एक्स्प्लोर
Advertisement
वादग्रस्त दावे करणाऱ्या ख्रिश्चन धर्मगुरुंची भेट, पार्थ पवार टीकेचे धनी
पार्थ पवारांनी शनिवारच्या दौऱ्यात विनियार्ड वर्कर्स चर्चला सदिच्छा भेट दिली. यावेळी फादर डॉ. पीटर सिल्व्हा यांनी विजयासाठी आशीर्वाद दिले. त्यामुळे पार्थ सोशल मीडियावर ट्रोल होत आहेत
पिंपरी चिंचवड : राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळ लोकसभेचे उमेदवार पार्थ पवार आणि चर्चा हे एक समीकरण झालं आहे. वादग्रस्त दावे करणाऱ्या ख्रिश्चन धर्मगुरुंनी पार्थ यांच्या डोक्यावर हात ठेवलेला असतानाचा एक फोटो सोशल मीडियावर वायरल झाला आहे. यामुळे सोशल मीडियावर पार्थ पवारांवर टीकेची झोड उठली आहे.
मावळ लोकसभेची उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच पार्थ पवारांनी देव पाण्यात ठेवले होते. पिंपरी चिंचवडमधील मोरया गोसावी गणपती असो, किंवा कार्ल्यातील एकविरा आईचे आशीर्वाद घेऊन भेटीगाठींना सुरुवात असो, उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाल्यानंतर पार्थ यांनी अनेक मंदिराचे उंबरठे झिजवले, मात्र दोनच दिवसांपूर्वी पिंपरी चिंचवडमधील चर्चमध्ये फादर डॉक्टर पीटर सिल्व्हा यांनी डोक्यावर हात ठेवला आणि पार्थ पवारांच्या अडचणी वाढल्या.
पार्थ पवारांनी शनिवारच्या दौऱ्यात विनियार्ड वर्कर्स चर्चला सदिच्छा भेट दिली. यावेळी फादर डॉ. पीटर सिल्व्हा यांनी विजयासाठी आशीर्वाद दिले. आता हे फादर पीटर सिल्वा म्हणजे केवळ देवाला प्रार्थना करुन हृदयरोगासारखा आजार बरा करण्याचा दावा करणारे धर्मगुरु. त्यांचे काही अनुयायी तर खुद्द येशूंना मंचावर पाहिल्याचा दावा करतात.
VIDEO | वादग्रस्त दावे करणाऱ्या ख्रिश्चन धर्मगुरुंची भेट, पार्थ पवार टीकेचे धनी
एकीकडे हिंदुत्ववादी संघटनांनी हा आक्षेप घेतला तर दुसरीकडे अंधश्रद्धा निर्मूलन समितीने देखील पार्थसह सर्वच उमेदवारांना सूचित केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी आजवर पुरोगामीचा डंका पिटला, त्यातच खासदार सुप्रिया सुळे यांनी अनेकदा पूजा न घालण्याचे सल्ले दिले. पार्थ मात्र याउलट करताना दिसत असल्यामुळेच समाज माध्यमांवर पार्थ यांच्यावर टीकेची झोड उठत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement