एक्स्प्लोर

Jalgaon News : मुक्ताईनगरच्या अपक्ष उमेदवारावरील गोळीबार प्रकरणी मोठी अपडेट, पोलिसांनी 24 तासांमध्ये लावला छडा, संशयितांना बेड्या

Muktainagar Assembly Election : मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार विनोद सोनावणे यांच्या वाहनावर काल गोळीबार झाला होता.

जळगाव : मुक्ताई नगर मतदार संघातील अपक्ष उमेदवार विनोद सोनावणे यांनी  त्यांच्या  वाहनावर  अज्ञातांनी गोळीबार केल्याचा दावा  केल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली  होती. या घटनेनंतर विनोद सोनावणे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. हा गोळीबार करणाऱ्या तीन संशयित आरोपींना अटक करण्यात आली होती.  

जळगाव जिल्ह्यातील मुक्ताई नगर मतदार संघात महायुती कडून आमदार चंद्रकांत पाटील हे उमेदवार आहेत.  महाविकास आघाडी कडून रोहिणी खडसे या उमेदवार आहेत.त्याच बरोबर विनोद सोनावणे हे अपक्ष उमेदवारी करत आहेत. काल त्यांच्या वाहनावर अज्ञातांनी गोळीबार केल्यानं खळबळ उडाली होती. सोनावणे यांच्या कारवर गोळ्या लागल्यानं अनर्थ टळला होता. पोलिसांनी या घटनेचं गांभीर्य पाहता तपासाची चक्र वेगानं फिरवली आणि तीन संशयित आरोपींना अटक केली आहे. 

विनोद सोनवणे हे बोदवड तालुक्यात राजूर गावात आपल्या वाहनातून प्रचार करत असताना ,दुचाकी वरून आलेल्या तिघांनी आपल्या वाहनावर गोळीबार केल्याचा दावा केला होता.  हा घातपाताचा करण्याचा प्रयत्न असल्याचं अपक्ष उमेदवार विनोद सोनावणे यांनी म्हटलं आहे. या घटनेनंतर विनोद सोनावणे यांनी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.   

मुक्ताईनगर मतदारसंघात अपक्ष उमेदवारावर गोळीबार केल्या प्रकरणी पोलिसांनी तीन संशयित आरोपींना अटक करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताई नगर  मतदार संघात अपक्ष उमेदवार विनोद सोनावणे यांच्या वाहनावर तीन अज्ञात  व्यक्तींनी गोळीबार केल्याची घटना घडली होती. या घटनेचे गांभीर्य पाहता पोलिसांनी तातडीने तपास चक्र फिरवत ,तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे. खंडणी मिळविण्याच्या उद्देशाने भीती घालण्यासाठी हा गोळीबार केला गेला असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे, अशी माहिती जळगावचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिली आहे. 

मुक्ताईनगरमध्ये रोहिणी खडसे आणि चंद्रकांत पाटील यांच्यात सामना

2024 च्या विधानसभा निवडणुकीत देखील रोहिणी खडसे आणि चंद्रकांत पाटील यांच्यात लढत होत आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत रोहिणी खडसे यांना निसटता पराभव स्वीकारावा लागला होता. त्यावेळी रोहिणी खडसे भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवत होत्या. तर, चंद्रकांत पाटील अपक्ष निवडणूक लढवत होते. चंद्रकांत पाटील यांनी निवडणूक जिंकल्यानंतर शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला होता. शिवसेना पक्ष फुटल्यानंतर त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला होता. आता ते शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत तर रोहिणी खडसे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून लढत आहेत.  

इतर बातम्या :

सदाभाऊंची शरद पवारांवर जहरी टीका, जितेंद्र आव्हाड चांगलेच संतापले; थेट वडिलांचाच दिला दाखला

