशी झाली नाही तर ओवेसी यांच्यासोबत झाली आहे. त्यांची माणसं हैद्राबादवरून आमच्याकडे आली आणि आता ओवेसी यांच्याकडे निरोप घेऊन गेली आहेत", असं आंबेडकर यांनी म्हटलं आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या या वक्तव्यामुळे त्यांच्यातील आणि खासदार इम्तियाज जलील यांच्यातील संघर्ष परत एकदा समोर आला आहे. 'वंचितसोबतची युती तोडण्याचा इतका मोठा निर्णय मी एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्या परवानगीने शिवाय घेऊ शकत नाही. हा निर्णय पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनीच घेतला असल्याचं इम्तियाज जलील यांनी यापूर्वीच सांगितलं आहे. विधानसभेसाठी जागावाटपाचा तिढा न सुटल्याने एमआयएमने वेगळं होण्याचा निर्णय घेतल्याचं परिपत्रक यापूर्वीच खासदार इम्तियाज जलील यांनी जारी केलं आहे. 'वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत गेल्या दोन महिन्यांपासून विधानसभेच्या जागावाटपाबाबत चर्चा सुरु होती. मात्र समाधानकारक जागावाटप होत नसल्याने वेगळं होण्याचा निर्णय घ्यावा लागत आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांपैकी केवळ 8 जागा एमआयएमसाठी सोडण्यास वंचित आघाडीने तयारी दर्शवली होती, ती आम्हाला मान्य नव्हती', असं इम्तियाज जलील यांनी म्हटलं. एमआयएम-वंचितमध्ये फूट, एमआयएम स्वबळावर निवडणूक लढणार
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अंजली दमानियांना जीवे मारण्याची धमकी, गाडीत मोबाईल बंद ठेवा; अधिकाऱ्याचा फोन, दमानियांची पहिली प्रतिक्रिया
अंजली दमानियांना जीवे मारण्याची धमकी, गाडीत मोबाईल बंद ठेवा; अधिकाऱ्याचा फोन, दमानियांची पहिली प्रतिक्रिया
Swami Samarth Math Thane: घोडबंदर रोडवरील स्वामी समर्थांचा मठ हटवण्याच्या हालचाली, अविनाश जाधव संतापले, म्हणाले, 'स्वामींच्या नादी लागू नका नाहीतर...'
घोडबंदर रोडवरील स्वामी समर्थांचा मठ हटवण्याच्या हालचाली, अविनाश जाधव संतापले, म्हणाले, 'स्वामींच्या नादी लागू नका नाहीतर...'
Nitin Gadkari: शेतकरी आता हायड्रोजनदाता होणार; नितीन गडकरींनी लातूरमधून बळीराजाला दिला प्रगतीचा मंत्र
शेतकरी आता हायड्रोजनदाता होणार; नितीन गडकरींनी लातूरमधून बळीराजाला दिला प्रगतीचा मंत्र
अखेर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र, हसन मुश्रीफ यांनीच केली घोषणा; महायुती फिस्कटली, निवडणुकांसाठी नवी आघाडी
अखेर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र, हसन मुश्रीफ यांनीच केली घोषणा; महायुती फिस्कटली, निवडणुकांसाठी नवी आघाडी
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Hemat Kshirsagar Join BJP : संदीप क्षीरसागर यांचे सख्खे भाऊ हेमंत क्षीरसागर भाजपच्या वाटेवर
Vita Fire : विट्यात चौघांचा होरपळून मृत्यू, मृतांमध्ये चिमुकलीचा समावेश
Chhagan Bhujbal VS Suhas Kande: आगामी निवडणुकीत छगन भुजबळ विरुद्ध सुहास कांदे संघर्ष पेटणार?
Bacchu Kadu On Election Commision :'निवडणूक आयोगाला नोटांची गड्डी मिळाली असेल', बच्चू कडूंचा थेट आरोप
Vijay Waddettiwar On Vikhe Patil : विखे पाटलांना चिखलाचा प्रसाद दिला पाहिजे, वडेट्टीवारांचा संताप

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अंजली दमानियांना जीवे मारण्याची धमकी, गाडीत मोबाईल बंद ठेवा; अधिकाऱ्याचा फोन, दमानियांची पहिली प्रतिक्रिया
अंजली दमानियांना जीवे मारण्याची धमकी, गाडीत मोबाईल बंद ठेवा; अधिकाऱ्याचा फोन, दमानियांची पहिली प्रतिक्रिया
Swami Samarth Math Thane: घोडबंदर रोडवरील स्वामी समर्थांचा मठ हटवण्याच्या हालचाली, अविनाश जाधव संतापले, म्हणाले, 'स्वामींच्या नादी लागू नका नाहीतर...'
घोडबंदर रोडवरील स्वामी समर्थांचा मठ हटवण्याच्या हालचाली, अविनाश जाधव संतापले, म्हणाले, 'स्वामींच्या नादी लागू नका नाहीतर...'
Nitin Gadkari: शेतकरी आता हायड्रोजनदाता होणार; नितीन गडकरींनी लातूरमधून बळीराजाला दिला प्रगतीचा मंत्र
शेतकरी आता हायड्रोजनदाता होणार; नितीन गडकरींनी लातूरमधून बळीराजाला दिला प्रगतीचा मंत्र
अखेर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र, हसन मुश्रीफ यांनीच केली घोषणा; महायुती फिस्कटली, निवडणुकांसाठी नवी आघाडी
अखेर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र, हसन मुश्रीफ यांनीच केली घोषणा; महायुती फिस्कटली, निवडणुकांसाठी नवी आघाडी
Sameer Bhujbal vs Suhas Kande: भाजपला सोबत घेऊन समीर भुजबळ शिवसेनेला हादरा देणार; नाशकात भुजबळ विरुद्ध कांदे संघर्ष पुन्हा पेटणार
भाजपला सोबत घेऊन समीर भुजबळ शिवसेनेला हादरा देणार; नाशकात भुजबळ विरुद्ध कांदे संघर्ष पुन्हा पेटणार
Australia Social Media Ban : ऑस्ट्रेलियाचा मोठा निर्णय, लहान मुलांच्या सोशल मीडिया वापरावर बंदी, पंतप्रधान म्हणाले...
ऑस्ट्रेलियाचा मोठा निर्णय, लहान मुलांच्या सोशल मीडिया वापरावर बंदी, पंतप्रधान अल्बनीज म्हणाले...
सांगली : विक्रीला ठेवलेल्या फ्रीजमधील सिलिंडरचा स्फोट अन् क्षणात अवघं कुटुंब उद्ध्वस्त, हसत्या खेळत्या कुटुंबाचा सत्यानाश
सांगली : विक्रीला ठेवलेल्या फ्रीजमधील सिलिंडरचा स्फोट अन् क्षणात अवघं कुटुंब उद्ध्वस्त, हसत्या खेळत्या कुटुंबाचा सत्यानाश
Nashik Crime: 'तुझा गेमच वाजवतो' म्हणणाऱ्याचा नाशिक पोलिसांनी उतरवला 'माज'; गोळीबाराच्या मास्टरमाइंडला सिनेस्टाईल पाठलाग करत ठोकल्या बेड्या
'तुझा गेमच वाजवतो' म्हणणाऱ्याचा नाशिक पोलिसांनी उतरवला 'माज'; गोळीबाराच्या मास्टरमाइंडला सिनेस्टाईल पाठलाग करत ठोकल्या बेड्या
Embed widget