एक्स्प्लोर
Advertisement
दुसऱ्यांची लेकरं किती दिवस गोंजारणार, राष्ट्रवादीची मुंबईत भाजपविरोधात पोस्टरबाजी
ज्यांना आम्ही नाकारलं त्यांना का गोंजारता, दुसऱ्यांची लेकरं किती दिवस गोंजारणार? स्वतःच्या घरातला पाळणा कधी हलवणार? असा सवाल राष्ट्रवादीने पोस्टरच्या माध्यमातून केला आहे. असे पोस्टर मुंबईतल्या विविध भागात लावण्यात आले आहेत.
मुंबई : दुसऱ्यांची लेकरं किती दिवस गोंजारणार, स्वतःच्या घरातला पाळणा कधी हलवणार अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसकडून मुंबईत पोस्टरबाजी केली आहे. बुरा न मानो होली है म्हणत राष्ट्रवादीने मुंबईतल्या विविध भागात पोस्टर लावले आहेत.
ज्यांना आम्ही नाकारलं त्यांना का गोंजारता, दुसऱ्यांची लेकरं किती दिवस गोंजारणार? स्वतःच्या घरातला पाळणा कधी हलवणार? असा सवाल राष्ट्रवादीने पोस्टरच्या माध्यमातून केला आहे. असे पोस्टर मुंबईतल्या विविध भागात लावण्यात आले आहेत.
लोकसभेच्या निवडणुकांच्या आधी भाजपमध्ये जोरदार इनकमिंग सुरु आहे. त्यात महत्वाचे म्हणजे नुकतेच काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र डॉ. सुजय विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांना भाजपकडून अहमदनगर लोकसभेची उमेदवारी देण्याची शक्यता आहे.
तर राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते विजयसिंह मोहिते पाटील यांचे सुपुत्र रणजितसिंह मोहिते पाटील यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांना भाजपकडून माढा मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. यासोबतच अनेक नेते, पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असल्याने राष्ट्रवादीने मुंबईत ही पोस्टरबाजी केली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
निवडणूक
नागपूर
निवडणूक
Advertisement