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

INDIA Alliance Controversy : भाजपला 240 वर आणणाऱ्या महाविकास अन् देशात इंडिया आघाडीला अखेरची घरघर? तीन कारणे अन् तीन नेत्यांच्या थेट वक्तव्यांनी भूवया उंचावल्या
भाजपला 240 वर आणणाऱ्या महाविकास अन् देशात इंडिया आघाडीला अखेरची घरघर? तीन कारणे अन् तीन नेत्यांच्या थेट वक्तव्यांनी भूवया उंचावल्या
Nashik Accident : नाशिकच्या भीषण अपघातात पाच जणांचा दुर्दैवी अंत, मंत्री गिरीश महाजनांनी घेतला मोठा निर्णय
नाशिकच्या भीषण अपघातात पाच जणांचा दुर्दैवी अंत, मंत्री गिरीश महाजनांनी घेतला मोठा निर्णय
IPO Update : शेअर बाजार सुरु होताच सेन्सेक्स कोसळला पण स्टँडर्ड ग्लासचा आयपीओ लिस्ट होताच गुंतवणूकदारांची तगडी कमाई
शेअर बाजार सुरु होताच सेन्सेक्स कोसळला पण स्टँडर्ड ग्लासचा आयपीओ लिस्ट होताच गुंतवणूकदारांची कमाई
Santosh Deshmukh Case: संतोष देशमुखांना महिनाभरापूर्वी वाल्मिक कराडची धमकी; अश्विनी देशमुखांचा सीआयडीला महत्त्वाचा जबाब
संतोष देशमुख हत्याप्रकरणात सर्वात मोठी अपडेट, सरपंचांच्या पत्नीचा CIDला महत्त्वाचा जबाब
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

100 Headlines : 100 हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 11AM TOP Headlines 11 AM 13 January 2025 सकाळी ११ च्या हेडलाईन्सSanjay Raut Mumbai : मुख्य आरोपी मोकाट, ..त्यांचे बॉस मंत्रिमंडळात आहेत; बीड प्रकरणावर राऊत आक्रमकABP Majha Marathi News Headlines 10AMHeadlines 10AM 13 January 2025 सकाळी 10 च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
INDIA Alliance Controversy : भाजपला 240 वर आणणाऱ्या महाविकास अन् देशात इंडिया आघाडीला अखेरची घरघर? तीन कारणे अन् तीन नेत्यांच्या थेट वक्तव्यांनी भूवया उंचावल्या
भाजपला 240 वर आणणाऱ्या महाविकास अन् देशात इंडिया आघाडीला अखेरची घरघर? तीन कारणे अन् तीन नेत्यांच्या थेट वक्तव्यांनी भूवया उंचावल्या
Nashik Accident : नाशिकच्या भीषण अपघातात पाच जणांचा दुर्दैवी अंत, मंत्री गिरीश महाजनांनी घेतला मोठा निर्णय
नाशिकच्या भीषण अपघातात पाच जणांचा दुर्दैवी अंत, मंत्री गिरीश महाजनांनी घेतला मोठा निर्णय
IPO Update : शेअर बाजार सुरु होताच सेन्सेक्स कोसळला पण स्टँडर्ड ग्लासचा आयपीओ लिस्ट होताच गुंतवणूकदारांची तगडी कमाई
शेअर बाजार सुरु होताच सेन्सेक्स कोसळला पण स्टँडर्ड ग्लासचा आयपीओ लिस्ट होताच गुंतवणूकदारांची कमाई
Santosh Deshmukh Case: संतोष देशमुखांना महिनाभरापूर्वी वाल्मिक कराडची धमकी; अश्विनी देशमुखांचा सीआयडीला महत्त्वाचा जबाब
संतोष देशमुख हत्याप्रकरणात सर्वात मोठी अपडेट, सरपंचांच्या पत्नीचा CIDला महत्त्वाचा जबाब
Bhiwandi News: मूळव्याधाचा त्रास असह्य झाला, रोजच्या वेदनांनी जीव नकोसा, भिवंडीतील रिक्षाचालकाने आयुष्य संपवलं
मूळव्याधाचा त्रास असह्य झाला, रोजच्या वेदनांनी जीव नकोसा, भिवंडीतील रिक्षाचालकाने आयुष्य संपवलं
Girish Mahajan : नाशिकच्या भीषण अपघातातील मृतांचा आकडा 5 वर, 3 गंभीर; मंत्री गिरीश महाजनांकडून मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत
नाशिकच्या भीषण अपघातातील मृतांचा आकडा 5 वर; मंत्री गिरीश महाजनांकडून मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची शासकीय मदत
Nashik Crime : नाशिकमधील पोलीस अंमलदारास 'भाईगिरी' भोवली, पोलीस अधीक्षकांची मोठी कारवाई
नाशिकमधील पोलीस अंमलदारास 'भाईगिरी' भोवली, पोलीस अधीक्षकांची मोठी कारवाई
Yograj Singh : तेव्हा युवराजचा मृत्यू झाला असता, तरी त्याचा अभिमान वाटला असता, कपिल देवला गोळी घालायला गेलो होतो; 'सिक्सर किंग'च्या बापाची सनसनाटी मुलाखत!
तेव्हा युवराजचा मृत्यू झाला असता, तरी त्याचा अभिमान वाटला असता, कपिल देवला गोळी घालायला गेलो होतो; 'सिक्सर किंग'च्या बापाची सनसनाटी मुलाखत!
Embed widget