Nagpur Nagarparishad Election Result 2025: मुख्यमंत्री फडणवीसांच्या होम पिचवर भाजपची विजयी घौडदौड; काँग्रेस खासदाराच्या प्रभागातच धोबीपछाड, नागपुरातील चुरशीच्या लढाईत कुणाची बाजी?
Nagpur Nagarparishad Result 2025 : उपराजधानी नागपूर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या होम पिचवर भाजपनं (BJP) नगरपरिषद, नगरपंचायतींसाठीची निवडणुकीत दमदार कामगिरी केलीय.

Nagpur Nagarparishad-Nagarpanchayat Election Result 2025 : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या उपराजधानी नागपूर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या होम पिचवर भाजपनं नगरपरिषद, नगरपंचायतींसाठीची (Nagarparishad-Nagarpanchayat Election Result 2025) निवडणुकीत दमदार कामगिरी केलीय. यात 27 पैकी 21 नगरपरिषद आणि नगरपंचायतीमध्ये भाजपने दणदणीत विजय मिळवला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेसह भाजपसाठी प्रतिष्ठेच्या ठरलेल्या नागपूर जिल्ह्यातील निवडणुकीत भाजपने विजयी घोडदौड कायम ठेवली आहे. सध्या ठीकठिकाणी मतमोजणी केंद्रावर भाजप कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. विविध मतमोजणी केंद्रातून भाजपचे विजयी उमेदवार आणि त्यांचे समर्थक जल्लोष करत बाहेर पडत आहे. एकूणच या विजयाने आगामी निवडणुकांसाठी भाजपचा विश्वास दुणावला आहे.
पुढे आलेल्या पहिल्या कलानुसार 27 नगरपरिषदेत भाजपने नागपुरात 21 जागांवर, तर शिंदेंच्या शिवसेनेनं 2 जागी विजय मिळवला आहे. तर काँग्रेस अवघ्या 3 जागांवर आघाडीवर आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी (अजित पवार गट), राष्ट्रवादी (शप गट) आणि ठाकरेंच्या शिवसेनेला अद्याप खातेही उघडता आलेलं नाहीये. दुसरीकडे शेकापानं एका जागी विजय मिळवला आहे.
नागपूर जिल्हा एकुण नगरपरिषद / नगर पंचायत- 27
भाजप- 21
शिवसेना- 2
राष्ट्रवादी (अजित गट)- 0
ठाकरे- 0
काँग्रेस- 3 ( दोन काँग्रेस पक्ष आणि एक काँग्रेस समर्थित अपक्ष)
राष्ट्रवादी (शप गट)- 0
इतर- 1 (शेकाप)
Nagarparishad Election Result 2025 : नगरपरिषद निवडणूक निकाल
भाजप 127
शिवसेना 47
राष्ट्रवादी 34
कांग्रेस 27
उबाठा 07
राष्ट्रवादी शप06
स्थानिक आघाडी 39
भिवापूर नगरपंचायत
नगराध्यक्षपदाच्या विजयी उमेदवार
कु. सुषमा शंकरराव श्रीरामे (भाजप)
मिळालेली मते 3,132
भिवापूर नगरपंचायत प्रभाग निहाय विजयी नगरसेवक
1) सौ. कांचन बालपांडे (भाजप)
2) नाझीम बेग (राष्ट्रवादी अजित पवार)
3) पिंटू श्रीरामे (भाजप)
4) दिनेश रामटेके (भाजप)
5) सौ. जया नंदनवार (भाजप)
6) प्रकाश पंजलवार (अपक्ष)
7) सौ. वैशाली पेंदाम (भाजप)
8) सौ. किरण नागरिकर (काँग्रेस)
9) विवेक ठाकरे (भाजप)
10) सौ. शुद्धरेखा तभाने (भाजप)
11) सौ. धनश्री धनविजय (शिवसेना शिंदे)
12) सौ. रीना खापरीकर (अपक्ष)
13) सौ. मिथिला तिडके (भाजप)
14) कैलास कोमलीवार (शिवसेना उबाठा)
15) नंदू पाचभाई (काँग्रेस)
16) सौ. शोभा जांभुळे (काँग्रेस)
17) साहिल कुमार टेंभुर्णे (अपक्ष)
नरखेड नगर पंचायत
नरखेड नगर पंचायत मध्ये भाजपचे मनोज कोरडे 1577 मतांनी विजयी
कळमेश्वर नगर पंचायत
कळमेश्वर ब्राह्मणी नगरपरिषद नगराध्यक्षपदी भाजपचे अविनाश माकोडे विजयी.
नगरसेवक पदी काँग्रेस 6 तर भाजपा 15
कळमेश्वर मध्ये भाजप नगराध्यक्ष सह बहुमताने विजयी...
काँग्रेस नेते सुनील केदार यांना मोठा झटका
पारशीवणी नगर पंचायत निवडणूक निकाल
नगराध्यक्ष सुनीता प्रकाश डोमकी विजयी 🏆
प्रभाग १ - योगिनी बावनकुळे, भाजप
प्रभाव २ - विक्रम बडवाईक - कपबशी
प्रभाग ३ - टिकाराम परतेती,सेना
प्रभाग ४ - दिपक शिवरकर, सेना
प्रभाग ५ - आशिष भड, काँगेस
प्रभाग ६ - सतीश धुरई , अपक्ष
प्रभाग ७ - सौरभ वाळके , सेना
प्रभाग ८ - रोशन पिंपळामुळे, सेना
प्रभाग ९ - अर्चना बडवाईक,,सेना
प्रभाग १० - देवानंद वाकोडे, अपक्ष
प्रभाग ११ - तुषार पाटिल, सेना
प्रभाग १२ - प्रभा कापसे , काँगेस
प्रभाग १३ - शुभांगी तरार , काँगेस
प्रभाग १४ - सलीम बाघाडे, काँगेस
प्रभाग १५ - बबिता बर्वे, काँगेस
प्रभाग १६ - प्रीती खुबाळकर
प्रभाग १७ - अर्चना तरार,सेना
रामटेक नगर परिषद निवडणूक निकाल
नगराध्यक्ष बिकेंद्र महाजन विजयी




















