एक्स्प्लोर

Nashik Lok Sabha Result 2024 : नाशिकमधून राजाभाऊ वाजेंचा दणदणीत विजय, हेमंत गोडसेंची हॅटट्रिक हुकली

Nashik Lok Sabha Election Result 2024 : नाशिक लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी दणदणीत विजय मिळविला आहे. त्यांनी महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांचा दारूण पराभव केला आहे.

नाशिक : राज्यभरात लक्ष लागलेल्या नाशिक लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी दणदणीत विजय मिळविला आहे. त्यांनी महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांचा दारूण पराभव केला आहे. वाजे यांनी पहिल्या फेरीपासून मिळविलेली आघाडी कायम ठेवली होती. त्यानंतर वाजे यांनी ही आघाडी कायम ठेवत दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी झाले. 

मागील महिन्यात (दि.२० मे) रोजी नाशिक आणि दिंडोरी लोकसभेसाठी (Nashik and Dindori Loksabha) मतदान झाले होते. त्यानंतर आज मंगळवार (दि.४ जून) रोजी सकाळी आठ वाजेपासून शहरातील अंबड परिसरातील वेअर हाउसमध्ये या दोन्ही मतदारसंघांसाठी मतमोजणी सुरु होती. यानंतर आता नाशिक लोकसभेचा निकाल हाती आला आहे. राजाभाऊ वाजे यांचा विजय निश्चित होताच सिन्नर, इगतपुरी, आणि नाशिक लोकसभा मतदारसंघातील विविध भागांत एकच जल्लोष करण्यात आला. 

महाराष्ट्रात यंदाच्या लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Elections 2024) नाशिक मतदारसंघ चांगलाच गाजल्याचे दिसून आले. महायुतीकडून (Mahayuti) अगदी शेवटच्या क्षणी शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) शिवसेना ठाकरे गटाने सुरुवातीलाच राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje) यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे राजाभाऊ वाजे यांना प्रचारासाठी तब्बल दोन महिन्यांचा कालावधी मिळाला. तर अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या शांतीगिरी महाराजांनी (Shantigiri Maharaj) माघार घेण्यासाठी महायुतीकडून जोरदार प्रयत्न करण्यात आले. मात्र शांतीगिरी महाराजांनी नाशिक लोकसभेची निवडणूक लढवलीच.

नाशिक लोकसभा मतदारसंघ महायुतीच्या उमेदवाराची लवकर घोषणा न झाल्याने चांगलाच चर्चेत आला. या मतदारसंघावर महायुतीतून राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भाजपकडून दावा ठोकण्यात आला होता. त्यामुळे नाशिकच्या जागेचा तिढा अनेक दिवस कायम होता.  यावेळी महायुतीचा उमेदवार जाहीर करताना फार उशीर झाला. त्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांना प्रचारासाठी जास्त दिवसांचा कालावधी मिळाला. नाशिक लोकसभा मतदारसंघात सलग दोन टर्मपासून हेमंत गोडसे हे खासदार म्हणून निवडून आले आहेत. यामध्ये पहिल्या वेळेस मराठा विरूद्ध भुजबळ या वादाचा फायदा गोडसे यांना झाला होता. तर दुसऱ्या वेळेस मोदी लाटेत हेमंत गोडसेंना यश मिळाले. यंदाच्या निवडणुकीत हेमंत गोडसेंना प्रचारासाठी कमी कालावधी मिळाला असला तरी ते नाशिकमध्ये परिचित चेहरा आहेत. तर दुसरीकडे राजाभाऊ वाजे यांना प्रचारासाठी अधिक कालावधी मिळाल्याने त्यांनी तळागाळात जाऊन प्रचार केला आहे.  तिसरीकडे अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराज यांनी प्रचाराचे नवनवीन फंडे शोधात मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. आता नाशिक लोकसभेवर (Nashik Lok Sabha Constituency) कोण गुलाल उधळणार याचे चित्र येत्या काही तासात स्पष्ट होणार आहे. 

