एक्स्प्लोर

स्व. राजीव गांधींबद्दलच्या विधानासाठी मोदींना देश कधीही माफ करणार नाही : राज ठाकरे

पंतप्रधान मोदींनी शनिवारी उत्तर प्रदेशातील एका प्रचारसभेत बोलताना 'भ्रष्टाचारी नंबर वन अशा रुपात राजीव गांधींचा जीवनप्रवास संपला', असे वक्तव्य केले होते.

मुंबई : 'दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधींबद्दलच्या विधानासाठी नरेंद्र मोदींना देश कधीही माफ करणार नाही', अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोदींच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. पंतप्रधान मोदींनी शनिवारी उत्तर प्रदेशातील एका प्रचारसभेत बोलताना 'भ्रष्टाचारी नंबर वन अशा रुपात राजीव गांधींचा जीवनप्रवास संपला', असे वक्तव्य केले होते. त्या विधानावर राज ठाकरेंनी फेसबुक पोस्टद्वारे टीका केली आहे. "मिस्टर क्लीन प्रतिमा बनलेल्या नेत्याचा जीवनप्रवास भ्रष्टाचारी नंबर वन अशा रूपात झाला", अशी टीका मोदींनी केल्यानंतर त्यांच्या या वक्तव्याचा विरोधकांकडून निषेध करण्यात येत आहे. काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून मोदींच्या त्या वक्तव्यावर कडाडून टीका करण्यात येत असताना राज ठाकरे यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. "आकस, सातत्यानं खोटं बोलणं आणि सार्वजनिक जीवनातील कोणत्याही संकेतांचं भान नसणं ह्या तीन गोष्टींसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची कारकीर्द ओळखली जात होती. आता त्यात भर पडली ती विधीशून्यतेची" असं देखील राज ठाकरेंनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये लिहीले आहे. तसेच "स्व. राजीव गांधींबद्दलच्या विधानासाठी मोदी, तुम्हाला देश कधीही माफ करणार नाही", असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी देखील मोदींच्या त्या वक्तव्यावर सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. "मोदीजी, लढाई संपली असून तुम्ही केलेलं कर्म तुमची वाट पाहात आहे. माझ्या वडिलांवर केलेले आरोपही तुम्हाला वाचवू शकणार नाही", असं ट्वीट राहुल गांधींनी केले आहे. तसेच काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी देखील मोदींच्या त्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. 'शहीदांच्या नावावर मतं मागून त्यांच्या हौतात्म्याचा अपमान करणाऱ्या पंतप्रधानांनी काल आणखी एका स्वच्छ व्यक्तीच्या हौतात्म्याचा अपमान केला आहे. राजीव गांधींनी ज्यांच्यासाठी बलिदान दिले ती जनताच तुम्हाला उत्तर देईल. हा देश फसवणुकीला कधीच माफ करत नाही', असं ट्वीट प्रियंका गांधींनी केले आहे. व्हिडीओ :
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mirzapur Train Accident: कार्तिक स्नानासाठी गंगा घाटावर चालल्या, ट्रॅक ओलांडताना रेल्वे आली; सहा महिलांच्या जागेवर चिंधड्या, 50 मीटर लांब मृतदेहांचे तुकडे विखुरले
कार्तिक स्नानासाठी गंगा घाटावर चालल्या, ट्रॅक ओलांडताना रेल्वे आली; सहा महिलांच्या जागेवर चिंधड्या, 50 मीटर लांब मृतदेहांचे तुकडे विखुरले
Pune Crime: कोथरुडच्या महात्मा सोसायटीतील भोंदूबाबाचा बंगला ओस पडला, सगळे कर्मचारीही गायब,  वेदिका पंढरपूरकर फरार
कोथरुडच्या महात्मा सोसायटीतील भोंदू मांत्रिकाचा बंगला ओस पडला, सगळे कर्मचारीही गायब, वेदिका पंढरपूरकर फरार
Solapur Politics: नगरपालिका निवडणुकीचं बिगुल वाजलं, सोलापूरात गोरे Vs मोहिते पाटील यांच्यात कडवी लढत, पालकमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
नगरपालिका निवडणुकीचं बिगुल वाजलं, सोलापूरात गोरे Vs मोहिते पाटील यांच्यात कडवी लढत, पालकमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
Rahul Gandhi: मतचोरीवरून निवडणूक आयोग वादाच्या भोवऱ्यात, बहुचर्चित अन् बहुप्रतिक्षित तब्बल 66 दिवसांनी राहुल गांधींचा हायड्रोजन बाॅम्ब कोणावर फुटणार?
मतचोरीवरून निवडणूक आयोग वादाच्या भोवऱ्यात, बहुचर्चित अन् बहुप्रतिक्षित तब्बल 66 दिवसांनी राहुल गांधींचा हायड्रोजन बाॅम्ब कोणावर फुटणार?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Monorail Accident: वडाळा डेपोत मोनोरेलचा अपघात, ट्रायल रनवेळी घसरली
ECI vs Opposition: निवडणूक आयोगाने भेट नाकारली, मनसे-मविआ नेत्यांचा दिल्लीत ठिय्या
Pre-Poll Bonanza: निवडणुका जाहीर होण्यापूर्वी Fadnavis सरकारचा घोषणांचा धडाका, काही तासांत २२१ GR
Solapur Floods: केंद्रीय पथकाचा 'रात्रीस खेळ चाले', Mohol मध्ये अंधारात पाहणी केल्याने टीकेची झोड
Poster War: 'दगाबाजरे पॅकेजचं काय झालं?', Thackeray गटाचा CM Shinde, DCM Pawar यांना थेट सवाल

