Navneet Rana : ईव्हिएमवर शंका असेल तर अमरावतीच्या खासदारांनी राजीनामा द्यावा, रवी राणाही आमदारकीचा राजीनामा देतील, नवनीत राणांचे आव्हान
Navneet Rana on EVM : ईव्हिएमवर शंका असेल तर अमरावतीच्या खासदारांनी राजीनामा द्यावा, असं आव्हान माजी खासदार नवनीत राणा यांनी दिलंय.
Navneet Rana on EVM : महाविकास आघाडीला EVM मशीनवर शंका असेल तर अमरावतीच्या खासदारांनी राजीनामा द्यावा असं आव्हान नवनीत राणांनी केलंय. बडनेरा विधानसभेतून निवडून आलेले रवी राणा हे पण राजीनामा देतील, तिथं पण बॅलेटवर निवडणुका होऊन जाऊ द्या मग कळेल, अशा शब्दात त्यांनी महाविकास आघाडीला आव्हान दिलंय. नवनीत राणांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केलाय. यामध्ये त्यांनी हे भाष्य केलं आहे.
नवनीत राणा म्हणाल्या, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल आल्यानंतर महाविकास आघाडी ईव्हिएमवर आक्षेप घेत आहे. त्यांना माझं आव्हान आहे. अमरावतीच्या खासदारांनी राजीनामा द्यावा. त्याच प्रमाणे बडनेरा विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले रवी राणा देखील राजीनामा देतील. पुन्हा एकदा बॅलेट पेपरवर निवडणूक होऊन जाऊ द्या. मला फार हसू येतं. लोकसभेला यांच्या जागा आल्या. तेव्हा यांना ईव्हिएम मशीन चांगली वाटत होती. मात्र, आता महाराष्ट्रातील लोकांनी महायुतीच्या बाजूने एकतर्फी निकाल दिल्यानंतर आता ईव्हिएम आवडत नाहीये.
महाविकास आघाडीच्या नेत्यांचा ईव्हिएमवर आक्षेप
EVM विरोधात सुप्रीम कोर्टात जाणार आहोत. इंडिया आघाडीची बैठक आणि चर्चा झाली काँग्रेस पक्ष यावर काम करत आले आहेत. अनेक लोकांकडून आम्ही मार्गदर्शन घेणार आहोत. लोकांच्या मनात अस्वस्थता आहे. लोकप्रतिनिधी म्हणून हा आवाज ऐकणं आमचं काम आहे. सोमवारी याबाबतीत निर्णय घेवू, असं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं.
चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले?
शरद पवार यांचा सन्मान करतो. पण त्यांनी या वयात खोटारडेपणा करू नये. पराभव झाला तर स्वीकारायला हवा होता. जनतेला पुन्हा कनफ्युज करण्याचं आणि अपयश लपवण्याच काम ते करत आहेत. विधानसभेत प्रचंड मोठा पराभव जनतेने नाकारलं . म्हणून आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका मुळे हे करत आहेत. जाणीवपूर्वक महारष्ट्र पुन्हा एकदा evm मशीनवर दोष देऊन अपयश लापवण्याच काम करतात. कितीही नौटंकी केली तरी महारष्ट्र याला कंटाळला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकास हवा आहे. संविधानाचा हे अपमान करत आहेत. लोकसभेत 31 खासदारांनी राजीनामे द्यायला हवे आहेत. मग सर्वांनी राजीनामा द्या. आम्ही पण पराभव झालं त्यातून शिकलो आणि पुढे गेलो. या वयात किती खोटेपणा कराल.
इतर महत्त्वाच्या बातम्या