एक्स्प्लोर

माझ्या घराचे दरवाजे सर्वांसाठी खुले असतील, पराभवानंतर पंकजा मुंडेंची भावनिक पोस्ट व्हायरल

पंकजा मुंडे यांची विधानसभेतील पराभवानंतर एक पोस्ट सोशली मीडियावर व्हायरल होत आहे. मी हा पराभव मान्य केला आहे असं या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे.

बीड : अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या बीडमधील परळी विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडे यांनी पंकजा यांचा पराभव केला. भावा-बहिणीमधील ही लढाई मोठी प्रतिष्ठेची बनली होती. परळीतून धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांचा जवळपास 30,524 मताधिक्यानं पराभव केला. पंकजा मुंडे यांच्या पराभवानंतर त्यांची एक पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायर होत आहे. त्यामध्ये मी पराभव मान्य केला असून या सर्वाचं चिंतन करेन, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.

पंकजा मुंडे यांची व्हायरल पोस्ट

मी माझा पराभव मान्य केला असून मी लागलीच माध्यमातूनही त्याचा स्वीकार केला आहे. असं सर्व का झालं यावर मी चिंतन करेन लोकांना जाऊन भेटेन. आता या विषयाला सर्वांनी विराम द्यावा. कोणी कोणावर आरोप करू नये, जबाबदारी ढकलू नये, निवांत आपली दिवाळी कुटुंबासमवेत साजरी करावी. राजकारणात सर्वेसर्वा असतात मतदार, त्यांचा निर्णय अंतिम असतो. तो योग्य का अयोग्य यात चर्चा नसतेच, तो अंतिम असतो बस्स!! ज्यांनी मतदान केलेलं असतं त्या लोकांसाठी तो निर्णय योग्यच असतो!! मी माझ्या प्रचाराच्या शेवटच्या सभेत स्पष्ट केलं होतं "मला मुक्त करा किंवा स्वतः मुक्त व्हा." या राजकारणात मी यशस्वी होणं हा ही पराभव आहे, असंही मला वाटत राहिलं.

19 ऑक्टोबरला 6 वाजता प्रचार संपला, नंतर मी घरी गेले ते सरळ मतदानासाठीच बाहेर पडले 21 तारखेला सकाळी. माझ्या निवडणुकीत ऐन महत्वाच्या दिवशीच मी घरी बसून राहिले. गोपीनाथ गड येथे साहेबांचे दर्शन घेतले मध्ये आणि थेट मतदानाच्या सकाळीच बाहेर पडले. मला मतं मिळाली नसतीलही, मला मन जिंकताही आली नसतील पण एक मात्र नक्की आहे, 'असत्य मला वागता आलं नाही' हे शत्रूही कबूल करेल. या पोस्टच्या खाली येणारे ट्रोल विरोधक जाहीरपणे नाही, पण एकांतात मान्यच करतील 'ताईना खोटं नाही जमलं'

विश्वास ठेवा मी 'त्या 'क्लीप मधील वाक्याने जी घायाळ झाले ते उठलेच नाही. मी सर्व प्रहार आणि संघर्ष भोगले पण हा वार जिव्हारी लागला आणि ते जर बनावट असतं तर मी काही प्रभावित नसते झाले हे ही नक्की. इतकी मी प्रगल्भ नक्कीच आहे हो. मंचावर त्या दिवशी मी खूप सावरलं स्वतःला, मीडिया ही गेला होता. मी काही प्रवेश ही घेतले पण गाडीच्या दिशेने जाताना कोसळले, त्याबद्दल जरा अवघड वाटत आहे. त्याचा अर्थ घेणारे घेतीलच पण जमलं तर विश्वास ठेवा. माझ्या स्वाभिमानी स्वभावाला खूप लागलं, माझं कोलमडून पडणं अगदी निवडणूक हरल्या पेक्षाही लागलं.

मी आजवर राजकीय जीवनात जे केलं ते लोकांसाठी त्या सर्व भावना आणि स्व. मुंडे साहेबांची शपथ घेऊन सांगते मी शांत आहे आणि मुक्त झाली आहे. निकालाची जवाबदारी फक्त माझी आहे! हा पराभव पंकजा गोपीनाथ मुंडेंचा आहे, कारण तो हवा होता अनेकांना म्हणूनच झाला असावा. खूप काही जिल्ह्यासाठी स्वप्न होती ती राहिली सल एवढीच आहे. फक्त साऱ्यांना वेठीला धरुन राजकारण बंद व्हावं. कोणीतरी शाश्वत विकासावर बोलावं आणि तो करावा. नाहीतर उद्या लोक म्हणतील "ताई फोन उचलत नव्हत्या, भेटत नव्हत्या अशी चर्चा ऐकली होती, पण न फोन करता विकास दारात येत होता हे विचारात घेतलंच नाही." विकास निरपेक्ष आणि शाश्वत असावा ही इच्छा कोणीही पूर्ण करावी, त्यांना माझ्या शुभेच्छा.

चला मग रजा घेते, सामाजिक कर्तव्यातून नाही पण पराभूत लोकप्रतिनिधी म्हणून. पत्ता कळवते. माझ्या घराचे दरवाजे सर्वांसाठी खुले असतील. काळजी घ्या स्वतःची आणि माझ्या जिल्ह्यातील विकासाची.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Saif Ali Khan : गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
Jalgaon Train Accident : जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : एबीपी माझा हेडलाईन्स : 22 Jan 2025 : ABP MajhaCentral Department On Bangladeshiबांगलादेशी घुसखोरांविरोधात कठोर कारवाईचे महाराष्ट्र सरकारला आदेशBird flu Maharashtra | राज्यात बर्ड फ्ल्यूने पोल्ट्री व्यावसायिकांचं वाढवलं टेंशन Special ReportSpecial Report Walmik Karadवाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी; न्यायालयीन कोठडीचा अर्थ काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Saif Ali Khan : गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
Jalgaon Train Accident : जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
Jalgaon Train Accident : जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले तर याद राखा, गाठ आमच्याशी; खडसेंची आदिती तटकरेंवर बोचरी टीका
लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले तर याद राखा, गाठ आमच्याशी; खडसेंची आदिती तटकरेंवर बोचरी टीका
Jalgaon train accident अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून दखल; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना कारवाईचे निर्देश
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून मोठा निर्णय; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना लेखी निर्देश
Embed widget