नाशिक लोकसभा मतदारसंघ 2024 (Nashik Lok Sabha Election Result 2024)

उमेदवाराचे नाव पक्ष  विजयी उमेदवार
हेमंत गोडसे शिवसेना शिंदे गट  
राजाभाऊ वाजे शिवसेना ठाकरे गट  विजयी
शांतीगिरी महाराज  अपक्ष  

नाशिक लोकसभा मतदारसंघातील मतदानाची विधानसभानिहाय टक्केवारी

नाशिक लोकसभा मतदारसंघात 2019 च्या लोकसभा निवडणुकीत 59.43 टक्के मतदान झाले होते. परंतु, यंदा नाशिकमध्ये मतदानाचा टक्का वाढला आहे. निवडणूक आयोगाच्या अंतिम आकडेवारीनुसार नाशिकमध्ये 60.75 टक्के मतदान झाले आहे. नाशिकच्या सर्व सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये चांगले मतदान झाले. मतदानात झालेली वाढ ही घट कोणाच्या पथ्थ्यावर पडणार, हे पाहावे लागेल.

सिन्नर - 69.50 टक्के

नाशिक पूर्व - 55.38 टक्के

नाशिक मध्य - 57.15 टक्के

नाशिक पश्चिम - 54.35 टक्के

देवळाली - 62.05 टक्के

इगतपुरी - 72.24 टक्के

नाशिक लोकसभा मदरसंघातील आमदार संख्या – 6

सिन्नर – माणिकराव कोकाटे (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट)

नाशिक पूर्व – राहुल ढिकले (भाजप)

नाशिक मध्य  – देवयानी फरांदे (भाजप)

नाशिक पश्चिम  – सीमा हिरे (भाजप)

देवळाली – सरोज अहिरे (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट)

इगतपुरी  – हिरामण खोसकर (काँग्रेस)

2019 सालचा नाशिक लोकसभेचा निकाल

भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार हेमंत तुकाराम गोडसे यांनी 2019 मध्ये सलग दुसर्‍यांदा विजयी होऊन नाशकात पुन्हा निवडून न येण्याची मालिका खंडित केली होती. त्यांनी राष्ट्रवादीचे माजी खासदार समीर भुजबळ यांचा पराभव केला होता. तर माणिकराव कोकाटे हे अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात होते. वंचित बहुजन आघाडीकडून पवार यांनी निवडणूक लढवली होती. 

हेमंत गोडसे - 5, 63, 599 मते (50.27 टक्के)

समीर भुजबळ - 2,71, 395 मते (24.21 टक्के) 

माणिकराव कोकाटे - 1,34,527 मते (12 टक्के)

पवन पवार - 1,09,981 मते (9.81 टक्के)

ग्रामीण भागातील मतदानाची टक्केवारी निर्णायक ठरणार? 

महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्यासाठी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, खा. संजय राऊत, सुषमा अंधारे यांनी प्रचार सभा घेतल्या. तर महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, विधान परिषदेच्या उपाध्यक्ष नीलम गोऱ्हे, रिपाइंचे नेते रामदास आठवले आदींच्या सभा झाल्या. मविआकडून बेरोजगारी, महागाई, कृषिमालाला कवडीमोल दर, नवीन उद्याोग आणण्याकडे दुर्लक्ष हे मुद्दे मांडले गेले. तर महायुतीकडून राम मंदिर, अनुच्छेद 370, नाशिक-पुणे रेल्वेमार्गासाठीचे प्रयत्न हे मुद्दे प्रचारात मांडले गेले होते. तसेच महायुतीतील उमेदवारीचा घोळ आणि प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आठवडाभरात चार दौरे यामुळे चर्चेत राहिलेल्या नाशिक लोकसभा मतदारसंघात शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात मतदानाची टक्केवारी अधिक राहिली आहे. तीच मतदानाची टक्केवारी निर्णायक ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
Embed widget