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mirzapur Train Accident: कार्तिक स्नानासाठी गंगा घाटावर चालल्या, ट्रॅक ओलांडताना रेल्वे आली; सहा महिलांच्या जागेवर चिंधड्या, 50 मीटर लांब मृतदेहांचे तुकडे विखुरले
कार्तिक स्नानासाठी गंगा घाटावर चालल्या, ट्रॅक ओलांडताना रेल्वे आली; सहा महिलांच्या जागेवर चिंधड्या, 50 मीटर लांब मृतदेहांचे तुकडे विखुरले
Pune Crime: कोथरुडच्या महात्मा सोसायटीतील भोंदूबाबाचा बंगला ओस पडला, सगळे कर्मचारीही गायब,  वेदिका पंढरपूरकर फरार
कोथरुडच्या महात्मा सोसायटीतील भोंदू मांत्रिकाचा बंगला ओस पडला, सगळे कर्मचारीही गायब, वेदिका पंढरपूरकर फरार
Solapur Politics: नगरपालिका निवडणुकीचं बिगुल वाजलं, सोलापूरात गोरे Vs मोहिते पाटील यांच्यात कडवी लढत, पालकमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
नगरपालिका निवडणुकीचं बिगुल वाजलं, सोलापूरात गोरे Vs मोहिते पाटील यांच्यात कडवी लढत, पालकमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
Rahul Gandhi: मतचोरीवरून निवडणूक आयोग वादाच्या भोवऱ्यात, बहुचर्चित अन् बहुप्रतिक्षित तब्बल 66 दिवसांनी राहुल गांधींचा हायड्रोजन बाॅम्ब कोणावर फुटणार?
मतचोरीवरून निवडणूक आयोग वादाच्या भोवऱ्यात, बहुचर्चित अन् बहुप्रतिक्षित तब्बल 66 दिवसांनी राहुल गांधींचा हायड्रोजन बाॅम्ब कोणावर फुटणार?
Uddhav Thackeray In Marathwada: शेतकऱ्यांनो शेतकरी म्हणून एकवट व्हा, जोपर्यंत तुम्ही एकवटत नाही, तोपर्यंत कोणी न्याय देणार नाही; उद्धव ठाकरेंची बांधावरून आर्त साद
शेतकऱ्यांनो शेतकरी म्हणून एकवट व्हा, जोपर्यंत तुम्ही एकवटत नाही, तोपर्यंत कोणी न्याय देणार नाही; उद्धव ठाकरेंची बांधावरून आर्त साद
Bollywood Actor Extramarital Affair: दोन मुलांचा बाप, 20 वर्षांचा सुखी संसार; तरीसुद्धा बॉलिवूड दिग्गजाचे तरुण अभिनेत्रींसोबत शारीरिक संबंध, पत्नीसमोरच भांडाफोड
दोन मुलांचा बाप, 20 वर्षांचा सुखी संसार; तरीसुद्धा बॉलिवूड दिग्गजाचे तरुण अभिनेत्रींसोबत शारीरिक संबंध, पत्नीसमोरच भांडाफोड
Pune Leopard Attack: ड्रोन भिरभिरत गेला अन् रात्रीच्या अंधारात बिबट्याचा माग काढला, बेशुद्ध करायला डार्ट लागताच नरभक्षक चवताळला, नरभक्षक बिबट्या 'असा' संपला
ड्रोन भिरभिरत गेला अन् रात्रीच्या अंधारात बिबट्याचा माग काढला, बेशुद्ध करायला डार्ट लागताच नरभक्षक चवताळला, नरभक्षक बिबट्या 'असा' संपला
नातेवाईकांनी दोघांना अग्नी दिला,  दुसऱ्या दिवशी अस्थींची चोरी, नागपुरात खळबळ, नेमका प्रकार काय?
नातेवाईकांनी दोघांना अग्नी दिला, दुसऱ्या दिवशी अस्थींची चोरी, नागपुरात खळबळ, नेमका प्रकार काय?
Embed widget