एक्स्प्लोर
Advertisement
शरदराव तुम्ही तिकडं शोभत नाहीत, पंतप्रधान मोदींची शरद पवारांवर टीका
यावेळी मोदींनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठीत केली. आई तुळजाभवानी आणि सिद्धेश्वर महाराज, शिवाचार्य महाराजांच्या पुण्यभूमीला माझा साष्टांग नमस्कार, अशा शब्दात त्यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली.
औसा : लातूर जिल्ह्यातील औस्यामध्ये आयोजित महायुतीच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस आणि विरोधकांसह शरद पवारांवर जोरदार टीकास्त्र सोडले. आज फुटीरतावादी लोकांसोबत शरद पवार उभे आहेत. शरदराव तुम्ही अशा लोकांसोबत उभे आहात, तुम्हाला हे शोभत का? राजकारण वेगळी गोष्ट मात्र शरद पवार तिकडं शोभत नाहीत, अशा शब्दात त्यांनी पवारांवर निशाणा साधला.
फुटीरतावाद्यांवर टीका करताना ओमर अब्दुलांच्या वक्तव्याचा धागा पकडून मोदींनी शरद पवारांवर टीका केली. ज्यांना वेगळा पंतप्रधान पाहिजे त्यांच्यासोबत शरद पवार आहेत, हे शोभणार नाही असे मोदी म्हणाले.
महायुतीच्या या सभेला यंदाच्या निवडणुकीत पहिल्यांदाच शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एकाच मंचावर आले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यासह महायुतीचे उमेदवार ओम राजे निंबाळकर, सुधाकर शृंगारे उपस्थित होते.
यावेळी मोदींनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठीत केली. आई तुळजाभवानी आणि सिद्धेश्वर महाराज, शिवाचार्य महाराजांच्या पुण्यभूमीला माझा साष्टांग नमस्कार, अशा शब्दात त्यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली.
यावेळी त्यांनी काँग्रेस आणि विरोधकांवर जोरदार टीका केली. देशातून दहशतवाद नष्ट करण्यासाठी सरकारने अनेक प्रयत्न केले आहेत. दहशतवाद्यांच्या अड्ड्यांमध्ये घुसून आम्ही मारणार, ही नव्या भारताची नीती आहे, असे मोदी म्हणाले. दहशतवाद संपवूनच आम्ही थांबणार असल्याचेही ते म्हणाले. जम्मू काश्मीरमध्ये आम्ही राष्ट्रवाद्यांच्या मनात सकारात्मकता जागविली आहे. आता तिथं दहशतवादी कारवाया कमी झाल्या आहेत, असे ते म्हणाले.
VIDEO | लातूरच्या औसा येथे महायुतीची जाहीर सभा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाषण | लातूर | एबीपी माझा
काँग्रेस आणि पाकिस्तानचे विचार एकसारखेच असल्याचा आरोप त्यांनी केला. काँग्रेसला अक्कल असती तर देशाची वाटणीच होऊ दिली नसती, असेही ते म्हणाले. जे पाकिस्तान म्हणतोय तेच काँग्रेसच्या जाहीरनाम्यात दिसतेय. ज्या लोकांना आपल्याच सैनिकांवर विश्वास नाही, त्यांना शिक्षा द्यायला हवी, त्यांचं डिपॉझिट जप्त करण्याची शिक्षा द्या, असे मोदी यावेळी म्हणाले.
UNCUT | वल्लभभाईंप्रमाणेच तुम्हीही मराठवाड्याच्या पाठीशी राहा, उद्धव ठाकरे यांचं भाषण | लातूर | एबीपी माझा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
क्राईम
निवडणूक
निवडणूक
Advertisement