एक्स्प्लोर
राधाकृष्ण विखे पाटील नाराज, महाआघाडीच्या दोन्ही मेळाव्याकडेही पाठ
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी नांदेडमध्ये आयोजित केलेल्या सभेतही विखे पाटील नव्हते. तर राष्ट्रवादी काँग्रेसने काल (24 फेब्रुवारी) परळीला आयोजित केलेल्या मेळाव्यालाही त्यांनी दांडी मारली.

मुंबई : दक्षिण अहमदनगरच्या जागेबाबात अजूनही निर्णय होत नसल्याने विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील नाराज असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे महाआघाडीच्या दोन्ही मेळाव्यात राधाकृष्ण विखे पाटील अनुपस्थित होते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी नांदेडमध्ये आयोजित केलेल्या सभेतही विखे पाटील नव्हते. तर राष्ट्रवादी काँग्रेसने काल (24 फेब्रुवारी) परळीला आयोजित केलेल्या मेळाव्यालाही त्यांनी दांडी मारली. 2014 च्या निवडणुकीत राजीव सातव यांच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेली हिंगोलीची जागा काँग्रेसने मागून घेतली. परंतु आज नगरच्या जागेसाठी काँग्रेसकडे उमेदवार असूनही काँग्रेस त्यासाठी आग्रही मागणी का धरत नाही? नगरच्या जागेसाठी विखे पाटील काँग्रेसमध्ये एकटे पडले आहेत का? राधाकृष्ण विखे पाटील यांना पक्षातून मदत मिळत नसल्याची भावना झाली आहे. दक्षिण नगर मतदारसंघात डॉ. सुजय विखे पाटील यांना उमेदवारी मिळावी यासाठी विखे पाटील मागील अनेक महिन्यांपासून प्रयत्न करत आहेत. परंतु विखे पाटील आणि पवार कुटुंबातील वैर यामुळे या जागेवर निर्णय झालेला नाही. दरम्यान, प्रवरानगर इथे काल विखे पाटील यांच्या कार्यकर्त्यांसोबत बैठक झाली. या बैठकीत विखे पाटलांनी कार्यकर्त्यांना सुजय विखे पाटील यांना तिकीट नाही मिळालं तर काय करायचं असा प्रश्न विचारला. त्यावर कार्यकर्त्यांनी 'जय श्री राम' अशा घोषणा दिल्या. तसंच भाजपमध्ये जावं असा सूर बैठकीत उमटला. पण विखे यांनी कार्यकर्त्यांना सबुरीचा सल्ला दिला.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
महाराष्ट्र
मुंबई
राजकारण



















