एक्स्प्लोर

धक्कादायक! प्रचार सुरु असतानाच मुंबईत शिवसेना उमेदवारावर हल्ला, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ  

मुंबईत शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारावर चाकू हल्ला झाल्याची घटना घडली आहे. वांद्रे परिसरात प्रचार सुरु असतानाच शिवसेना उमेदवारावर चाकू हल्ला झाला आहे.

Mumbai Crime News : महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्वच राजकीय नेत्यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. दरम्यान, या प्रचाराच्या दरम्यान काही गुन्हेगारी स्वरुपाच्या धक्कादायक घटना घडत असल्याचे समोर येत आहे. नेते कार्यकर्त्यांवर हल्ले होत आहेत. अशातच मुंबईत शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारावर चाकू हल्ला झाल्याची घटना घडली आहे. वांद्रे परिसरात प्रचार सुरु असतानाच शिवसेना उमेदवारावर चाकू हल्ला झाला आहे. मुंबईतील प्रभाग क्रमांक 92 मधील शिवसेनेचे अधिकृत उमेदवार हाजी सालिन कुरेशी यांच्यावर चाकू हल्ला झाला आहे.  

बांद्रा येथील ज्ञानेश्वर नगर इथे हा हल्ला झाला

मिळालेल्या माहितीनुसार, बांद्रा येथील ज्ञानेश्वर नगर इथे हा हल्ला झाला आहे. प्रचार सुरु असताना अज्ञात व्यक्तींनी हा हल्ला केला आहे. प्रभाग क्रमांक 92 मधील शिवसेनेचे अधिकृत उमेदवार हाजी सालिन कुरेशी यांच्या पोटात चाकू मारल्याची प्राथमिक माहीती मिळाली आहे. या घटनेनंतर तात्काळ हाजी सालिम कुरेशी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर महात्मा गांधी रुग्णालयात ऊपचार सुरु आहे. 

वांद्रे परिसरामध्ये तणावाच वातावरण

बांद्रा परिसरात प्रचार सुरु असतानाच शिवसेना उमेदवाराच्या पोटात चाकू खुपसला.आहे. मुंबईच्या बांद्रा पूर्वेत ही धक्कादायक घटना घडली आहे. मुंबईतील प्रभाग क्रमांक 92 मधील शिवसेनेचे अधिकृत उमेदवार हाजी सालिन कुरेशी यांच्यावर चाकू हल्ला झाला आहे. जखमी उमेदवारावर महात्मा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळं वांद्रे परिसरामध्ये भीतीच्या आणि तणावाच्या वातावरण निर्माण झाला आहे. घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत हल्ला करणारा व्यक्ती कोण होता. हल्ला करण्याच्या मागे हेतू काय होता. यासंदर्भात पोलीस अधिक तपास करत आहेत. 

राज्यात महानगरपालिका निवडणुकांच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. सर्वच पक्षाचे दिग्गज राजकीय नेते प्रचारात उतरल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, या प्रतारादरम्यान, राजकीय नेते ऐकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. अशातच काही ठिकाणी गुन्हेगारीच्या घटना देखील घडताना दिसत आहेत. काही भागात हल्ले होत आहेत. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा राडा झाला असून माजी खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यानंतर आज मुंबईत देखील देखील शिवसेनेच्या उमेदवारावर हल्ला करण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या:

Kalim Qureshi : इम्तियाज जलील यांच्यावर हल्ला करणारा कलीम कुरेशी कोण? एकाच वेळी दोन पक्षातून दोन प्रभागातून उमेदवारी

महत्त्वाच्या बातम्या

Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 

व्हिडीओ

Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
Shiv Sena Name & Symbol Dispute: 'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
Joe Root: नवा गडी, नवं राज्य!
नवा गडी, नवं राज्य! "तुम्हाला बिअर प्यायची असेल तर प्या, पण..." कॅप्टन होताच जो रूट इंग्लंड संघाचा नाइट कर्फ्यू उठवत काय काय म्हणाला?
Embed widget