14 मित्रपक्षाकडे 53 खासदार, मंत्रिमंडळात 11 जणांना संधी, राष्ट्रवादीसह या पक्षाला स्थान नाहीच, पाहा टीम मोदीमध्ये कोण कोण ?
PM Modi Oath Ceremony : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह 72 मंत्र्यांनी शपथ घेतली. यामध्ये 30 कॅबिनेट मंत्री, 5 राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार आणि 36 राज्यमंत्र्यांचा समावेश होता.
PM Modi Oath Ceremony : लोकसभा निवडणुकीत 293 जागा जिंकत बहुमत मिळवणाऱ्या एनडीए सरकारचा रविवारी शपथविधी पार पडला. नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. राष्ट्रपती द्रौपती मुर्मू यांनी नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाची शपथ दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह 72 मंत्र्यांनी शपथ घेतली. यामध्ये 30 कॅबिनेट मंत्री, 5 राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार आणि 36 राज्यमंत्र्यांचा समावेश होता. महाराष्ट्रातील सहा जणांनी मंत्रिपदाची शपत घेतली. यामध्ये नितीन गडकरी, पियूष गोयल, प्रतापराव जाधव, रामदास आठवले, रक्षा खडसे आणि मुरलीधर मोहळ यांचा समावेश आहे.
24 राज्यातील खासदारांना मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे. त्याशिवाय देशातील जातीय आणि राजकीय समीकरणं साधण्याचा प्रयत्नही करण्या आला. मागील मंत्रिमंडळातील 21 मंत्र्यांना पुन्हा एकदा स्थान देण्यात आलेय. भाजपच्या 61 खासदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली, तर एनडीएमधील 9 मित्रपक्षाच्या 11 खासदारांना मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान मिळाले. सहा मित्रपक्षाला एकही मंत्रिपद मिळाले नाही. यामध्ये महाराष्ट्रातील अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाही समावेश आहे.
भाजपने सर्व मित्रपक्षांना खूश करण्याचा प्रयत्न केला. पण काही मित्रपक्षाला मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही. एनडीएच्या 14 मित्रपक्षाकडे 53 खासदारांची फौज आहे. पण फक्त 9 पक्षांना 11 मंत्रिपदे मिळाली आहेत. पाच मित्रपक्षांना मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही.
कुणाकडे किती जाणा, अन् किती मंत्रिपदे मिळाली, हे पाहूयात....
पक्ष | जागा | मंत्रिपदे |
भाजप | 240 | 61 |
टीडीपी | 16 | 2 |
जदयू | 16 | 2 |
शिवसेना (शिंदे) | 7 | 1 |
एलजेपी (आर) | 5 | 1 |
जनसेना | 2 | 0 |
जेडीएस | 2 | 1 |
आरएलडी | 2 | 1 |
एचएएम | 1 | 1 |
एजीपी | 1 | 0 |
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) | 1 | 0 |
एसकेएम | 1 | 0 |
अपना दल (एस) | 1 | 1 |
एजेएसयू | 1 | 0 |
यूपीपीएल | 1 | 0 |
रिपांई | 0 | 1 |
कुणाला स्थान नाही मिळालं ?
मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळालेल्या पक्षामध्ये जनसेना पार्टीचं नाव आघाडीवर आहेत. त्यांच्याकडे दोन खासदार आहेत. त्याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस, सिक्किम क्रांतिकारी मोर्चा (एसकेएम), असम गण परिषद आणि ऑल झारखंड स्टूडेंट्स यूनियन (आजसू) यांना मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही.
कोणत्या राज्याला किती मंत्रिपदे ?
उत्तरप्रदेश 10, बिहार 8, महाराष्ट्र 6, गुजरात 5, कर्नाटक 5, मध्य प्रदेश 5, राजस्थान 4, आंध्र प्रदेश 3 ओदिशा 3, हरियाणा 3, झारखंड 2, पश्चिम बंगाल 2, तेलंगणा 2, केरळ 2, पंजाब 1, गोवा 1, छत्तीसगढ 1, जम्मू काश्मिर 1, अरुणाचल प्रदेश 1, आसाम 1, हिमाचल प्रदेश 1, उत्तराखंड 1
पाहूयात मंत्रिमंडळ कसं आहे...?
पंतप्रधान : नरेंद्र मोदी
कॅबिनेट मंत्री : राजनाथ सिंह, अमित शाह, नितीन गडकरी, जे. पी. नड्डा, शिवराज सिंह चौहान, निर्मला सीतारमण, एस. जयशंकर, मनोहर लाल खट्टर, एच.डी. कुमारस्वामी, पीयूष गोयल, धर्मेंद्र प्रधान, जीतन राम मांझी, राजीव रंजन सिंह, सर्वानंद सोनोवाल, डॉ. वीरेंद्र कुमार, राममोहन नायडू, प्रल्हाद जोशी, जुएल ओराम, गिरीराज सिंह, अश्विनी वैष्णव, ज्योतिरादित्य सिंधिया, भूपेंद्र यादव, गजेंद्रसिंह शेखावत, अन्नपूर्णा देवी, किरेन रिजिजू, हरदीप सिंह पुरी, डॉ. मनसुख मांडविया, जी. किशन रेड्डी, चिराग पासवान, सी. आर. पाटील.
राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) : राव इंद्रजीत सिंह, प्रतापराव जाधव, जितेंद्र सिंह, अर्जुन राम मेघवाल, जयंत चौधरी.
राज्यमंत्री : जितिन प्रसाद, श्रीपाद नाईक, पंकज चौधरी, कृष्णपाल गुर्जर, रामदास आठवले, रामनाथ ठाकूर, नित्यानंद राय, अनुप्रिया पटेल, व्ही. सोमन्ना, चंद्रशेखर पेम्मासानी, एसपी सिंह बघेल, शोभा करंदलाजे, कीर्तिवर्धन सिंह, बनवारीलाल वर्मा, शंतनू ठाकुर, सुरेश गोपी, एल. मुरुगन, अजय टम्टा, बंडी संजय कुमार, कमलेश पासवान, भागीरथ चौधरी, सतीशचंद्र दुबे, संजय सेठ, रवनीत सिंह बिट्टू, दुर्गादास उइके, रक्षा खडसे, सुकांता मजूमदार, सावित्री ठाकूर, तोखन साहू, डॉ. राजभूषण निषाद, श्रीनिवास वर्मा, हर्ष मल्होत्रा, निमुबेन जयंतीभाई बांभानिया, मुरलीधर मोहोळ, जॉर्ज कुरियन, पबित्रा मार्गेरिटा