एक्स्प्लोर
नवीनचंद्र बांदिवडेकरांबाबत तक्रार केली आहे, पक्षाकडून पुनर्विचाराची अपेक्षा : पृथ्वीराज चव्हाण
सनातन समर्थक असा आरोप होत असलेल्या नवीनचंद्र बांदिवडेकरांच्या उमेदवारीबाबत पक्षाकडे तक्रार केलेली आहे. याप्रकरणी पक्षाकडून पुनर्विचार होईल, अशी अपेक्षा असल्याचे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले आहे.
मुंबई : सनातन समर्थक असा आरोप होत असलेल्या नवीनचंद्र बांदिवडेकरांच्या उमेदवारीबाबत पक्षाकडे तक्रार केलेली आहे. याप्रकरणी पक्षाकडून पुनर्विचार होईल, अशी अपेक्षा असल्याचे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले आहे.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेचे काँग्रेसचे उमेदवार नवीनचंद्र बांदिवडेकर यांचा 'सनातन संस्थे'शी संबंध असल्याचा आरोप झाला आहे. त्यामुळे त्यांची उमेदवारी रद्द करण्याची मागणी काँग्रेस नेत्यांकडून होत आहे. याप्रकरणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना विचारले असता, ते म्हणाले की, सनातन समर्थक उमेदवाराबाबत पक्षाकडे तक्रार केली आहे. त्याबाबत होईल.
दरम्यान, एक आठवड्यापूर्वी "आम्ही बांदिवडेकरांबाबत सखोल चौकशी केलेली असून त्यांचादेखील खुलासा प्राप्त झाला आहे. त्यांच्या उमेदवारीबाबत निर्माण झालेले वादळ शमले आहे. त्यांची उमेदवारी कायम आहे", अशी माहिती माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिली होती.
काँग्रेसच्या दोन बड्या नेत्यांच्या वेगवेगळ्या वक्तव्यांमुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
लातूर
क्राईम
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement