एक्स्प्लोर

Ajit Pawar: 'पराभव झाला तरी चालेल, अजितदादांची साथ सोडणार नाही'; बैठकीत आमदारांचा एकमताने निर्धार

Loksabha Election 2024: अजित पवार यांच्या नेतृत्वात मुंबईतील ट्रायडन्ट हॉटेलमध्ये राष्ट्रवादी (अजित पवार गट) च्या आमदारांची बैठक झाली.

Loksabha Election 2024: लोकसभा 2024 च्या निवडणुकीनंतर आज अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नेतृत्वात मुंबईतील ट्रायडन्ट हॉटेलमध्ये राष्ट्रवादी (अजित पवार गट) च्या आमदारांची बैठक झाली. या बैठकीत पराभव झाला तरी चालेल, पण अजित पवार यांची साथ सोडणार नाही, असं आमदारांनी एकमताने निर्धार केल्याची माहिती समोर आली आहे. तसेच कुठलाही आमदार शरद पवार यांच्या पक्षातील आमदारांच्या संपर्कात नसल्याची ग्वाही देखील बैठकीला उपस्थित असणाऱ्यांनी दिल्याचं सांगण्यात येत आहे. 

राष्ट्रवादी फुटल्यानंतर 40 हून अधिक आमदार हे अजित पवारांसोबत गेले होते. असं असलं तरी लोकसभा निकाल लागल्यानंतर शरद पवारांना मोठं यश मिळालं. शरद पवारांनी 10 पैकी 8 खासदार हे निवडून आणले. तर दुसरीकडे अजित पवारांचा एकच खासदार निवडून आला. अजित पवार हे सुनेत्रा पवारांनाही निवडून आणू शकले नाहीत. त्यामुळे त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांमध्ये आता चलबिचल सुरू असल्याची माहिती समोर येत होती. 

तटकरे, मुंडे भाजपसोबत जातील- रोहित पवार

लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार गटाचे काही आमदार शरद पवार आणि भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा रोहित पवार यांनी केला होता. सुनील तटकरे, धनंजय मुंडे भाजपसोबत जातील, असंही रोहित पवार म्हणाले होते. आम्हाला नेता बनण्याची घाई झाली नाही. भाजपने खाली राजकारण नेलं होतं. ते पुन्हा व्यवस्थित करायचं आहे.  जेव्हा अनेक नेते धमक्या देत होतें त्यावेळी आम्ही म्हणत होतो की जनता हे सर्व काही बघत आहे. अनेक लोकांच्या झोपा आता उडाल्या आहेत. महाराष्ट्राला पुन्हा एक नंबरच राज्य करायचे आहे. वंचित आमच्यासोबत आले असते तर नक्की आणखी वेगळं चित्रं पाहिला मिळालं असतं. 

सुनेत्रा पवारांचा पराभव-

बारामतीत (Baramati Lok Sabha Election) नंणद सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule) भावजय सुनेत्रा पवारला (Sunetra Pawar)  जोरदार धक्का दिला आहे.   बारामती राखण्यात सुप्रिया सुळेंना यश मिळाले आहे. तर अजित पवार गटाच्या सुनेत्रा पवारांचा पराभव झाला आहे. सध्या बारामतीत  जल्लोष समोर आला आहे. बारामतीचा पराभव हा अजित पवारांसाठी मोठा धक्का  मानला जात आहे.

राष्ट्रवादीतील फुटीनंतर दादांसोबत कोणते आमदार गेले? 

  • सरोज अहिरे
  • धर्माबाबा आत्राम
  • बाळासाहेब अजबे
  • राजू कारेमोरे
  • आशुतोष काळे
  • माणिकराव कोकाटे
  • मनोहर चांद्रिकेपुरे
  • दीपक चव्हाण
  • संग्राम जगताप
  • मकरंद पाटील
  • नरहरी झिरवाळ
  • सुनील टिंगरे
  • अदिती तटकरे
  • चेतन तुपे
  • दौलत दरोडा
  • राजू नवघरे
  • इंद्रनील नाईक
  • मानसिंग नाईक
  • शेखर निकम
  • अजित पवार
  • नितीन पवार
  • बाबासाहेब पाटील
  • अनिल पाटील
  • राजेश पाटील
  • दिलीप बनकर
  • अण्णा बनसोडे
  • संजय बनसोडे
  • अतुल बेनके
  • दत्तात्रय भरणे
  • छगन भुजबळ
  • यशवंत माने
  • धनंजय मुंडे
  • हसन मुश्रीफ
  • दिलीप मोहिते
  • किरण लहामटे
  • दिलीप वळसे
  • राजेंद्र शिंगणे
  • बबनराव शिंदे
  • सुनील शेळके
  • प्रकाश सोळंके
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis Office : उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या मंत्रालयातील कार्यालयाबाहेर महिलेकडून तोडफोडMaharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 04 PM 27 Sept 2024ABP Majha Headlines : 04 PM: 27 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Shirsat Mumbai : राऊतांवर दलाल नंबर 1 पिक्चर यायला हवा, शिरसाटांचा टोला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Haribhau Bagde: हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Devendra Fadnavis : मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
Sangli News : कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
Pune Gang Rape : पुण्यात धनदांडग्या बापांच्या पोरांच्या विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
पुण्यात विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
Embed widget