एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
युतीनंतर बीएमसीतील पहारेकरी भाजपला सत्तेत वाटेकरी होण्याचे वेध?
2017 च्या महापालिका सार्वत्रिक निवडणुकीनंतर आमचे नगरसेवक पहारेकरी म्हणून काम पाहतील, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं होतं. तेव्हापासून महापालिकेत प्रभाग समिती अध्यक्षपद वगळता कोणत्याही वैधानिक, विशेष समित्यांचे अध्यक्षपद भाजपाच्या नगरसेवकांनी स्वीकारलेले नाही
मुंबई : शिवसेना-भाजप युतीनंतर मुंबई महापालिकेतील राजकीय समीकरणं बदलण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिकेत पहारेकऱ्यांची भूमिका बजावणाऱ्या भाजपला सत्तेत सामील होण्याचे वेध लागल्याचे संकेत आहेत. मुंबई महापालिकेतील भाजपची भूमिका ठरवण्याविषयी लवकरच मुंबई भाजपची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे.
या बैठकीत येत्या काळात मुंबई महापालिकेत होणाऱ्या समित्यांच्या निवडणुकांमध्ये भाजप सहभागी होणार का, याविषयी निर्णय होणार आहे. सध्या मुंबई महापालिकेत भाजपचे अपक्षांसह 85 नगरसेवक आहेत, तर शिवसेनेचे अपक्षांसह 93 नगरसेवक आहेत.
कल्याण-डोंबिवली, ठाणे सारख्या महापालिकेत भाजप सत्तेत सामील आहे, तर मुंबई महापालिकेत का होऊ शकत नाही? असे प्रश्न आता मुंबई महापालिकेच्या भाजपच्या गोटातून ऐकायला मिळत आहेत. त्यातच येत्या काळात मार्च-एप्रिल महिन्यात मुंबई महापालिकेच्या विविध समित्यांच्या अध्यक्षपदाच्या निवडणूका आहेत.
आजवर भाजपच्या वाट्याला येणाऱ्या उपमहापौर, सुधार समिती, शिक्षण समिती, विधी, स्थापत्य समिती या समित्यांचे अध्यक्षपद गेल्या बीएमसी निवडणुकीनंतर भाजपने स्वीकारलेले नाही. त्यामुळे सेनेच्या बहुतांशी नगरसेवकांना विविध समित्यांचे अध्यक्षपद भूषवता आले.
त्यासोबतच, गेली काही वर्षे उपमहापौरपद हे भाजपकडेच होतं. मात्र 2017 च्या महापालिका सार्वत्रिक निवडणुकीनंतर आमचे नगरसेवक पहारेकरी म्हणून काम पाहतील, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं होतं. तेव्हापासून महापालिकेत प्रभाग समिती अध्यक्षपद वगळता कोणत्याही वैधानिक, विशेष समित्यांचे अध्यक्षपद भाजपाच्या नगरसेवकांनी स्वीकारलेले नाही. मात्र युतीच्या यशस्वी फॉर्म्युल्यानंतर पुढील आर्थिक वर्षापासून भाजप पुन्हा सत्तेतील वाटेकरी होणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
करमणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement