एक्स्प्लोर
अकोल्यात मुख्यमंत्र्यांच्या प्रचारसभेआधी सोसाट्याच्या वाऱ्यामुळं मंडप कोसळला
या सभेसाठी भाजपनं मोठा मंडपही उभारला होता. मात्र, दुपारी सव्वाबाराच्या सुमारास आलेल्या वाऱ्यामुळे हा मंडप कोसळला. या दुर्घटनेत कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.

अकोला : अकोल्यातील आज भाजपच्या पहिल्याच प्रचारसभेच्या आधी मंडप कोसळला आहे. भाजपच्या प्रचारसभेचा मंडप सोसाट्याच्या वाऱ्यामुळं कोसळला. आज दुपारी तीन वाजता अकोल्यातील डाबकी रोड भागातल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रचारसभा आहे. या सभेसाठी भाजपनं मोठा मंडपही उभारला होता. मात्र, दुपारी सव्वाबाराच्या सुमारास आलेल्या वाऱ्यामुळे हा मंडप कोसळला. या दुर्घटनेत कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. आता परत मंडप उभारण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे. हा मंडप सभेच्या वेळेआधी पूर्ण होण्याची शक्यता कमी आहे. मात्र, अकोल्यातील पारा दररोज चाळीशीच्या वर जात असताना आता अकोलेकरांना ऐन उन्हातच मुख्यमंत्र्यांचं भाषण ऐकावं लागतं की काय?, अशी स्थिती निर्माण झाली आहे. एकीकडे पूर्व विदर्भात लोकसभेच्या निवडणुकीचा रोमांच शिगेला पोहोचला असताना दुसरीकडे पश्चिम विदर्भ आणि उर्वरित महाराष्ट्रात प्रचाराची रणधुमाळी जोरात सुरु आहे. अकोल्यामध्ये आज मुख्यमंत्र्यांच्या सभेची उत्सुकता लोकांना आहे. अकोला लोकसभा मतदारसंघातून भाजपचे संजय धोत्रे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांच्या विरोधात काँग्रेसचे हिदायत पटेल आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर रिंगणात आहेत.
आणखी वाचा




















