एक्स्प्लोर

Srinivas Vanga: धाय मोकलून रडले, संध्याकाळी पिशवी घेऊन एकटेच घराबाहेर पडले; 12 तासांपासून नॉट रिचेबल असणाऱ्या श्रीनिवास वनगांच्या कुटुंबीयांची चिंता वाढली

Palghar Vidhan Sabha Srinivas Vanga: श्रीनिवास वनगा यांना पालघर विधानसभेची उमेदवारी नाकारण्यात आल्याने प्रचंड मोठा मानसिक धक्का बसला आहे. मनात आत्महत्येचे विचार, वनगांचे कुटुंबीय चिंतेत

पालघर: राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना शिंदे गटाचे पालघर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार श्रीनिवास वनगा यांच्या नाराजीची सध्या प्रचंड चर्चा रंगली आहे. शिंदे गटाकडून विधानसभेची उमेदवारी न मिळाल्यामुळे श्रीनिवास वनगा प्रचंड दुखावले गेले होते. प्रसारमध्यमांसमोर आपल्या भावना व्यक्त करताना त्यांना रडू कोसळले होते. उमेदवारी न मिळाल्यामुळे श्रीनिवास वनगा (Srinivas Vanaga) हे प्रचंड मानसिक तणावाखाली होते. त्यांच्या मनात आत्महत्येचे विचार घोळत होते, अशी माहिती त्यांच्या पत्नीने दिली होती. सोमवारी संध्याकाळी ही सगळी माहिती समोर आली होती. तेव्हापासून श्रीनिवास वनगा हे बेपत्ता आहेत.

श्रीनिवास वनगा यांच्या पत्नीने दिलेल्या माहितीनुसार, काल संध्याकाळी सात ते साडेसातच्या सुमारास श्रीनिवास वनगा एक पिशवी घेऊन घरातून बाहेर पडले. त्यांनी घरातून बाहेर पडताना आपण कुठे जातोय, हे कोणालाही सांगितले नाही. त्यानंतर आता 12 तास उलटून गेल्यानंतर श्रीनिवास वनगा नेमके कुठे आहेत, याचा पत्ता कोणालाही नाही. त्यांचे दोन्ही मोबाईल फोनही नॉट रिचेबल लागत आहेत. त्यामुळे त्यांच्याशी कोणताही संपर्क झालेला नाही. परिणामी श्रीनिवास वनगा यांच्या कुटुंबीयांची चिंता वाढली आहे.

दरम्यान, सध्या श्रीनिवास वनगा यांच्या घराबाहेर मोठ्याप्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. काल संध्याकाळपासून त्यांच्या घराबाहेर कार्यकर्त्यांची रीघ लागली आहे. काल माकपचे आमदार विनोद निकोले त्यांच्या घरी येऊन गेले. तसेच ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख पंकज देशमुखही वनगा यांच्या घरी गेले होते.  यानंतर श्रीनिवास वनगा यांच्या पत्नीला शंभुराज देसाई आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोन येऊन गेला. यावेळी फोनवर बोलताना एकनाथ शिंदे यांनी श्रीनिवास वनगा यांना विधानपरिषदेवर पाठवू, असे आश्वासन त्यांच्या पत्नीला दिल्याचे समजते.

पालघरमधून राजेंद्र गावितांना उमेदवारी

पालघर विधानसभेसाठी श्रीनिवास वनगा यांच्याऐवजी शिंदे गटाने माजी खासदार राजेंद्र गावित यांना संधी दिली होती. राजेंद्र गावित यांना उमेदवारी देण्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वनगा यांच्याशी चर्चा केली होती. मात्र, सोमवारी संध्याकाळी शिंदे गटाची उमेदवारी यादी जाहीर झाल्यानंतर त्यामध्ये नाव नसल्याने श्रीनिवास वनगा यांच्या संयमाचा बांध फुटला होता. गेल्या दोन दिवसांपासून ते स्थानिक नेत्यांशी संपर्क साधताना रडत आपली फसवणूक झाल्याचे सांगत होते. 'उद्धव ठाकरे हे देवमाणूस होते. मी घातकी माणसासोबत गेलो आणि माझा घात झाला', असे श्रीनिवास वनगा यांनी म्हटले होते.

आणखी वाचा

श्रीनिवास वनगांचे रडतानाचे व्हिडीओ पाहिले, उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना तातडीनं वनगांच्या घरी पाठवलं अन् ...

एबीपी माझा मध्ये पालघर प्रतिनिधी म्हणून गेली पाच वर्ष कार्यरतमी मराठी न्यूज चैनल पालघर ब्यूरो म्हणून सात वर्षाचा अनुभव महाराष्ट्र 1, न्यूज चैनल मध्ये दोन वर्षाचा अनुभव
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Embed widget